Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटनासाठी पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली विशेष पथकांचे गठन -NNL

परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटनासाठी पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली विशेष पथकांचे गठन -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा सर्व व्यवसायांच्या निर्मूलनासाठी त्यांना दिनांक 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक 3 ऑगस्ट व 10 ऑगस्ट रोजी परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'मासरेड' चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी, संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता. अवैध व्यवसायांच्या उच्चा...
CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात १७ ऑगस्ट २४ शनिवार रोजी संपूर्ण नांदेड शहर व सिडको हडको नवीन नांदेड सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन यामध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठाणे, हॉटेल, पानटपरी, हातगडे , भाजी विक्रेते यांनी सहभाग नोदंवत बंदला १०० टक्के पांठीबा दर्शविला यावेळी माता रमाबाई आंबेडकर चौक येथे बंगाला देशात हिंदुवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी बंगाली देशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ सिडको हडको नवीन नांदेड भागात सकल हिंदू समाज बांधवांचा वतीने १७ आगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते,यावेळी प्रारंभी हडको मध्ये छत्रपती शिवाजी महाराज,सिडको अण्णा भाऊ साठे,छत्रप्रती शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह पुतळा व माता रमाई आंबेडकर चौक येथे पुष्पह...
Kavad Yatra : सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न -NNL

Kavad Yatra : सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको, श्रीराम जन्मोत्सव समिती, नांदेड महाआरती संघटना नांदेड आयोजित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर साईनगर सिडको ते जुना मोंढा मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड कावड यात्रा काढण्यात आली यंदाची ही कावड यात्रा बांगलादेश मधील हिंदूंवर असलेल्या अत्याचाराला समर्पित ही कावड यात्रा होती. पाच दहा कावड, एका भक्ताने 40 लिटर कावड तयार करून आणली होती. पाण्याची तर लहान बालकांनी भूत अघोरींचे वैशभुषा साकारून कावड यात्रा मधील नागरिकांचे लक्ष वेधले. कावड यात्रेमध्ये हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नवीन नांदेड सिडको,नांदेड शहर दुम दुमले होते. तसेच जुनामोंढा येथे बांगलादेश विरुद्ध घोषणाबाजी ही करण्यात आली. सिडको पासून ते उर्वशी महादेव मंदिरापर्यंत व्यापाऱ्यांनी तथा शिवभक्तांनी कावड यात्रेचे स्वागत केले. सिडको येथील अण्णा भाऊ साठ...
माहूर तालूक्यात डॉक्टर असोसिएशन कडून दवाखाने बंद ! कलकता घटनेचा निषेध -NNL

माहूर तालूक्यात डॉक्टर असोसिएशन कडून दवाखाने बंद ! कलकता घटनेचा निषेध -NNL

नांदेड, आरोग्य
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज कॅम्पस्मध्ये ९ ऑगस्टच्या पहाटे एका पदव्युत्तर पदवीधर युवतीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली. या अतिशय घृणास्पद कृत्यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे डॉक्टर्सच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. झालेल्या क्रुर घटनेचा तिव्र निषेध करत माहुर तालुक्यातील सर्व दवाखाने बंद ठेवले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर आंदोलन उधळणाऱ्या गुंडगिरीच्या पृष्ठभूमीवर, 'आयएमए' अर्थात इंडियन मेडिकल वैद्यकीय असोसिएशनने शनिवार, १७ ऑगस्ट रोजी निषेध दिन पाळून शनिवारी सकाळी ६ ते रविवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ अशा २४ तासांसाठी डॉक्टरांनी देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, १५ ऑगस्टला ज...
Give direct subsidy to smallholder farmers : रिठा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या -NNL

Give direct subsidy to smallholder farmers : रिठा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या -NNL

नांदेड, कृषी
किनवट, परमेश्वर पेशवे| रिठा ,रिठा तांडा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ऑनलाईन नोंद न केलेले व ई पीक पाहणी करून सुद्धा कापूस, सोयाबीन अनुदान यादी मध्ये नावच समाविष्ट झाले नसून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे. ईस्लापूर परिसरातील रिठा व जलधारा येथील शेतकरी हे आदिवासी बहुल भागात राहत असून बरेच शेतकऱ्याकडे अँनड्रॉइड मोबाईल नसल्याने व काही शेतकरी अशिक्षित असल्याने बरेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असून काही शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन ई पीक पाहणी केली परंतु या शेतकऱ्याची देखील नावे यादीत नाही. त्यामुळे शासनाने सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. अशी जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. दि. 16 ऑगस्ट रोजी या दोन्ही गावच्या शेतकऱ...
Movement Warrior: Baswantrao Mundkar : चळवळी योद्धा: बसवंतराव मुंडकर -NNL

