Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
State Marathi Film Awards preliminary round nominations announced : राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित -NNL

State Marathi Film Awards preliminary round nominations announced : राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित -NNL

मनोरंजन
मुंबई| अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सन 2020 वर्षासाठीचा 58 वा तसेच 2021 वर्षासाठीचा 59 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आहे. सन 2020 या वर्षाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरिता जून,जयंती, फनरल या तीन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट कला दिग्दर्शन अशोक लोकरे, ए.ऋचा ( मी वसंतराव), उत्कृष्ट छायाले...
Chief Minister Eknath Shinde : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र
मुंबई| राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम...
National Sports Day Organization of Sports Week : राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन -NNL

National Sports Day Organization of Sports Week : राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट, 2024 रोजी साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त खेळाडुनी आपल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत व नावे 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच...
ISO Certification ; लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन – NNL

ISO Certification ; लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| लोहा पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र गटविकास अधिकारी यांना प्रदान करण्यात आले. लोहा पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी का...
Indian Freedom Movement ; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात दलित महिला वीरांगणांचे योगदान – NNL

Indian Freedom Movement ; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात दलित महिला वीरांगणांचे योगदान – NNL

लेख
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन जरी 1857 ला सर्वप्रथम राष्ट्रीय उठावाच्या माध्यमातून आणि महात्मा गांधींजी यांच्या नेतृत्वाखाली गो- बॅक ब्रिटीश, इंग्रज चले जाव आदी आंदोलने प्रखरतेने झाले. सदरील आंदोलनात क्रांतीकारकांच्या आवाहनावरुन अनेक दलित महिलांनी राष्ट्रीय उठावाच्या प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्य आंदोलनात उत्स्फुर्तपणे सक्रियतेने योगदान दिले आहे. विशेषतः दलित महिलांचे योगदान विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे. इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत. दलित आणि शोषित समाजाच्या महिलांनी आपापल्या परीने गाव, मोहल्ला, शहर, महानगर आदी ठिकाणी ब्रिटीशांना अतिशय प्रखरतेने विरोध दर्शवला. डब्ल्यू गार्डन अलेक्झांडरने सिकंदरबागच्या किल्ल्यावरुन काही दलित मर्दानी महिलांना स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तत्कालीन 1857 च्या राष्ट्रीय उठाव...
Raju Gaikwad ; दिघीच्या रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालयात मागणी – NNL

Raju Gaikwad ; दिघीच्या रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालयात मागणी – NNL

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे दिघी येथील गावकर्यांना दूषित पाण्याचा सामना करत जीवन यापन करावे लागत आहे. हि बाब हेरून गावातील तरुण युवक राजुभाऊ गायकवाड यांनी थेट मंत्रालय गाठून झालेल्या कामाबद्दल शंका व्यक्त केली आहे. तसेच तात्काळ गावकऱ्यांची होणारी दूषित पाण्याची परवड थांबवावी अशी मागणी निवेदन येऊन केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी या गावातील नागरिकांना पैनगंगा नदीचे अशुद्ध पाणी पिऊन जिवन जगव लागतं आहे. सन 2015/16/17 वर्षी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे कामं देखील करण्यात आले होते. परंतु गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांनी थातुरमातुर बोगस काम करुन रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. आज घडीला नदीचे दुशीत पाणी पिण्याची वेळ संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यामुळे दिघी येथील नागरिकांवर आली आहे. सदरील ...
Gitanjali Shelke ; ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळाचा अनावरण सोहळा – गीतांजली शेळके यांची माहिती – NNL

Gitanjali Shelke ; ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळाचा अनावरण सोहळा – गीतांजली शेळके यांची माहिती – NNL

नांदेड, राजकीय
मुंबई | जीएस महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. अॅड. उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱ्या उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळ अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती महानगर व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी दिली आहे. याविषयी माहिती देताना शेळके म्हणाल्या की स्व. गुलाबराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एस. महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून काम करताना सहकार व सामाजिक क्षेत्रात स्व. अॅड. उदय शेळके यांचा नेहमीच पुढाकार होता. तो सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करणार आहोत. या फाउंडेशनच्या माध्यमातून ...
Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थ्यांचे यश हेच पालकांच्या कष्टाचे फलित -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थ्यांचे यश हेच पालकांच्या कष्टाचे फलित -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

करियर, नांदेड
नांदेड| जगातल्या प्रत्येक आई-बाबांची इच्छा असते ती आपल्या पाल्यांचा सत्कार आपल्या डोळ्यांनी बघण्याची. तो सत्कार बघातांना आपल्या जीवनात केलेल्या कष्टाचे फलित मिळाल्यासारखे प्रत्येक मुला-मुलींच्या आई-वडिलांना वाटत असते. आई-वडील दिवसरात्र कष्ट घेवून मुला-मुलींना शिकवतात पण त्या कष्टाचे खरे फलित हे आपले पाल्य यशस्वी झाल्यावरच होते. म्हणून विद्यार्थ्यांचे किंवा मुला-मुलींचे यश हेच पालकांच्या कष्टांचे फलित असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी वक्त केले. ते आज दि. १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासनाद्वारे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जे विद्यार्थी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’ इत्यादी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा पालकासह कुलगुरू महोदयां...
Suryakanta Patil ; राष्ट्रवादीचे पक्ष संघठन वाढवून शरद पवारांचे हात बळकट करणार -माजी मंत्री सुर्यकांता पाटील – NNL

Suryakanta Patil ; राष्ट्रवादीचे पक्ष संघठन वाढवून शरद पवारांचे हात बळकट करणार -माजी मंत्री सुर्यकांता पाटील – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | आता हवा बदलली आहे, नागरिकांचा कौल महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघठन अधिक वाढवून खा.शरदचंद्र पवार यांचे विधानसभा निवडणुकीत हात बळकट करून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नांदेड ग्रामीणची आढावा बैठक नुतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दि.14 ऑगस्ट रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केली होती यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.प्रदिप नाईक तर माजीमंत्री सुर्यकांता पाटील, माजीमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर आणि नुतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ....
Madhavrao Patil Zarikar ; स्वच्छता दुत माधवराव पाटील झरीकर यांचे वृध्दपकाळाने निधन.. – NNL

Madhavrao Patil Zarikar ; स्वच्छता दुत माधवराव पाटील झरीकर यांचे वृध्दपकाळाने निधन.. – NNL

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| लोहा तालुक्यातील निर्मल ग्राम झरीचे माजी सरपंच माधवराव कामाजी पाटील झरीकर यांचे वृध्दपकाळाने राहत्या घरी झरी येथे १४ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता निधन झाले असून निधन समयी त्याचे वय ६९ वर्ष होते, त्याचा पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, भाऊ बहिण असा परिवार असून सायंकाळी ५ वाजता झरी स्मशानभूमीत हजारो नागरीकाच्या उपस्थित शोकाकुल वातावरण मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. लोहा तालुक्यातील झरी गावातील ग्रामपंचायत सरपंच म्हणून २००० ते २००५ सरपंच म्हणून माधवराव पाटील झरीकर यांनी सरपंच म्हणून कारभार सांभाळला तर पत्नी सुमनताई झरीकर यांनी २०१० पर्यंत सरपंच पद सांभाळले, या काळात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते झरी गावाला निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार घेतला तर शासनाच्या अनेक पुरस्कार ग्रामपंचायत यांना मिळवून दिले आहेत, सेवा सोसायटी चेअरमन म्हणून ही कारभार सांभाळला, स्वच्छता दुत म्हणून महा...
error: Content is protected !!