Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Inspector of Police Sunil Birla : फुटबॉल खेळल्याने निर्णयक्षमता व संघटन कौशल्य वाढते – पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला -NNL

Inspector of Police Sunil Birla : फुटबॉल खेळल्याने निर्णयक्षमता व संघटन कौशल्य वाढते – पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
किनवट, परमेश्वर पेशवे| फुटबॉल खेळल्याने तग धरण्याची क्षमता आणि वेग वाढते , मेंदूला चालना मिळते, निर्णयक्षमता वाढते, एकाग्रता आणि समन्वय सुधारतो, टीमवर्कला प्रोत्साहन मिळते, संघटन कौशल्य विकसीत होते व आत्मविश्वास वाढतो. तसेच  फुटबॉल खेळणाऱ्यांची हाडे पोहणारे किंवा सायकलिंग करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक मजबूत होतात. फुटबॉल खेळणे एक उत्तम प्रभाव असलेला व तीव्र व्यायाम आहे. असे प्रतिपादन पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला यांनी केले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 अंतर्गत " फुटबॉल स्पर्धेचे " उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी(चि)चे प्राचार्य एस. व्ही. रमणराव , फूटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू जगदीश गालेवार , क्रीडाशिक्षक प्रेमअमर तांदळे, ब्रदर मायकेल, विष्णू, समीर पठाण , निलेश लाजू...
Vikas Patil Devsarkar : हदगाव – हिमायतनगर विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविण्यासाठी विकास पाटील देवसरकर इच्छुक – NNL

Vikas Patil Devsarkar : हदगाव – हिमायतनगर विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविण्यासाठी विकास पाटील देवसरकर इच्छुक – NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/हिमायतनगर| आगामी काळात होणारेय विधानसभा निवडणुकीच्या हालचालीने वेग घेतला आहे. त्या दृष्टीने काँग्रेसकडून हदगाव/हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविण्याची इच्छा हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाअध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी व्यक्त करत उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव विधानसभा मतदार संघातून नवखा उमेदवार म्हणून ते प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव मतदार संघातून इच्छुकांची चाचपणी सुरू झालेली आहे. पक्ष नवीन उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा सुरु असतानाच हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांचे नावे प्रामुख्याने घेतले जात आहे. युवक काँग्रेस पासून पक्षाशी जोडले गेलेले देवसरकर यांनी पक्षात आत्तापर्यंत विविध महत्वाच्या जबाबदा-या पार पा...
Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL

Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशभर होत असलेले हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.या अभियानाला दिनांक १३ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ असे तीन दिवस सर्व विभागाच्या कार्यालय प्रमुख यांनी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करावयाचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. असे असतांना काही कार्यालय प्रमुखांकडून राष्ट्रध्वजाचा तसेच राष्ट्रीय ध्वजसंहितेचा अवमान झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. किनवट तालुक्यातील शिवणी येथील वनविकास महामंडळाचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चोले हे नांदेडहून शिवणी येथे सकाळी दहा वाजता पोहोचले आणि तोपर्यंत तेथील कर्मचारी ध्वजारोहणाची तयारी करून ध्वज तसाच उघड्यावर जमिनीवर ठेवण्यात आलेला दिसून आला. त्यासाठी कुठल्याही प्लेट अथवा ट्रेचा वापर करण्यात आला नव्हता त्याच परिस्थि...
CEO Minal Karanwal : नांदेड जिल्‍हा परिषदेत 62 अनुकंपाधारकांना सीईओ करनवाल यांनी दिल्‍या नियुक्‍त्‍या -NNL

CEO Minal Karanwal : नांदेड जिल्‍हा परिषदेत 62 अनुकंपाधारकांना सीईओ करनवाल यांनी दिल्‍या नियुक्‍त्‍या -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या निर्णयामुळे अनुकंपाधारकांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्‍ट रोजी अनुकंपाधारकांना नियुक्‍त्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. ह्या नियुक्त्या, ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे देण्यात आल्याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले आहे. विविध पदांसाठी नियुक्‍त्‍यांचा यामध्‍ये समावेश आहे. यामध्‍ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर 2 जण, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून 1 जण, आरोग्य सेवक पदावर 3, पशुधन पर्यवेक्षक म्हणून 1, 6 कंत्राटी ग्रामसेवक आणि 49 परिचर या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत ज्येष्ठतेनुसार योग्यतेची प्राथमिकता देऊन अनुकंपाधारकांच्या हक्कांचा सन्मान करण्यात आला आहे. भविष्यात परिचर पदाच्‍या फेर नियुक्त्या करताना वर्ग-3 पदावर नियुक्‍त्‍या ...
Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

नांदेड, करियर
नांदेड| अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ही चळवळ उपयुक्त असून यात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत देहदान चळवळीचे नांदेड येथील प्रणेते माधव आटकोरे यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्रशाला विष्णुपुरी येथे वेळोवेळी प्रासंगिक अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून अवयव दान सप्ताहाच्या औचित्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश कुलकर्णी यांनी एक प्रेरणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव यांनी देहदान याविषयी सविस्तर माहिती दिली. माधव आटकोरे यांनी चालवलेली चळवळ दिशादर्शक असून मी स्वतः देहदानाचा फॉर्म भरून देत आहे, अशी घोषणा करून विद्यार्थी पालकांना देहदानाचे आवाहन ...
Collector Abhijit Raut : मनरेगा अंतर्गत फळझाड, फुल पीक लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार -NNL

Collector Abhijit Raut : मनरेगा अंतर्गत फळझाड, फुल पीक लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड व फुल पीक लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि बांधावर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शेतकऱ्यांना या योजनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची शेती अधिक समृद्ध होईल आणि उत्पादनात वाढ होईल. विशेषतः बांबू लागवडीसाठी दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या व्यवस्थापनात नव्या पद्धतींचा वापर करण्यास आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करेल. एक हेक्टर मध्ये 3×3 पद्धतीने लागवड केल्यास अकराशे अकरा बाबू रोपे बसतात नरेगा मधून 4 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना 7 ल...
Dr.Hansraj Vaidya : “मुख्यमंत्री माझे लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना” अंतर्गत 3500रू प्रतिमहा द्या अन्यथा आंदोलन – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya : “मुख्यमंत्री माझे लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना” अंतर्गत 3500रू प्रतिमहा द्या अन्यथा आंदोलन – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ज्येष्ठ नागरिक हा कुटूंबाचीच नव्हे तर समाजाची, राज्य शासनाची, देशाची अर्थात राष्ट्राची "राष्ट्रीय संपत्ती"च आहे. ज्येष्ठ नागरिक समूह हा केंद्र व राज्य शासनाच्या निकोप तथा निरोगी समाज मनाचा मानसिक, भावनिक, अर्थिक, सांस्कृतिक तथा किंबहूना सर्वच बाबींचा निखळ आरसाच आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाने "आयुष्यमान भारत योजना", "प्रधानमंत्री वयोश्री योजना" व राज्य शासनाने "मूख्यमंत्री वयोश्री योजना" कार्यान्वित केलेल्या आहेत. पण त्या परिपूर्ण नाहीत त्या योजनांचा गरिब,गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित तथा वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार,विधवा माता व दिव्यांग ज्येष्ठ नागरिक समूहाला खास, सरळ आणि दिर्घकालीन कसल्याच अर्थिक फायद्याच्या नाहीत. अनेक क्लिष्ट अटी युक्त, व दुरापास्त आहेत. त्या योजना पासष्ठ वर्षाच्या पुढच्या ठराविक ज्येष्ठ नागरिक समूहा साठीच आहेत.साठ ते पासष्ठ वर्षाच्या ज्ये...
Appointments to 62 Compassionate Persons in District Council : जिल्‍हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना नियुक्त्या – खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी -NNL

