Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
कोणत्याही माता भगिनीला अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन – आ.संतोष बांगर -NNL

कोणत्याही माता भगिनीला अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन – आ.संतोष बांगर -NNL

हिंगोली
हिंगोली। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती कळमनुरी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व इतर योजनांबाबत मार्गदर्शन व आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सीआरपी, बँक सखी, कृषी सखी व पशु सखी यांना मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही माता भगिनीला कुठेही,काहीही अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन असा शब्द देखील आमदार बांगर यांनी उपस्थित माता-भगिनींना दिला. यावेळी सर्व माता-भगिनींनी आमदार संतोष बांगर यांची ओवाळणी केली. तेव्हा आमदार बांगर साहेबांनी सर्व माता- भगिनींना साडीचोळी भेट म्हणून दिली तसेच सर्वांच्या भोजनाची व्यवस्था देखील केली. तसे...
काँग्रेसचे वारंगा फाटा उपसरपंच ओम कदम व कुर्तडीचे युवा काँग्रेस नेते कपिल पानपट्टे यांचा शिवसेनेत प्रवेश -NNL

काँग्रेसचे वारंगा फाटा उपसरपंच ओम कदम व कुर्तडीचे युवा काँग्रेस नेते कपिल पानपट्टे यांचा शिवसेनेत प्रवेश -NNL

हिंगोली
हिंगोली। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे वारंगा फाटा उपसरपंच ओम व्यंकटराव कदम व कुर्तडी येथील युवा काँग्रेस नेते कपिल पानपट्टे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे व हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे वारंगा फाटा उपसरपंच ओम व्यंकटराव कदम व कुर्तडी येथील युवा काँग्रेस नेते कपिल पानपट्टे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश्वरराव पतंगे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख धनंजय पाटील दातीकर, डोंगरकडा सरपंच पप्पू भाऊ अडकिने, पप्पू वीर,दत्तराव माने ,अविनाश पानपट्टे, प्रसाद बों...
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दि. ८ जुलै रोजी नादेड शहरात सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तुन आरक्षण मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत जरांगे पाटील याना पाठिंबा देत एक मराठा... लाख मराठा... या घोषणां देत लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात दौरा सुरू आहे. आज हिंगोलीहून नांदेड शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर शहरातील राज कॉर्नर तरोडेकर चौक येथून या शांतता रॅलीला सुरूवात झाली. सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्जुन आरक्षण मिळावे. महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्यांसाठी निघालेली अभूतपूर्व रॅलीने राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिवा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय. चौक-शिवाजीन...
hit and Run | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई करावी  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

hit and Run | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Blog
मुंबई| मुंबईतील ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही मुंबई महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहन चालकांचे परवाना रद्द करण्यात यावेत. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस...
विकासात्मक कामे घराघरात पोहचला – मराठवाडा संयोजक प्रविण साले -NNL

विकासात्मक कामे घराघरात पोहचला – मराठवाडा संयोजक प्रविण साले -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। पूर्णतः हताश झालेल्या विरोधकांना कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत नेरेटीवचा वापर केला. मोदीचे सरकार संविधान बदलणार असा अपप्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या या नेरेटिव्हला न घाबरता निर्भीडपणे पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे व विकासात्मक कामे घराघरात पोहोचविण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन मराठवाडा संयोजक प्रवीण साले यांनी किनवट येथे केले आहे. लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात बूथ सक्षमीकरण व मतदार यादी पुनर्नरीक्षण संदर्भात बैठका नियोजन व रणनीती ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 6 जुलै रोजी गोकुंदा येथील गोप...
रिचार्ज दर वाढीनंतर ग्राहकांचा दीर्घकालीन प्लान्स खरेदी करण्याकडे ओढा: पेटीएम -NNL

रिचार्ज दर वाढीनंतर ग्राहकांचा दीर्घकालीन प्लान्स खरेदी करण्याकडे ओढा: पेटीएम -NNL

नांदेड
मुंबई| रिलायन्‍स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया अशा प्रमुख नेटवर्क प्रदात्‍यांनी अलीकडेच रिचार्ज प्लान्सच्या किमतीत वाढ केली. दरम्यान पेटीएम ग्राहकांना त्‍यांचे मोबाइल रिचार्ज कार्यक्षमपणे व्‍यवस्‍थापित करण्‍यासाठी सोईस्‍कर पर्याय देत आहे. कंपनीने आपल्या मंचावर सरासरी दैनंदिन रिचार्जेसच्‍या तुलनेत मोबाइल रिचार्जमध्‍ये १५ ते २० टक्‍के वाढीची नोंद केली आहे. तसेच दीर्घकालीन प्लान्स खरेदीसाठी देखील निवडीमध्‍ये वाढ झाली असल्याचे पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. डेटा, अनलिमिटेड पॅक किंवा टॉप-अप्‍ससाठी पेटीएम रिचार्ज प्‍लॅन्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामुळे वापरकर्ते टेलिकॉम ऑपरेटवर त्‍यांच्‍या गरजांना अनुसरून प्‍लॅन्‍सची निवड करू शकतात. पेटीएम युजर-अनुकूल इंटरफेस आणि इतर फायद्यांमुळे मोबाइल रिचार्जेससाठी सर्वात पसंतीचा प्‍लॅटफॉर्म आहे. यामध्‍ये स्थिर पेमेंट पर्याय, डिल्स आणि कॅशबॅक ऑफ...
बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची ज...
“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन -NNL

“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन -NNL

नांदेड
नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेव...
Cereals, pulses, pulses crop competition | राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम -NNL

Cereals, pulses, pulses crop competition | राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन...
पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, असा घणघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्र...
error: Content is protected !!