Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना व मयत शेतकर्‍याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL

Yash Kharate ; नूकसान ग्रस्त शेतकर्‍यांना व मयत शेतकर्‍याला सरसकट मदत द्या – अॅड.यश खराटे – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यासह इतर तालुक्यात अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी,त्याच बरोबर हिवळणी येथील मयत शेतकरी विलास राठोड यांच्या कुंटूबाला तात्काळ अर्थीक मदत करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे केली आहे. माहूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्ठीने कहर केला आहे.झालेल्या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अशास्थितीत शासनाने सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवासेनाचे जिल्हाप्रमुख अॅड. यश खराटे यांनी केली आहे. पावसाने कहर केल्याने पिकांची अवस्था विदारक झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्याच बरोबर माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथ...
water-borne and insect-borne diseases ; पावसानंतर आता जलजन्य, किटकजन्य आजारांचा धोका – NNL

water-borne and insect-borne diseases ; पावसानंतर आता जलजन्य, किटकजन्य आजारांचा धोका – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड | नांदेड जिल्ह्यात सध्या पाऊस अतिप्रमाणात झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यामध्ये किटकजन्य आजार होतात. या आजारांपासून वाचण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात काविळ, गॅस्ट्रो , लेप्टोस्पायरोसीस, डिसेंन्ट्री, डायरिया तर डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, झिका असे किटकजन्य आजार होतात. या आजारामध्ये लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, अशक्तपणा, उलटी, जुलाब, ताप, पोटात कळमारून शौच येणे, अतिसार, तीव्र सतत डोके व पोट दुखी, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे, त्वचेवर पुरळ उठणे, झोप येणे आणि अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. नांदेड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना आवाहन जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी न...
Poste Ardhapur raided the illegal business ; पोस्टे अर्धापुर यांनी अवैध धंद्यावर छापा मारून 3,50,955/- रू मुद्देमाल केला जप्त – NNL

Poste Ardhapur raided the illegal business ; पोस्टे अर्धापुर यांनी अवैध धंद्यावर छापा मारून 3,50,955/- रू मुद्देमाल केला जप्त – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पोनि श्री चंद्रशेखर कदम, पोस्टे अर्धापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी मागील तिन दिवसांत पोळा सणाचे अनुषंगाने अवैध दारू विक्रेते व धाबा चालवणारे 07 इसमांवर कार्यवाही करून, छापा मारून 3.50.955/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोळा सणाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन अर्धापुर पोलीसांकडुन अवैध दारू विक्रेत्यांमध्ये महाराष्ट्र धाबा, मालेगाव, महाकाली धाबा अर्धापुर येथुन व अवैध दारू विक्रेत्यांकडुन एकुण देशी दारू व विदेशी दारू मिळुन 30.955/-रू चा प्रोव्हिबीशन गुन्हयाचा मुद्देमाल, एक फोर्ड कंपणीची कार किंमती 3,00,000/- रू. एक बजाज कपणीची मोटार सायकल किंमती 20,000/- रू असा मिळुन 3,50,955/- रू चा मुद्देमाल जप्त करून दिनांक 31.08. 2024 रोजी एक ग...
birth of Saint Phulaji Baba ; किनवट तालुक्यातील 33 गावा मधून संत फुलाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा – NNL

birth of Saint Phulaji Baba ; किनवट तालुक्यातील 33 गावा मधून संत फुलाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा – NNL

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील 33 गावामधून श्री परमहंस सद्गुरु फुलाजी बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पटनापूर येथील जन्मोत्सव कार्यक्रम तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा या परिसरात प्रसिद्ध असलेले व तेलंगणा येथील पटनापुर येथे समाधीस्थ झालेले परमहंस संत फुलाजी बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.यामध्ये भजन, कीर्तन ,ध्यानधारणा, महाआरती, व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.हा कार्यक्रम किनवट तालुक्यातील गोकुंदा, टिंगनवाडी ,चिखली खुर्द, थारा, डोंगरगाव(ची) ,बेलोरी धानोरा, सावरगाव, तल्लारी ,जलधरा यासह एकूण 33 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच तेलंगणा राज्य सरकारने पटनापुर येथे या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास विदर्भ, मराठवाडा, व तेलंगणातील लाखोच्या संख...
NCP’s Sharad Chandra Pawar  ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| सतत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पाऊसामूळे किनवट तालुक्यातील अनेक घरात व शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे या अणूषंगाने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे तत्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस श.प.पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे कि, शेतक-यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीत न आणता सरसकट शासनाची मदत जाहीर करण्यात यावी तथा झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेती व घरामध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचा मोबदला नागरीकांना देण्यात य...
हुडी तलावाच्या मेन गेट मधून लाखो लिटर पाण्याची गळती -NNL

हुडी तलावाच्या मेन गेट मधून लाखो लिटर पाण्याची गळती -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट,परमेश्वर पेशवे। हुडी तलावाच्या मेन गेटमधून दिवसा काठी लाखो लिटर पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी केली आहे. मराठवाडा गेल्या कित्येक महिन्यापासून मोठ्या पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र दोन दिवसापासून किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पाटबंधारे उपविभाग किनवट अंतर्गत किनवट तालुक्यातील हुडी, कुपटी, मुरझळा, आप्पारापेठ, नंदगाव, जलधरा, सावरगाव, पिंपळी, अंबाडी, नागझरी, लोणी, वजरा, मांडवी, शिरपूर, वरसांगवी, पिंपळी,आणि डोंगरगाव असे बहुतांश लघू सिंचन तलाव,साठवण तलाव, आणि मध्यम प्रकल्प स्वरूपाचे तलाव एका रात्रीतच भरले गेले आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या हूडी तलावाकडे संबंधित अधिकारी ...
Bail denied to bogus doctor in Sarasam’s botched abortion attempt : सरसम येथील अवैद्य गर्भपात प्रयत्नातील त्या बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन नामंजुर -NNL

Bail denied to bogus doctor in Sarasam’s botched abortion attempt : सरसम येथील अवैद्य गर्भपात प्रयत्नातील त्या बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन नामंजुर -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| तालुक्यातील सरसम येथे गैर मार्गाने अवैद्य रित्या गर्भपात करण्यात येत असल्याच्या माहिती वरून आरोग्य विभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याने जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने सदर आरोपीचा अटकपुर्व जामीन नामंजुर केला आहे. सरसम येथिल सुरेखाई नगर भागात अवैद्य रित्य बनावट वैद्यकिय व्यवसायीका कडुन गर्भपात केला जात असल्याची माहिती काहि दिवसापुर्वी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांना मिळाली होती. बनावट वैद्यकिय व्यवसायीकाच्या हालचालीवर लक्ष ठेवुन असतांनाच दि. १३ ऑगष्टला या भागातील अवैद्य गर्भपाताचा संशय बळावल्याने सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी कारवाई केली. दरम्यान संबंधितास सुगावा ...
Home Guard Registration : होमगार्ड नोंदणीची शैक्षणिक कागदपत्रे, शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळापत्रकात बदल -NNL

Home Guard Registration : होमगार्ड नोंदणीची शैक्षणिक कागदपत्रे, शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळापत्रकात बदल -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील होमगार्डचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज क्रमांकानुसार शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे बोलविण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नांदेड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच प्रशासकीय कारणास्तव 1 ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांच्या वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे. नोंदणी अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संगणक प्रणालीमध्ये सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज क्रमांकानुसार शैक्षणीक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे पुढील नमुद केलेल्या दिनांकाला आवेदन क्रमांकानुसार...
Bullockpola festival is a big celebration : हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या साजरा; ढोल ताशाच्या गजरात काढली मानाच्या बैलजोडीची मिरवणूक -NNL

Bullockpola festival is a big celebration : हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या साजरा; ढोल ताशाच्या गजरात काढली मानाच्या बैलजोडीची मिरवणूक -NNL

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने वाळू लागलेल्या पिकांची चिंता करत असताना दोन दिवसापासून हिमायतनगर तालुका परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी भर पावसात वाजत गाजत नगरपंचायतीच्या मनाच्या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली होती. हर हर महादेवच्या नामाचा जयघोष करून विवाहसोहळा थाटात सपन्न झाला. कृषी प्रधान भारत देशात " बळीराजाचा बैलपोळा " हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येपासून पोळ्याची तयारी केली जाते. येथील युवा शेतकरी जंगल परिसर पिंजून काढून पळसाच्या पानाचा देठवा आणून अन्नदात्या सर्जाराजाची खांदे मळणी करतात. आणि बळीराजाला पोळ्याच्या दिवशीचे जेवणाचे निमंत्रण दिले आहे. शेतात घाम गाळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकर्यांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या (ऋषभराजाचा) ब...
Dr. Vaibhav Nakhate : डॉ. नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन सत्कार -NNL

Dr. Vaibhav Nakhate : डॉ. नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन सत्कार -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील सरसम येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांच्या आरोग्य सेवेची दखल घेत सकाळ माध्यम समुहाने नुकताच एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मान केल्याने डॉ नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला. सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वैभव नखाते काही वर्षा पासुन आरोग्य सेवा करतात, नौकरी म्हणुन याकडे न पहाता रूग्णांना चांगल मार्गदर्शन करत चांगले उपचार करून पुढील उपचाराचा सल्ला, आरोग्यदायी योजनांचा लाभ कुठुन कसा घ्यायचा हे ही समजुन सांगतात.  लहान असो वा मोठा कुठलाही भेद ते करत नाहीत. त्यांच्या स्वभावामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांचा ओघही वाढलेला आहे. दवाखाण्यात हजर असतांना वेळेच बंधन न ठेवता ते सतत सेवा देतात. त्यांनी केलेल्या उपचारातुन हजारो रूग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. यामुळे डॉ...
error: Content is protected !!