Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
The pain of the farmers: होत्याचं नव्हतं झालं हो…..अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वेदना -NNL

The pain of the farmers: होत्याचं नव्हतं झालं हो…..अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वेदना -NNL

नांदेड, राजकीय
अर्धापूर| जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात 31 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर मागील 72 तासापासून कायम असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना महापूर आला आहे. गावाला शहराशी जोडणारे प्रमुख रस्त्यावरचे नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील शेलगाव बुद्रुक, शेलगाव खुर्द, सांगवी, भोगाव, देळुब खुर्द, या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. आजही शेलगाव या गावचा संपर्क तुटलेलाच आहे. अनेक गावातील शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते तर नदीकाठचे शेतीतले पिके कापूस, सोयाबीन, मूग, हळद, ऊस, केळी व पालेभाज्या हे पिके खरडून गेली. मागील 72 तासापासून पिकात पाणी असल्यामुळे पिके सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांचा निर्माण झाली. यावर्षी सोयाबीन व इतर पिकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येत होती परंतु या तीन दिवसाच्या पावसाने होते त्याचे नव्हते केले म्हणून या भागातील शेतीच्या ...
Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीतून नांदेडमध्ये पून्हा गळती सुरुच ! – NNL

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीतून नांदेडमध्ये पून्हा गळती सुरुच ! – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारत राष्ट्र समितीचे नेते बालाजी शेळके यांनी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसन्मान यात्रेदरम्यान नांदेड दौर्‍यावर आल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी बालाजी शेळके यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन जून्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी त्यांना तात्काळ पक्ष प्रवेशासाठी विचारणा करून प्रवेश देण्यात आला. यावेळी पक्षाचे मराठवाडा प्रभारी आ.विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार,प्रा.गोविंद मेथे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,अजितदादा पवार व माजी मंत्री कमलकिशोर कदम ...
285 guests traveled half a km by boat for the funeral : पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांच्या अंत्यविधीसाठी अर्धा किमी नावेतून 285 पाहुण्याने केला प्रवास -NNL

285 guests traveled half a km by boat for the funeral : पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांच्या अंत्यविधीसाठी अर्धा किमी नावेतून 285 पाहुण्याने केला प्रवास -NNL

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने सर्वत्र नदी नाले भरून वाहत आहेत. नदीच्या पुराचे पाणी पिंपरी गावच्या रत्स्यावर आल्याने कामारी ते पिंपरी गावचा तीन दिवसापासून संपर्क तुटला आहे. दरम्यान पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांचा निधन झाल्याने आज अंत्यविधीसाठी आलेल्या 285 पाहुण्याने चक्क अर्धा किमी नावेतून प्रवास करून उपस्थिती लावली आहे. त्यामुळे येथील पुलासह रत्स्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दरवर्षी या गावचा पुराच्या पाण्याने संपर्क तुटतो यावर राजकीय नेते व शेणाने उपाय काढून पुलासह उंच मजबूत रास्ता करून द्यावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आला आहे. केदारनाथ कडून लाखाडी नदी ही कामारी जवळ पैनगंगेला येऊन मिळते येथे नदीचा संगम झाल्याने पैनगंगेचे पाञ भरले की लाखाडी नदीचे पाणी पाञात जात नाही. त्यामुळे कामारी जवळील लाखाडी नदी पुराच्या...
Osmannagar area ; उस्माननगर परिसरात पावसामुळे शेतात पाणीच पाणी , पिकांचे नुकसान – NNL

Osmannagar area ; उस्माननगर परिसरात पावसामुळे शेतात पाणीच पाणी , पिकांचे नुकसान – NNL

कृषी, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे | शनिवारच्या मध्यरात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. रविवारीही दिवसभर पावसाने झोडपले दोन तीन दिवस झालेल्या संततधार व जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे शेतात पाणीच पाणी झाल्याने खरिपाचे पिके खरडून गेली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यासह उस्माननगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीने व पुरामुळे अनेकांची शेती खरडून व सखल भागातील पिकात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे घरांची ही पडझड झाली आहे. ‌‌ कंधार तालुक्यातील उस्माननगर सह परिसरात रविवारी दि. १ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी चहूकडे झाल्याने खरिपाचे पिक पाण्याने खरडून नेले आहे. या पावसामुळे परिसरात पुरपरिस्थितीने नदी नाल्यांना पूर येऊन जमिनी खरडून, व सखल भागातील शेतातील पिकात पाणी साचून परिसरातील शिवारातील पिकांचे मोठे नुकसान ...
Kamari village flooded due to heavy rain water : अतिमुसळधार पावसाच्या पाण्यामुळे कामारी गावाला पुराचा वेढा; पिंपरीचा संपर्क तुटला – NNL

Kamari village flooded due to heavy rain water : अतिमुसळधार पावसाच्या पाण्यामुळे कामारी गावाला पुराचा वेढा; पिंपरीचा संपर्क तुटला – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ - मराठवाड्याच्या सीएमवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आल्याने लाखाडी नदीही दुथडी भरून गेली आहे. या पुराच्या पाण्याने मौजे कामारी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या ठिकाणी लाखाडी, कयाधू आणि पैनगंगेचा संगम असल्याने गावातील हनुमान मंदिरासह अनेक दुकाने पाण्यात गेली आहेत. एवढेच नाहीतर पुराच्या पाण्याने परिसरातील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापूस, हळद उसासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत एकही पुढार्यांनी किंवा महसूल अधिकारी कर्मचारयांनी गावाला भेट देऊन साधी विचारपूस देखील केली नसल्याने खंत शेतकरी, नागरीकातून व्यक्त केला जात आहे. कयाधू नदीसह पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने बाजूलाच असलेल्या पिंपरी गावच्या रस्त्यावर पाणीच पाणी आले असून, वीरसनि आणि कामारीच्या मध्यभागी असल्याने पिंपरी आणि विरसनी गावचा तीन द...
CM cheated ST workers – Prakash Marawar : मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना फसविले – प्रकाश मारावार -NNL

