Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr. Sachin Umrekar’s birthday : डॉ.सचिन उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने “रुग्णसेवा आपल्या दारी” उपक्रम -NNL

Dr. Sachin Umrekar’s birthday : डॉ.सचिन उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने “रुग्णसेवा आपल्या दारी” उपक्रम -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| येथील डॉक्टर लाईन परिसरातील उमरेकर हॉस्पिटलचे संचालक तथा समाजसेवक डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर यांचा पुढील महीन्यातील ११ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे त्या निमित्ताने रुग्णसेवा आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मौजे काकांडी ता. नांदेड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी औषधी व मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्या उपक्रमाची सुरूवात म्हणून दि.९ ऑगस्ट रोजी मौजे काकांडी ता.नांदेड येथे डॉ.सचिन संभाजी पाटील मित्र मंडळ नांदेड दक्षिण मतदार संघ यांच्या वतीने आयोजन केले होते या शिबिराचा २१४ रुग्णांनी लाभ घेतला व या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून कान - नाक- घसा तज्ञ डॉ सचिन शिंदे , जनरल सर्जरी चे सर्जन डॉ सचिन ढवळे , दंतरोग तज्ञ डॉ माधव ढगे, नेत्ररोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर वैद्य, जनरल फिजिशियन डॉ राम गनगोपले यांच्यासह विविध तज्ञ डॉक्टर्संनी सर्व रुग्णांची तपासणी करत उपचार केले...
A speeding car hit the bike hard : भरधाव वेगातील कारची दुचाकीला जबर धडक; सरसम येथील शेतकरी आनंदराव मिराशे यांचा मृत्यू -NNL

A speeding car hit the bike hard : भरधाव वेगातील कारची दुचाकीला जबर धडक; सरसम येथील शेतकरी आनंदराव मिराशे यांचा मृत्यू -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु. गावाजवळ दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कारणे दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना आज दिनांक १० रोजी सकाळी घडली आहे. या घटनेत आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या रस्त्यावरून भरधाव वेगात वाहने चालविली जात आहेत. तर अनेक महत्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने भोकर हिमायतनगर या रत्स्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील किराणा दुकानदार तथा सधन शेतकरी हे आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव वेगात पाठीमागून येणाऱ्या MH14 - C9472 कारणे दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. या कार दुचाकी अपघातात सरसम नजीक त्यांच निधन झाल. अपघात घडताच तात्काळ नागरि...
attempted murder : हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला – NNL

attempted murder : हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला – NNL

क्राईम, नांदेड
बिलोली/नांदेड। नांदेड जिल्ह्यालील बीलोली तालुक्यातील मौजे अंजनी येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. हत्येचा प्रयत्न प्रकरणातील दोन आरोपींचा नियमीत जामीन अर्ज बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही. बी बोहरा यांनी शुक्रवारी फेटाळला. मौजे. अंजनी ता. बिलोली जि. नांदेड येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झालेला होता. त्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादेवरून चार जणांविरूध्द पोलिस ठाणे बिलोली येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(२), ११९(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद क. १६३/२०२४ हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर सदर गुन्हयात भारतीय न्याय संहिता चे कलम ११९ (२) व ६१ (२) हे नव्याने समाविष्ठ करण्यात आले होते. त्यावरून ३ आरोपी...
Actor Vijay Kadam passed away  : अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी अंधेरी येथील निवासस्थानी निधन -NNL

Actor Vijay Kadam passed away : अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी अंधेरी येथील निवासस्थानी निधन -NNL