Appointments to 62 Compassionate Persons in District Council : जिल्‍हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना नियुक्त्या – खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेत नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या ६२ पात्र अनुकंपाधारकांना सेवेत रुजू करून घेण्याच्या निर्णयावरअखेर मोहर लागली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले. नांदेड जिल्हा परिषदेत नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेले अनुकंपाधारक मागील काही महिन्यांपासून आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. दरम्यान त्यांनी गेल्या महिन्यात खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन आपल्याला अद्याप नियुक्ती मिळाली नसल्याची व्यथा मांडली. त्यानंतर खा. चव्हाण यांनी तातडीने राज्याचे ग्रामविकास मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मा...
Nanded police action : आंतर जिल्हा मोटारसायकल चोरी आणि घरफोडी करणारे दोन आरोपीनां अटक; सोन्याचांदीचे दागीने व ०४ मोटार सायकल एकूण 1,77,600 रुपयांचा ऐवज हस्तगत -NNL

Nanded police action : आंतर जिल्हा मोटारसायकल चोरी आणि घरफोडी करणारे दोन आरोपीनां अटक; सोन्याचांदीचे दागीने व ०४ मोटार सायकल एकूण 1,77,600 रुपयांचा ऐवज हस्तगत -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। आंतर जिल्हा मोटारसायकल चोरी आणि घरफोडी करणारे दोन आरोपीनां इतवारा पोलीसांनी अटक करुन सोन्याचांदीचे दागीने व ०४ मोटार सायकल असा 1,77,600/- रु. चा ऐवज हस्तगत केल्याची कार्यवाही केली आहे. या कार्यवाही बद्दल सर्व स्तरातून पोलिसांचे अभिनंदन केले जाते आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराय धरणे, उप विभागिय पोलीस अधिकारी इतवारा, अति. पदभार नांदेड शहर सुशिलकुमार नायक यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पो.स्टे. अंतर्गत पेट्रोलिंग ठेवुन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. वरीष्ठांनी वरील प्रमाणे सुचना दिल्यावरुन पो.स्टे. इतवारा नांदेड येथील पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोउपनि रमेश गायकवाड, प्रो पो...
33 sheep died after mistaking water for drinking chemicals : पाणी समजून केमिकल पिऊन ३३ मेंढ्या दगावल्या; दाभड पाटीजवळ घडली घटना -NNL

33 sheep died after mistaking water for drinking chemicals : पाणी समजून केमिकल पिऊन ३३ मेंढ्या दगावल्या; दाभड पाटीजवळ घडली घटना -NNL

कृषी, नांदेड
नांदेड। नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर दाभड पाटी नजीक रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्यानी पाणी समजून वाहनात भरण्यात येणारे युरिया मिस्कीड लिक्विड तथा केमिकल पील्याने ३३ मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात दोन मेंढपाळाचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील देगाव (कु.) येथील मेंढपाळ रामकीशन भुजाजी बेळगे व योगेश मारोती वटे हे आपल्या जवळपास ३०० च्या वर मेंढ्या चारून दुपारी चार वाजताच्या सुमारास मुक्कामाच्या स्थळी घेऊन जात होते. प्रदूषण होऊ नये म्हणून रस्त्यावर ठेवण्यात आलेले युरिया मिक्सिड लिक्विड हे वाहनामध्ये भरले जाते. ते टाकीत भरत असताना दुकानपुढे जमिनीवर सांडले. हेच लिक्विड पाणी समजून ३३ च्या वर मेंढ्यांनी पिले. पंधरा ते वीस फूट पुढे चालल्यानंतर एका पाठोपाठ एक मेंढ्या मरत गेल्या. यात रामकीशन भुजाजी बेळगे यांच्या २० मेंढ्या तर योगेश मारोती वटे यांच्या १३ में...
error: Content is protected !!