Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mrs. Surekha Lakhe ; गोपाळचावडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.सुरेखा लाखे यांची बिनविरोध निवड – NNL

Mrs. Surekha Lakhe ; गोपाळचावडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.सुरेखा लाखे यांची बिनविरोध निवड – NNL

Blog, नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सौ सुरेखा लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला नंतर तब्बल एक महिन्याच्या कालावधी नंतर नवीन सरपंच पदासाठी दि १४ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली यावेळी सरपंच पदासाठी सौ. सुरेखा लाखे यांच्या एकच अर्ज आल्यामुळे दुपारी २ वाजता बिनविरोध निवड करण्यात आली . पंच वार्षिक निवडणूकीत गेल्या अडीच वर्षा पूर्वी नवचैतन्य ग्रामविकास पॅनल चे प्रमूख साहेबराव सेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूकी मध्ये आकरा पैकी आकरा जागा एकतर्फी निवडुण विजय मिळवला होता,व सरपंचपदाचे आरक्षण एस.सी.महिला साठी आरक्षीत असल्याने पहिल्या अडीच वर्षासाठी श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. अडीच वर्षे कालवधी झाल्यानंतर ठरल्या प्रमाणे खांदेपालट करण्यासाठी सरपंच डा...
retired soldier Vitthal Kadam ; शहीद जवानाच्या परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिकाच्या सन्मान,हा अभिमान, सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम – NNL

retired soldier Vitthal Kadam ; शहीद जवानाच्या परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिकाच्या सन्मान,हा अभिमान, सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम – NNL

Blog, देश विदेश, नांदेड
नवीन नांदेड| शहीदाचा जवानांचा परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिक यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेला सन्मान हा अभिमान असल्याचे सांगून सैनिक हा भारतीय सिमेवर राहुन केलेले कार्य उल्लेखनीय आहे, मनपा प्रशासनाने सैनिकाच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करावे असे आवाहन सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम,यांनी मनोगत प्रसंगी आपले व्यक्त केले. स्वातंत्रयाच्या अमृत मोहत्सावाच्या अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड यांच्या वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने आजी माजी कार्यरत स्वातंत्र्य सैनिक व बलीदान दिलेल्या शहीदाचा परिवारातील सदस्य यांच्या सत्कार सोहळा १४ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी सहाय्यक आयुक्त रमेश चौरे, रावण सोनसळे...
Anita Rathod ; अनिता राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड – NNL

Anita Rathod ; अनिता राठोड यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड – NNL

Blog, करियर, नांदेड
नांदेड | अर्धापूर येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयात परिचर या पदावर कार्यरत असलेले बाबुराव तुकाराम राठोड यांची कन्या अनिता बाबुराव राठोड यांची आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झाली आहे. मुखेड तालुक्यातील वसंत नगर तांडा या दुर्गम भागात असलेल्या लहान गावात जन्मलेल्या अनिता यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण वसंत नगर येथील शाळेत पूर्ण झाले अनिता राठोड या शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार आणि मेहनती मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी मधून पूर्ण केल्यानंतर त्या स्पर्धा परिक्षाकडे वळाल्या व त्या ठिकाणी चिकाटीने मेहनत करत पहिल्या प्रयत्नात त्या पूर्व परिक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुख्य परीक्षेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत त्यांनी यश संपादन केले आणि आयोगा द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली त्यांनी आपल्या ...
Arun Chavan ; गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस प्रवेश..! – NNL

Arun Chavan ; गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस प्रवेश..! – NNL

Blog, नांदेड, राजकीय
नांदेड | बंजारा समाजातील तळागाळातील अनेक गरजवंतासाठी कायम तत्पर अशी प्रतिमा असलेल्या गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरूण चव्हाण यांनी नुकताच नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेशजी चेनीथल्ला यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आणि क्षणात त्यांच्या कॉग्रेस प्रवेशामुळे भोकर विधानसभाच नव्हे तर अनेक गोर बंजारा बहुल मतदार संघातील राजकीय गणितं बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहे उच्च विद्याविभूषित, चारित्र्यसंपन्न,सद्गुणी असे व्यक्तिमत्व म्हणून श्री अरुण चव्हाण यांची बंजारा समाजासह अनेक बहुजनांमध्ये अनाथांचा नाथ व निराधारांचा आधार अशी त्यांची ओळख आहे.तसेच वंचित,शोषित,उपेक्षित, शेतकरी,कामगारांना न्याय मिळवून देणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते. बंजारा समाजाला न्याय, हक्क,अधिकार मिळवून देणारा क्रांती...
Pranitatai Deore : लोहा तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेअंतर्गत ३६ हजार अर्ज -प्रणिताताई देवरे याची महिती -NNL

Pranitatai Deore : लोहा तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेअंतर्गत ३६ हजार अर्ज -प्रणिताताई देवरे याची महिती -NNL

