HomeनांदेडAmdura, Vasrani bridge under rural police station limits closed for traffic ;...

Amdura, Vasrani bridge under rural police station limits closed for traffic ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अमदुरा,वसरणी पुल वाहतुकीसाठी बंद – NNL

नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वाजेगाव मुदखेड मार्गावरील अमदुरापुल व वसरणी भागातील पुल गोदावरी नदीला आलेल्या महापुरा मुळे बंद करण्यात आला असून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वसरणी येथे मनपाच्या वतीने बॅरीकेटस लावण्यात आले असून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला असून धनेगाव मुजामपेठ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नदीकाठच्या मुजामपेठ भागातील अनेक कुटुंब जिल्हा परिषद शाळेत स्थालंतरीत करण्यात आले आहे.

गोदावरी नदीला आलेल्या महापुरा मुळे गेल्या दोन ते दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीचे पाणी अनेक वसाहती मध्ये घुसले असून ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव अंतर्गत अदनान मंगल कार्यालय परिसरातील सुर्या गार्डन परिसरातील रोड वर मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने पाण्याखाली रोडगेल्याने जाणे येणे बंद झाले होते,अखेर पाण्याचा निपटारा जेसीबीचा साह्याने केला तर गोदावरी नदीकाठाचा जुने मुझामपेठ,भागातील अनेक निवासस्थानी पुराच्या पाण्याने वेडा घातल्याने घरातील नागरीक यांच्यी मुजामपेठ शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे, ग्रामपंचायत धनेगाव ग्रामविकास अधिकारी व्ही.पी. सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य शेख गफुर, तातेराव ढवळे, शिवाजी बुचडे,अब्दुल गफुर,शेख फारूक,
सामाजीक कार्यकर्ते शेख एजाज, कर्मचारी,शेख मुख्तार, महमंद ईलायास,सयद यासिन, यांनी सहकार्य केले, शाळेत पुरग्रस्तांनाअन्नदान वाटप करण्यात आले.

वाजेगाव परिसरातील जुना पुलालगत असलेल्या तिर्थक्षेत्र असलेल्या अळणीबुवा मठसंस्थान परिसराला चोहोबाजूंनी पाण्याने वेढा घातला असुन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रावसाहेब महाराज हे येथे मुख्य पुजारी आहेत, राहेगाव येथे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बॅक वॉटर मुळे भायेगाव येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने जाणे येणे बंद झाले आहे. नांदेड वाजेगाव मुदखेड मार्गावरील अमदुरा पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावर जाणारी येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.तर दुध डेअरी वसरणी मार्ग साईबाबा कमान हा रस्ता आज सकाळ पासून बंद करण्यात आला.

गोदावरी नदीला आज मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या अनेक भागातील अनेक वसाहतील भागात पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील नावघाट, वसरणी,अमदुरा, येथे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांच्या बंदोबस्त लावण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments