Meenal Karanwal : नांदेड जिल्हयात स्वच्छ माझे अंगण अभियान: घरगुती स्वच्छतेला प्रोत्साहन -NNL
नांदेड| स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत "स्वच्छ माझे अंगण" हे महत्त्वपूर्ण अभियान नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त (ओडीएफ) मॉडेल गावे तयार करणे आणि घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे.
वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रभावी अंमलबजावणी हे या अभियानाचा उद्देश आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल. गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील सर्व गावांचे नियोजन करून नागरिकांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांच्या माध्यमातून अभियानाची माहिती ग्रामस्थाना देण्यात येणार...