नांदेड, राजकीय
लोहा। लोहा तालुक्यात ३६हजार ११६ अर्ज प्राप्त झाले त्यात ३४ हजार ९७७ अर्ज अपरोव्हल साठी पाठविण्यात आले असून ९१ अर्जात त्रुटी आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर बोलणे झाले. आमच्या महायुती सरकारने राबविलेली ही योजना बहिणीसाठी खुप आधार देणारी आहे. राखी पौणिमेला ओवाळणी मिळणार असून, बहिणींच्या खात्यात अनुदान जमा होईल असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समितीच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी सांगितले. लोहा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.समितीचे सदस्य गंगाप्रसाद येन्नावार , सदस्य ऍड मारोती पंढरे, नायब तहसील अशोक मोकले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी एस आडीराघो, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पवार, नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, संजय गांधिं निर...
Mahur parikrama yatra ; भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तत्पर राहा- सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना -NNL

Mahur parikrama yatra ; भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तत्पर राहा- सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्रावण महिन्यात अति पवित्र मानल्या जाणाऱ्या नारळी पौर्णिमा यात्रा उर्फ परिक्रमा यात्रेनिमित्त माहूरगडावर लाखोच्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने तसेच ही परिक्रमा यात्रा सर्व भाविक २२ की किलोमीटर सर्व देवस्थानासह जंगलातून पायी चालत पूर्ण करणार असल्याने दिनांक १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी सर्व विभाग प्रमुखांनी भाविकांना त्रास होणार नाही तसेच यात्रा काळात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या झालेल्या आढावा बैठकीत प्रमुख यात्रा प्रमुख म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी उपस्थिती होती यावेळी तहसीलदार किशोर यादव नातह डॉ. राजकुमार राठोड. उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे. सपोनी शिवप्रकाश मुळे. सपोनी एस. बी. गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार. वैद्यकीय...
Venkatesh Chaudhary : प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करावे – व्यंकटेश चौधरी -NNL

Venkatesh Chaudhary : प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहून काम करावे – व्यंकटेश चौधरी -NNL

करियर, नांदेड
नांदेड। प्रतिकूल वातावरणातसुद्धा सकारात्मक राहून अनुकूलता निर्माण करून भविष्यवेधी शिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. वाजेगाव (ता. नांदेड)ची ऑगस्ट महिन्याची पहिली केंद्रीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे दि. १४ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध उपक्रम आणि गुणवत्ता वर्धन यांत अग्रेसर असणाऱ्या अक्षर परिवारात सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण जगासमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे आदर्श कुटुंब म्हणजे ढोके कुटुंब असेही व्यंकटेश चौधरी यांनी मत व्यक्त केले. संवेदनशील अक्षर परिवाराने स्वर्गीय अभिजीत ढोके असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी यांच्या दुर्दैवी अपघातानंतर ब्रेन डेड अवस्थेत असतांना अवयवदान करण्याचा संकल्प करून हृदय, फुफुस, किडनी, यकृत, डोळे या अवयवांचे दान कर...
Ex-servicemen are invited to apply : विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Ex-servicemen are invited to apply : विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एकरकमी 10 हजार व 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येतो. तरी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक / पत्नी व त्यांच्या पाल्यांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह मंगळवार 27 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक मोबाईल क्रमांक 8698738998, 8707608283 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. सन 2023-24 या वर्षासाठी कल्याणकारी निधितून विशेष गौरव पुरस्कार उत्कृष्ट क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केला जाणार आहे. इयत्ता 10 व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ख...
Cotton, soybean farmers : खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

Cotton, soybean farmers : खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप, पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रुपये 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ...
15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

नांदेड, लेख
"जिथे भाव आहे, ताल आहे, राग आहे अशी माझी भारतमाता" आज "15 ऑगस्ट" आपल्या भारत मातेला प्रथम आपण वंदन करूयात. आपल्या जीवनामध्ये पाच माता खुप महत्त्वाच्या आहेत. 1) भारतमाता 2) भुमाता 3) गोमाता 4) गंगा माता 5) जन्म देणारी आपली आई या पाच मातांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. ते आपण कसेहि फेडू शकत नाही. या माता खुप खुप महान आहेत. यांचे वर्णन आणि स्तुती करण्यास हो आपण साधारण माणसे कमी पडतो या मातांना आपण वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करूयात. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खुप आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा मोठा सण आहे "15 ऑगस्ट" हा दिवस आपल्या राष्ट्राचा भाग्योदय आणि समाजाला अभय प्राप्त करून देणारा दिवस आहे. कितीतरी मानवपुष्प हसत हसत समर्पित झाले आपल्या या भारत भुमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि म्हणूनच "15 ऑगस्ट" ची पहाट हि स्वतंत्रता दिवसाची पहाट म्हणून उदयास आली आपली भारत माता गुलामगिरीतून स्वतंत्र झाली. तो ह...
error: Content is protected !!