लाइफस्टाइल
मुंबई | हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंजत होते. त्यांची कारकीर्द रंगभूमी ते चित्रपट मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरली होती. विजय कदम यांनी रंगभूमीवर ऐंशी ते नव्वदच्या दशकांत केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ‘टूरटूर’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांतून त्यांनी काम केले होते. दूरचित्रवाहिनीवर ‘ती परत आलीये’ या मालिकेत त्यांनी केलेली भूमिका अखेरची ठरली. ‘तेरे मेरे सपने’, ‘इरसाल कार्टी’, ‘दे दणादण’, ‘दे धडक बेधडक’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्या तरी विनोदी अभिनेता म्हणून ते अधिक लोकप्रिय ठरले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा...
Abinash Kumar appointed as Nanded District Superintendent of Police : नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी अबिनाशकुमार यांची नियुक्ती -NNL

Abinash Kumar appointed as Nanded District Superintendent of Police : नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी अबिनाशकुमार यांची नियुक्ती -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेड येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांची पदोन्नती देऊन नांदेड पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नांदेड पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेड येथे मागील दोन वर्षांपासून कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यावर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यासोबतच पुणे वाहतूक शाखेत उपायुक्त असलेले विजय कुमार मगर यांना लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून तर अमरावती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यावर बीड पोलीस अधीक...
Celebrating World Tribal Day : हिमायतनगरच्या हुजपामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला -NNL

Celebrating World Tribal Day : हिमायतनगरच्या हुजपामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर एल बी डोंगरे सर हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात व या दिवशी सर्वजण आदिवासी बांधव एकत्र येतात. आणि आपल्या आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा घालतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी जागतिक दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पूजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम म्हणाल्या की जागतिक आदिवासींच्या हक्काचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 9...
Former Deputy Mayor Satish Deshmukh : नांदेड शहरातील नागरी समस्या घेऊन ‌माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी घेतली आयुक्तांची ‌भेट -NNL

Former Deputy Mayor Satish Deshmukh : नांदेड शहरातील नागरी समस्या घेऊन ‌माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी घेतली आयुक्तांची ‌भेट -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शहरातील अनेक नागरी समस्या घेऊन माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेतली. नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी त्यांना दिले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे व कट पॉइंट हे धोकादायक बनलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. मुख्य रस्त्यावरील बंद पडलेले स्ट्रीट लाईट व नवीन वसाहतीमध्ये पाहिजे असलेले नवीन स्ट्रीटलाईट याकडेही लक्ष वेधले. मुख्य रस्त्यावर अनेक झाडे धोकादायक स्थितीमध्ये लोंब कळत आहेत.त्यामुळे काही दिवसापूर्वी निष्पाप मुलाला आपला जीव गमावा लागला होता. गोदावरी नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे व वाढलेल्या जलपर्णीमुळे गोदावरी प्रदूषित होत आहे. भव्य क्रीडा संकुल असून सुद्धा त्याचा वापर क्रीडा प्रेमींना करता येत नाही. सांस्कृतिक सभागृह असून त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे गरजेचे आहे अशा समस...
Aronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे निधन -NNL

Aronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे निधन -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख। हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे वयाच्या (68) व्या वर्षे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुना,दोन मुली,भाऊ, नातु, नाती असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्यविधी आज दि 9 ऑगस्ट रोजी रावणगाव येथे करण्यात आली. यावेळी राजकिय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते....
Special Voter Registration Campaign for Legislative Assembl : विधानसभेसाठी आज व उद्या विशेष मतदार नोंदणी अभियान; 20 ऑगस्टपर्यत मतदार बनण्याची संधी -NNL

Special Voter Registration Campaign for Legislative Assembl : विधानसभेसाठी आज व उद्या विशेष मतदार नोंदणी अभियान; 20 ऑगस्टपर्यत मतदार बनण्याची संधी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विधानसभा निवडणुकीसाठी ज्या अठरा वर्षावरील नागरिकांचे नाव मतदान यादीत नसतील किंवा ज्यांच्या घरी कोणी मृतक झाले असेल तर त्यांचे नाव वगळण्यासाठी उद्या शनिवार 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. नागरिकांसाठी दररोज ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र शनिवार व रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदान नोंदणी अभियान उद्या दिनांक 10 व परवा दिनांक 11 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे. मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली...
error: Content is protected !!