Movement Warrior: Baswantrao Mundkar : चळवळी योद्धा: बसवंतराव मुंडकर -NNL

नांदेड, लेख
स्वातंत्र्य संग्रामाच्या विविध चळवळींमध्ये योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांची स्मृती आजही आपल्या मनामध्ये अजरामर आहे. अशा एका महान योद्ध्याचे नाव म्हणजे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध मान्यवर वक्त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या सहभागाचे सविस्तर विश्लेषण केले. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या चळवळींनी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये आप...
भाविकांचा सहभाग व भक्तीभावात संपन्न होणार परिक्रमा यात्रा; लाखो भाविकांचे होणार आगमन -NNL

भाविकांचा सहभाग व भक्तीभावात संपन्न होणार परिक्रमा यात्रा; लाखो भाविकांचे होणार आगमन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर| माहूरगडावर पार पडणाऱ्या तीन मोठ्या यात्रेपैकी एक असलेली परिक्रमा हि यात्रा दि.१८ व १९ ऑगस्ट या दोन दिवशी भक्तीभावात साजरी होणार आहे. दि.१३ रोजी श्रावण शु.८ अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात झाली. दि.१८ ऑगस्ट रोजी श्री दत्तशिखर संस्थानच्या दत्त मंदिरातील महापुरुष 'सर्वतीर्थ 'या कुंडात स्नान करून भगवान दत्तप्रभू यांचे दर्शन व प. पू. प. म. श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतात.त्यांच्या परवानगीने नियुक्त महापुरुष यांचे नेतृत्वात मोठ्या संख्येत जमलेल्या भाविकासंह सायं.४ वा परिक्रमा यात्रेला निघतात. परिक्रमेला दत्तशिखर येथून सुरुवात होते, पुढे काळेश्वर मंदिर, सयामाता मंदिर,मातृतीर्थ तलाव, विष्णुकवी मठ,पांडवलेणी, श्रीदेवदेवेश्वर मंदिर, वनदेव मंदिर, कैलास टेकडी, शेख फरीद, दत्त मांजरी,अनुसयामाता मंदिर, सर्वतीर्थ कुंड मार्गे रात्र दिवस प्रदक्षिणा करुन दुसऱ्या...
Himayatnagar is strictly closed : बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद -NNL

Himayatnagar is strictly closed : बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगरअनिल मादसवार। बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांकडून होत असलेल्या अत्याचार विरोधात दि.17 शनिवारी हिमायतनगर शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने हाथी निषेधाचे फलक घेऊन युवकांची रैली काढण्यात आली. हा बंद यशस्वी करण्यासाठी सकल हिंदूवादी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मागील काही दिवसापूर्वी बांगलादेशाचे सरकार पायउतार झाल्यानंतर बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांनी अनन्वित अत्याचार सुरु केले आहे. त्यामुळे येथील हिंदूंचे जीवन नरकमय झाले असून, हिंदू महिला माता भगिनींवर अतोनात अत्याचार होत आहेत. या घटनेच्या विरोधात तमाम महाराष्ट्रातील हिंदू बांधव आपसातील जाती - धर्म भेद सोडून एकवटला आहे. तिथे होत असलेल्या अत्याचाराच्या निषधार्थ दिनांक 17 ऑगस्ट रोज शनिवारी हिमायतनगर शहर व तालुका कडकडीत बंद पाळण्...
nationwide doctors’ strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

nationwide doctors’ strike : डॉक्टरांच्या देशव्यापी बंदला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद; दिलं प्रशासनाला मागणीचे निवेदन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष कृत्य व हत्येच्या निषेध करण्यासाठी हिमायतनगर येथील डॉक्टर असोशियनच्या वतीने देशव्यापी बंदमध्ये सहभाग घेतला. येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात काळ्या फिती लावून निषेध करत दिवसभर शहर व तालुक्यातील रुग्णालय उघडणार नाहीत अश्या संदर्भाचे निवेदन पोलीस निरीक्षक अमोल भगत याना दिले आहे. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे व सर्व डॉक्टर महिला - पुरुष मंडळी उपस्थित होती. तर या बंदला केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशन यांनीं पाठींबा दिला आहे. कोलकता येथील महिला डॉक्टरावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण समाज मन सुन्न झाले आहे. तसेच रुग्णालयावर हल्ला करण्यात आला आणि तोडफोड करण्यात आली. या घटनेचे देशभरात तीव्र फडसाद उमटले असून, घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी देशव्यापी बंद मध्ये ...
Shiradhon Kendra’s Education Council is full of enthusiasm : शिराढोण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न – NNL

Shiradhon Kendra’s Education Council is full of enthusiasm : शिराढोण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न – NNL

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत केद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे सर यांची बदली झाल्यामुळे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयाप्रमाणे दरमहा प्रत्येक केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सूचित केलेले आहे. त्यानुसार सन २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष 'गुणवत्ता वृद्धी वर्ष' म्हणून घोषित करण्यात आलेले आहे . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा परिषदेचा मुख्य हेतू असतो. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्तीवर आधारित वर्गाध्ययन प्रक्रिया प्रभावी करून प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी प्रत्येक केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. शिराढोण के...
error: Content is protected !!