Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

लेख, राजकीय
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला आणि ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, अशी चर्चा रंगू लागली. भाजप आणि मित्रपक्षांच्या पराभवाची कारणमीमांसा होऊ लागली; मात्र निवडणूक निकालापूर्वीच कोण येणार आणि कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार यांचे आडाखे मोठ्या प्रमाणावर बांधले जाऊ लागले होते. मिडियाच्या एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरले असले तरी पारावरच्या, चावडीवरच्या आणि चौका चौकातल्या सर्वसामान्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की लोकांनी आपले स्वतःचे एक्झिट पोल तयार केले होते. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात पूर्णांशाने लोकशाही नांदावी, तिची पाळेमुळे खोलवर रुजावीत अशी लोकशाहीप्रेमीची धारणा असते. लोकशाहीची व्याख्याही आपण तशा प्रकारचीच करतो. एकमेकांना सांगत असतो. मात्र, गेल्या काही दशकांत लोकशाहीप्रणीत आणि लोकशाहीप्रधान निवडणूक ही लोकांची राहिलेली नाही. ही खूपच गंभीर बाब आहे. येनकेन प्रकारे...
Sardar Ravneet Singh Bittu  ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन  – NNL

Sardar Ravneet Singh Bittu ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड| हजुर साहिब नांदेड येथून ऋषिकेशसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात यावी. ज्यामुळे गुरुद्वारा श्री हेमकुंड साहेब भाविकांना पाच धाम यात्रेचे दर्शन करण्याचे सोईचे होईल. या मार्गावर एकही ट्रेन नाही ह्या ट्रेनचा मार्ग दिल्ली, मेरठ, बिजनौर, हरिद्वार ,ऋषिकेश , देहरादून, श्री हेमकुंड साहेब, केदारनाथ ,बद्रीनाथ ,यमुनोत्री ,गंगोत्री, असा आहे. या शहरांना जाण्या येण्यासाठी ट्रेनचा लाभ मिळेल आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत एक संबंध प्रस्थापित होईल. हिंदू धर्मात पाच धामाचे देवभूमी म्हणण्यात येते सर्व भक्तांची ही इच्छा असते की पाच धामाला दर्शन करून आपला जीवन सफल करावे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गोबिंद घाट ते हेमकुंड साहेब पर्यंत दर्शनासाठी रोपवे चे काम सुरू केले आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन करण्यासाठी सोपे जाईल शीख आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भ...
Principal Dr. Shekhar Ghungarwar ; नियमित अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकाराकडे वळावे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांचे आवाहन – NNL

Principal Dr. Shekhar Ghungarwar ; नियमित अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकाराकडे वळावे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांचे आवाहन – NNL

करियर, नांदेड
नविन नांदेड| महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग नोंदवून शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नवीन नांदेड येथे २९ ऑगस्ट हॉकीचे जादूगार महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अर्थातच राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार हे होते. याप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख,डॉ. साहेबराव मोरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. व्यंकटेश देशमुख, प्रा.डॉ.नागेश कांबळेयांची प्रमुख उपस्थिती होती. कार...
National Sports Day ; इंदिरा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा – NNL

National Sports Day ; इंदिरा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा – NNL

करियर, स्पोर्ट्स
नविन नांदेड| श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे २९ ऑगस्ट महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन अर्थातच राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. बी.एल.घायाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक जनार्दन गुपिले,मलखांब प्रशिक्षक स. कुलदीपसिंग जट,पर्यवेक्षक प्रा.यु.सी. चंदेल, प्रा.शशिकांत हटकर,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एल. घायाळ व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवछत्रपती क...
Biloli-Degalur ; बिलोली-देगलूर तालुक्यातील आढावा बैठका तुर्त लांबणीवर – NNL

Biloli-Degalur ; बिलोली-देगलूर तालुक्यातील आढावा बैठका तुर्त लांबणीवर – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | बिलोली व देगलूर तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी बिलोली तसेचदेगलूर येथे आयोजित आढावा बैठका (जनता दरबार) काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या असून 30 व 31 ऑगस्ट रोजीचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. बिलोली-देगलूर तालुक्यातील विकास कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बिलोली आणि देगलूर येथे दुपारी 3 वाजता विकास कार्य आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव यादोन्ही बैठका तुर्त पुढे ढकलण्यात आल्या आहेत.बिलोली व देगलूर तालुक्यातील भाजपा-महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे....
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा – NNL

करियर, स्पोर्ट्स
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. दि. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. जनार्दन गोपिले हे होते. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आयुष्यातील केलेला संघर्ष व भारताचे नावलौकिक वाढविण्यात दिले गेलेले योगदान याबद्दल श्री. गोपीले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजचा तरुण हा भारताचे भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणांनी शारीरिक सुदृढ असणे आवश्यक आहे. रोगापासून वाचवायचे असेल तर प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळला...
Man, woman die of gastro in Both : बोथ येथील महिलेसह पुरुषाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू -NNL

Man, woman die of gastro in Both : बोथ येथील महिलेसह पुरुषाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील बोथ येथे गॅस्ट्रोमुळे एका महिलेसह पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जुलाब उलटी या आजाराने ग्रस्त असून आरोग्य विभागाची टीम उपचार करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी बाजार केंद्रांतर्गत येत असलेल्या खंबाळा उपकेंद्रातील बोथ येथील दोन जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती अभावी एक वर्षापासून धूळ खात पडून आहेत. नाईलाजास्तव गावकऱ्यांना एकाच बोर वरील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. भर पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाणी पिल्याने कल्पना मारुती आत्राम वय ३७ यांना जुलाब व उलटी झाल्याने मांडवी येथील रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात सांगितले होते. उपचारासाठी नेत असताना मध्यरात्री दोन वाजता आदिलाबाद जवळ त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे व दीर असा परिवार आहे. तर बोथ येथे पाहुणे म्हणून आलेले परशा तोडसाम वय ...
Ram Gadhe Patil : लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..! राम गाढे पाटील यांनी पुरविला लेकीचा बालहट्ट -NNL

Ram Gadhe Patil : लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..! राम गाढे पाटील यांनी पुरविला लेकीचा बालहट्ट -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील आनंदनगर भागातील फायनान्शियल ॲडव्हायझर राम गाढे पाटील यांनी त्यांच्या सहा वर्षीय कन्येच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीच्या बालहट्टा खातीर रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. याविषयी सविस्तर वृत्त असे की राम गाढे पाटील यांची कन्या अयोध्या हिचा २७ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त कुमारी आयोध्या हिने वडिलांकडे इच्छा व्यक्त केली ती म्हणजे ती म्हणाली की,पप्पा तुम्ही पण माझ्या बर्थडेला ला रक्तदान करा ना, लोकं कसे राजकारणी लोकांच्या बर्थडे ला ला रक्तदान करतात..तिच्या या बाल मनाच्या इच्छे खातीर वडिलांनी मुलगी अयोध्या च्या जन्मदिवशी जिजाऊ ब्लड बँक शिवाजीनगर येथे स्वतः आपल्या कन्या समवेत जाऊन रक्तदान करून समाजापुढे एक नवा पांयडा प्रस्थापित केला आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही केले होते अयोध्या हिचे कौतुक ...! मनोज जरांगे पाटील यांच्या जूलै महिन्यातील नांदेड दौऱ्या...
film acting lessons in the university : विविध राज्यातील विद्यार्थी घेत आहेत विद्यापीठात चित्रपट अभिनयाचे धडे -NNL

film acting lessons in the university : विविध राज्यातील विद्यार्थी घेत आहेत विद्यापीठात चित्रपट अभिनयाचे धडे -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| उत्तरांचल, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, उत्तरप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून आलेले विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात चित्रपट अभिनयाचे पाठ गिरवत आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही विद्यार्थी आनंदाने अभ्यास करत आहेत. पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात चित्रपट प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात चित्रपट विषयक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. एफटीआयआय सीएफओएलचे एक्झेकेटिव्ह हेड संदीप शहारे आणि कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी बुधवार (दि.२८) रोजी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी हृद्य संवाद साधला. चित्रपट माध्मम...
Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जीवनात संगत कुणाशी करायची, सोबती कोण आहे, कसा आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, असंगाशी संग करून आपले जीवन, आपले आयुष्य उध्वस्त होईल, अशी वर्तणूक करू नका, वाईटाची संगत सोडा, त्याचेही जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा, तो ऐकत नसेल तर त्याचा त्याग करा, अन्यथा तुमचे जीवन अधोगतीच्या मार्गावर जाईल,असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवशी केले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी या कथावाचनाची अत्यंत भक्तीभावाने सांगता झाली. गुरुवारी शिवमहापुराण कथेच्या सातव्या दिवशी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेचा महिमा, महात्म्य आणि शिवजींच्या साक्षात्काराची महती कथन केली.कलयुगात सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी कथा म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. वाईटाची संगत वाईटच असते,ज्याप्रमाणे आपण अग्नीला स्पर्श केला, तिच्या जवळ गेलो तर आगीचा चटका बसतो...
error: Content is protected !!