HomeनांदेडSpecial Voter Registration Campaign for Legislative Assembl : विधानसभेसाठी आज व उद्या...

Special Voter Registration Campaign for Legislative Assembl : विधानसभेसाठी आज व उद्या विशेष मतदार नोंदणी अभियान; 20 ऑगस्टपर्यत मतदार बनण्याची संधी -NNL

नांदेड| विधानसभा निवडणुकीसाठी ज्या अठरा वर्षावरील नागरिकांचे नाव मतदान यादीत नसतील किंवा ज्यांच्या घरी कोणी मृतक झाले असेल तर त्यांचे नाव वगळण्यासाठी उद्या शनिवार 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. नागरिकांसाठी दररोज ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र शनिवार व रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदान नोंदणी अभियान उद्या दिनांक 10 व परवा दिनांक 11 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी तसेच आपल्या हरकती व दावे नोंदविण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत आपल्या नियमित मतदार केंद्रावर दररोज मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ) उपस्थित राहणार आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर अंतिम होणाऱ्या यादीतील मतदारांनाच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उद्या मतदार केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या बीएओकडून अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments