Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Shri Bhagwan Mahavir ; श्री भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समिती गठीत – NNL

Shri Bhagwan Mahavir ; श्री भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समिती गठीत – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 24 वे जैन तीश्री भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समिती गठीत र्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या मंत्री तथा समिती अध्यक्ष मंडलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक 7 ऑगस्टला मंत्रालयात संपन्न झाली. त्यामध्ये महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय समितीच्या दिशादर्शकानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमांचे आयोजन व त्यासंबंधी विविध शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन, जैन संघ यांच्याशी समन्वय करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र 28 ऑगस्ट रोजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशाने काढले आहे. यामध्ये शिवप्रसाद सुराणा, क...
MLA Bhimrao Keram ; सरसकट शेतकरी व बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने सानुगृह अनुदान मंजूर करावे – आ. भीमराव केराम – NNL

MLA Bhimrao Keram ; सरसकट शेतकरी व बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने सानुगृह अनुदान मंजूर करावे – आ. भीमराव केराम – NNL

नांदेड, राजकीय
 किनवट, परमेश्वर पेशवे| 31 ऑगस्ट पासून किनवट माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले तर वादळी वाऱ्यात अनेकांच्या घरांची पडझड होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकरी व बेगर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे. निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी किनवट व माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील चोवीस तासात 180 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन कापूस सोयाबीन ज्वारी तूर मूग उडीद अशा उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. नदी व नाल्याकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरून पिकासह ...
Jijau Srishti CIDCO Plantation ; मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन निमित्ताने जिजाऊ सृष्टी सिडको वृक्षारोपण – NNL

Jijau Srishti CIDCO Plantation ; मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन निमित्ताने जिजाऊ सृष्टी सिडको वृक्षारोपण – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| मराठा सेवा संघाचा ३४ व्या वर्धापान दिनानिमित्त जिजाऊ सृष्टी सिडको येथे जिजाऊ माता येथे वंदन करून क्षेडावंदन करून वृक्षारोपण करण्यात आले. १ सप्टेंबर मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन निमित्ताने सिडको हडको मराठा सेवा संघाचा वतीने अध्यक्ष दिलीप कदम, उपाध्यक्ष साहेबराव गाढे, सहसचिव वसंत कदम, कोषाध्यक्ष एकनाथ पाटील व पदाधिकारी यांनी प्रारंभी जिजाऊ सृष्टी येथील जिजाऊ माता यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यानंतर जिजाऊ सृष्टी येथे वृक्षारोपण केले....
CIDCO cremation ground ; सिडको स्मशान भुमित नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील मृत्यू पावलेल्या मयतावर अंत्यसंस्कार – NNL

CIDCO cremation ground ; सिडको स्मशान भुमित नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील मृत्यू पावलेल्या मयतावर अंत्यसंस्कार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| गोदावरी नदीच्या पाण्याचा पात्रत वाढ झाल्याने विष्णुपूरी येथील जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या अनेक स्मशान भुमित चोहोबाजूंनी पाण्याने घेरल्याने नावामनपाचा सिडको येथील स्मशान भुमित शहरातील व परिसरातील मृत पावलेल्या जवळपास सहा महिला पुरूष यांच्या वर २ व ३ सप्टेंबर रोजीअंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नावामनपाचा हद्दीत असलेल्या व नदीकाठच्या लगत असलेल्या शांतीधाम,शनिघाट,जुना कौठा,वसरणी मरघाट चौफाळा, व शहरातील अनेक भागात नदीकाठी असलेल्या स्मशान भुमीत शहरी व ग्रामीण भागातील मृत्यू पावलेल्या मयतवार अंत्यसंस्कार करण्यात येत होते, परंतु गेल्या दोन दिवसापासून गोदावरी नदीला वाढलेल्या पाण्यामुळे जवळपास सर्वच स्मशान भुमी पाण्याखाली गेल्याने सिडको येथील स्मशानभुमित २ व ३ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यात ति...
Amdura, Vasrani bridge under rural police station limits closed for traffic ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अमदुरा,वसरणी पुल वाहतुकीसाठी बंद – NNL

Amdura, Vasrani bridge under rural police station limits closed for traffic ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अमदुरा,वसरणी पुल वाहतुकीसाठी बंद – NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वाजेगाव मुदखेड मार्गावरील अमदुरापुल व वसरणी भागातील पुल गोदावरी नदीला आलेल्या महापुरा मुळे बंद करण्यात आला असून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वसरणी येथे मनपाच्या वतीने बॅरीकेटस लावण्यात आले असून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला असून धनेगाव मुजामपेठ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नदीकाठच्या मुजामपेठ भागातील अनेक कुटुंब जिल्हा परिषद शाळेत स्थालंतरीत करण्यात आले आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरा मुळे गेल्या दोन ते दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीचे पाणी अनेक वसाहती मध्ये घुसले असून ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव अंतर्गत अदनान मंगल कार्यालय परिसरातील सुर्या गार्डन परिसरातील रोड वर मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने पाण्याखाली रोडगेल्याने जाणे येणे बंद झाले होते,अखेर पाण्याचा निपटारा जेसीबीचा साह्याने केला...
Support for new laws..! पिडीत महिला व बालकांच्या संरक्षणार्थ.. नव्या कायद्यांचे पाठबळ..! -NNL

Support for new laws..! पिडीत महिला व बालकांच्या संरक्षणार्थ.. नव्या कायद्यांचे पाठबळ..! -NNL

नांदेड, क्राईम
मुंबई| महिला व बालकांच्या संरक्षणासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अत्याचारग्रस्त पीडित महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हेगारांवर ‘कायद्याचा धाक’ राहणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे अंमलात आणले आहेत. या कायद्यांतील विविध कलमांन्वये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिला व बालकांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे पाठबळ मिळणार आहे. केंद्र शासनाने भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा कायदा 1972 या कायद्यांऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय पुरावा कायदा 2023 व भारतीय नागरी संरक्षण संहिता कायदा 2023 अंमलात आणला आहे. या सर्व नवीन कायद्यांची 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.  भारतीय न्याय संहितेमध्ये कलम 69 अन्वये महिलांवरील अत्याचाराबाबत आणखी एक नवीन कलम समावि...
heavy rains and floods : अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी -NNL

heavy rains and floods : अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिगोली जिल्हयात अनेक ठिकाणी अतीवृष्टी आणिपूरग्रस्त भागाच्या पाहणी नंतर केली. मागच्या तीन-चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेती पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. चांगल्या भरात असलेले सोयाबीन, काढणीस आलेला मुग, उडीद, तसेच तुर, हायब्रीड ज्वारी ऊस, केळी यासह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेल्याने जमीन नापीक बनली आहे. अतीवृष्टीने नंतर आलेल्या पुरामुळे अनेक शहरात व गावात पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे. जीवनावश्यक वस्तुची नासाडी झाली आहे. अनेक परिवारांच्या समोर उपजिविकेचा...
Reverend Balayogi Venkat Swami : पुढील वर्षी स्वतःहून “ओम नमः शिवाय” यज्ञात जास्तीत जास्त सद्भक्तांनी सहभागी व्हावं – परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी -NNL

Reverend Balayogi Venkat Swami : पुढील वर्षी स्वतःहून “ओम नमः शिवाय” यज्ञात जास्तीत जास्त सद्भक्तांनी सहभागी व्हावं – परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| पुढील वर्ष ओम नमः शिवाय....नामजपाचे तिसरं वर्ष आहे. यंदा या जपामध्ये तुम्हाला सामील करून घेण्यासाठी महान घ्यावी लागली. पुढील वर्षी स्वतःहून श्रावण महिन्यात आयोजित होणाऱ्या ओम नमः शिवाय यज्ञात जास्तीत जास्त पुरुष व महिलांनी सहभागी होऊन पुण्यकर्म पदरी पडून घ्यावं. असा दिव्या संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी देऊन समारोपाला उपस्थित झालेल्या सर्वाना खूप खूप आशीर्वाद दिले. संबंध भारतात एकमेव समजल्या जाणाऱ्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ओम नमः शिवाय नामजाप यज्ञाचा शुभारंभ दि.०५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ०६ वाजता परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. ७१ वर्षाने आलेल्या श्रावण महिना सोमवारी आणि समारोप देखील सोमवारी होत असल्याने या महिनाभर अखंडपणे नामजप यज्ञ करण...
Dr. Ajit Gopchde : घरेलू गोबरगॅस दुग्धविकास क्लस्टर योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे – खा.डॉ.अजित गोपछडे -NNL

Dr. Ajit Gopchde : घरेलू गोबरगॅस दुग्धविकास क्लस्टर योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे – खा.डॉ.अजित गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकरातून अंमलात आलेली घरेलू गोबरगॅस दुग्धविकास क्लस्टर योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी होऊन या शासकीय योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन खा.डॉ.अजित गोपछडे यांनी शेतकरी बैठकीत केले. खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या निवासस्थानी सोमवारी आयोजित शेतकरी बैठकीत ते बोलत होते.नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पशूपालक शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या पशूधनापासून मिळणारे दूध आणि गोमय-शेण यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल, असा आशावाद व्यक्त करून खा.डॉ.गोपछडे यांनीदुग्धव्यवसायात नांदेडच्या शेतकरी बांधवांनी संघटितपणे सहकारातून श्वेतक्रांती घडवावी, प्रशासना...
Youth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून देवसरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली -NNL

Youth leader Madhavrao Patil Devsarkar : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून देवसरकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा युवा नेते माधवराव पाटील देवसरकर यांनी केला. हिमायतनगर तालुक्यातील धानोरा, वारंग, टाकळी या गावांमध्ये भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने या भागात अतिवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आणि शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालवणेही कठीण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या गंभीर परिस्थितीत स्थानिक आमदारांनी अद्यापपर्य...
error: Content is protected !!