CM cheated ST workers – Prakash Marawar : मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना फसविले – प्रकाश मारावार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| एसटी कामगारांचे प्रश्न 20 ऑगस्ट पर्यंत सोडविण्याचे आश्वासन देऊन न पाळणे म्हणजेच एसटी कामगारांना फसविण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे टीका एसटी सेनेचे विभागीय सल्लागार प्रकाश मारावार यांनी कृती समिती तर्फे आयोजित केलेल्या संप.धरणे आंदोलनात केली. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ. घर भाडे. 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता. सह इतर प्रश्न संदर्भात महाराष्ट्रातील तमाम एसटी बांधवा तर्फे कृती समिती स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार पत्र व्यवहार.मंत्र्याचे बैठका. मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सचिवस्तरीय 20 ऑगस्टपर्यंत घेण्याच्या आश्वासन देऊन सुद्धाशब्द न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यातील डेपोतून एकही लाल परी सुटली नाही. एसटी कामगार कृती समिती संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करून एसटी बंद पाडले. नांदेड बस स्थानकामध्य...
Nine Gates of Upper Manar Limboti Dam Opened : ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे सुरू; १५ हजार क्युसेक्स पाण्याचा निसर्ग -NNL

Nine Gates of Upper Manar Limboti Dam Opened : ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे सुरू; १५ हजार क्युसेक्स पाण्याचा निसर्ग -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| तालुक्यातील लिंबोटी येथील ऊर्ध्व मानार धरणाच्या बुडीत क्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला त्यामूळे सुरु असलेल्या तेरा दरवाजा पैकी सोमवार (ता .२ सप्टें) पहाटे पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास ५ दरवाजे बंद करण्यात आले. तेव्हापासून सायंकाळी सात वाजे पर्यंत नऊ गेट मधून मन्याड नदी पात्रात १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता असे उर्ध्व मानार पाटबंधारे उपविभाग लोहा चे उपअभियंता श्री फुलारी यांनी माहिती दिली शनिवार रात्री पासून पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील लिंबीटी स्थित .ऊर्ध्व मानार धरणाचे रविवारी सायंकाळी सहा वाजल्या पासून तेरा दरवाजे ०.४८ मीटरने उचलण्यात आले होते.त्यातून ६०० क्युमेक्स म्हणजे २२हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मन्याड नदीपात्रात केला जात होता. सोमवारी . पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटे चहाटे पाऊणे चार वाजता धरणाचे ५ दरवाजे बंद करण्यात आले - नऊ दरवाजातून ...
Inspection by mla. Mohan Anna Humbarde : आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची सोनखेड – शेवडी या अतिवृष्टी भागात पाहणी -NNL

Inspection by mla. Mohan Anna Humbarde : आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची सोनखेड – शेवडी या अतिवृष्टी भागात पाहणी -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| तालुक्यातील सोनखेड व शेवडी मंडळात अतिवृष्टी झाली .नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहिले. गोदाकाठ च्या भागात शेकडो एकर पीक पाण्याखाली गेले .सोनखेड सर्कल मध्ये आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी पाहणी केली शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत घ्यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जिल्ह्यासह लोहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी सोनखेड सर्कल मधील पळशी, शेवडी शेवडी तांडा, व शिवणी (जा) या गावांना भेटी दिल्या .प्रत्यक्ष बांधावर ,शेतात जाऊन त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची, भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांनाधीर दिला. घाबरू नका, नुकसान भरपाई मिळावी यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे आश्वासित केल. शेतीतील पिकांचे नुकसान भरपाई शासनाकडून व विमा कंपनी कडून देण्याची हम...
Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता .लोहा येथील भूमिपुत्र " नायक " व्यंकटी भगवान ताटे यांनी भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व परभणी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दि . ४ सप्टेंबर बुधवारी रोजी भव्य सत्काराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प.नागोराव महाराज भोसले गुरूजी ( मानखेड ) यांच्या किर्तनाचे आयोजन सकाळी ९ ते ११ या वेळेत आहे .या प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.संभाजी नवघरे यांची उपस्थिती लाभणार आहे तर या भव्य दिव्य नागरी सत्काराला प्रमुख पाहूणे म्हणून कॅप्टन प्रकाश कस्तूरे , कॅप्टन किशन कपाळे , कॅप्टन संजय कदम, कॅप्टन शिवाजीराव जाधव , कॅप्टन विठ्ठलराव कदम (अध्यक्ष जिल्हा सैनिक बोर्ड नांदेड ), निलेश राठोड ( शौर्य अॅकेडमी नांदेड ), सचिन गोमासे ( शौर्य अॅकेडमी नांदेड ) यांची उपस्थिती लाभणार आहे. ...
Umrah residents demand ; बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून भरीव द्या उमरा वासीयांची मागणी – NNL

Umrah residents demand ; बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून भरीव द्या उमरा वासीयांची मागणी – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| १ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे व शेतजमिन, पशुधन शेतीउपयोगी औजारे व इतर साहित्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडून अनुदान देण्याची मागणी तालुक्यातील उमरा वासीयांनी माहूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. १ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे उमरा शिवारातील नाल्या ओढ्यांना प्रचंड मोठा महापूर आल्याने उमरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात महापुराचे पाणी वाहून गेल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले. तसेच गोठ्यावर बांधून असलेले पशुधन सुद्धा मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी औजारे व साहित्यांचे नुकसान झाले. तसेच गावातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून या बाबीची तातडीने द...
error: Content is protected !!