Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Water in low lying areas : सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना लायन्सचा डबा -NNL

Water in low lying areas : सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना लायन्सचा डबा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना सर्वात आधी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लायन्सचा डबा पुरविल्यामुळे दिवसभर उपाशी असलेल्या पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. गोदावरी काठावर असलेल्या नांदेड शहराला पुराने वेढले आहे.अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे स्थलांतरण करण्यात आले. सोमवारी चूल पेटलेली नसल्यामुळे सर्वजण उपाशी होते.संध्याकाळपर्यंत कोणतीही मदत मिळाली नव्हती. सर्वात आधी लायन्स परिवार मदतीसाठी धावून आला.गुडघ्यावर पाण्यात जाऊन श्रावस्ती नगर, शनी मंदिर परिसर या भागात वरण भात भाजी पोळी व बुंदीचा समावेश असलेले लायन्सचे डबे वाटप करण्यात आले. यासाठी दिलीप ठाकूर, शिवाजीराव पाटील, सुरेश शर्मा, संतोष भारती, विलास वाडेकर, प्रसाद देशपांडे, सुबोध बोंबिलवार, मनीषा अग्रवाल, निशा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. पूर संपेपर्यंत ला...
Bull Pola festival is celebrated with enthusiasm in Bhokar : भोकर मध्ये बैल पोळा सण उत्सहात साजरा -NNL

Bull Pola festival is celebrated with enthusiasm in Bhokar : भोकर मध्ये बैल पोळा सण उत्सहात साजरा -NNL

नांदेड, कृषी
भोकर| तालुक्यात बैल पोळा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. दोन दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने नदी नाले तुडुंब भरले असून देखील बैल पोळ्यासाठी बाजारपेठ साजल्या होत्या. आजही पावसाने दिवसभर हजेरी लावल्याने बैल पोळा सणाच्या उत्साहात तसूभरही कमी झाला नाही तर उलट शेतकरी आपल्या मित्राला म्हणजेच सर्जा राजाला स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगीं बेरंगी झुल टाकून लग्नासाठी मंदिर परिसरात आणून लग्न लावण्या आले. त्यानंतर आपापल्या घरासमोर त्यांची विधिवत पूजा आरती करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली यात भोकर येथील सधन शेतकरी तथा उदयोजक वसंतराव पाटील आष्टीकर यांनी सहकुटुंब आपल्या सर्जा राजा ची आपल्या घरी पूजा, अर्चा करून त्यांना पुरणपोळी चा नैवेद्य भरवला....
By opening 14 gates : दिग्रस बंधाऱ्याचे 14 गेट उघडून तर विष्णुपुरी चे 14 गेट उघडून गोदावरी नदी पात्रात विसर्ग -NNL

By opening 14 gates : दिग्रस बंधाऱ्याचे 14 गेट उघडून तर विष्णुपुरी चे 14 गेट उघडून गोदावरी नदी पात्रात विसर्ग -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच परभणी हिंगोली या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदेड जिल्ह्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे. वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्याची 14 पैकी 14 गेट संपूर्ण गेट उघडून पाण्याचा विसर्ग चार लाख 31 हजार क्युसेस गोदावरी पात्रात केला जात आहे. त्यामुळे अंतेश्वर बंधाऱ्याचे यापूर्वीच गेट उघडण्यात आले आहे. त्यामुळे या भागात व गोदावरी काठी मोठ्या प्रमाणात शेतात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे नदीपासून दूर अंतरावर नेऊन व्यवस्थित ठिकाणी हलविले असून, जायकवाडी प्रकल्पात 90% च्या वर पाणी पातळी झाली. कोणत्याही क्षणी जायकवाडीचे सुद्धा पाणी येऊ शकते त्यामुळे न...
Nanded heavy rain ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित; 25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला -NNL

Nanded heavy rain ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित; 25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला -NNL

नांदेड, कृषी
·        नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे ·        उद्यापासून होणार पंचनाम्याला सुरुवात ·        93 पैकी 45 मंडळामध्ये धो-धो पाऊस ·        नांदेड शहरात सरासरी 125 मीमी पाऊस ·        पाटबंधारे विभागाची पूर नियंत्रणासाठी पराकाष्ठा ·        पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा नांदेड, अनिल मादसवार। गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.  25 जनावरे मृत्युमुखी 25 जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास शेतीचे व जान...
Mp ashokrao chavan ; खा. अशाेकराव चव्हाण यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थिती, शेती नुकसानीचा आढावा -NNL

Mp ashokrao chavan ; खा. अशाेकराव चव्हाण यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थिती, शेती नुकसानीचा आढावा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीबाबत आपण सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहाेत. जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासनाच्या तातडीच्या बैठका घेऊन सर्व संबंधितांना नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी आज येथे दिली. नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरु आहे. सोमवारी तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. या पार्श्वभूमीवर खा. अशाेकराव चव्हाण यांनी सांगितले, की आज आपण जिल्ह्यातील पूरस्थिती आणि नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर सायंकाळी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहरातील पुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जिल...
Balaji bacchewar ; नायगांवसह जिल्हाभरातील अतिवृष्टीची तातडीने पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या -NNL

Balaji bacchewar ; नायगांवसह जिल्हाभरातील अतिवृष्टीची तातडीने पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नायगांव विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात गत दोन-तिन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत तातडीने पहाणीसह नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी यांना द्यावेत असे साकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांनी निवेदनातून घातले आहे. नांदेड जिल्ह्यातील गत तिन दिवसात मोठ्या प्रमाणात संततधार पावसाने झालेली व संभाव्य आपत्ती निवारणासाठी पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना आज तातडीने ई-मेल द्वारे निवेदनातून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी लक्ष वेधले आहे. गत दोन ते तिन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मूख्यत्वे नायगांव विधानसभा मतदारसंघात संततधार पाऊस सुरु आहे.परंतू,जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी पर्जन्यमान कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. गत काही वर्षातील परिस्थिती पहाता अत...
Sangitatai Dak Patil rushed to help Om : ओमच्या मदतीला धावल्या संगीताताई डक पाटील -NNL

Sangitatai Dak Patil rushed to help Om : ओमच्या मदतीला धावल्या संगीताताई डक पाटील -NNL

नांदेड, करियर
नांदेड| वैद्यकीय प्रवेशासाठी हवा ओम आडकीनेला मदतीचा हात हा विषय नांदेड न्यूज लाइव्हने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षणप्रेमी लोकांपुढे मंडळ होता. याची माहिती संगीताताई डक पाटील यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट ओमच्या पालकांशी संपर्क करून ओम व त्याच्या पालकाला आपल्या कार्यालयात बोलावून घेत ओमच्या यशाबद्दल विठ्ठलमूर्ती देत सत्कार केला. आणि वैद्यकीय प्रवेशासाठी 51 हजार रुपयाची आर्थिक मदत करून मोठ्या मनाचा प्रत्यय दिला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना विविध विषयात सातत्याने संगीताताई डक पाटील व विठ्ठल पाटील डक नेहमी सर्वांना आपल्या परीने मदत करत असतातच परंतु ओम अडकिनेला वैद्यकीय प्रवेशासाठी अवघ्या दोन दिवसात सात लाख रुपयेची रक्कम उभी करायची होती या संदर्भातली सोशल मीडियातून पोस्ट अनेकांपर्यंत पोहोचली अनेक जण आपापल्या परीने मदतही ...
Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

कृषी, नांदेड
शिवणी,भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील शिवणी येथे बैलपोळा भर पाऊसात उत्साहात साजरा सोमवारी सकाळपासून जोराचा पाऊस चालू होता त्यामध्ये बळीराजा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या बैलाला सजवून गावात बैलपोळ्यासाठी घेऊन आला पोळ्याची सुरुवात सोमवार दुपारी 4.30 मिनिटांनी पोळा फिरण्यास सुरुवात झाली. जुन्या परंपरेनुसार आजही प्रथम बैल जोडी फिरवण्याचा मान गावातील मानकरी शंकरराव देशमुख यांना असतो त्यानंतर गावातील सर्व शेतकरी आपले बैल मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालतात यावर्षी बैलपोळ्याला तुफान पाऊस झाल्यामुळे भर पाऊसात पोळा उत्साहात साजरा केला हा पोळा सण साजरा करण्यासाठी गावातील सरपंच ,उपसरपंच , पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी उपस्थित होते...
Shivani apparaopeth ; शिवणी अप्पारावपेठ परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी मागील दोन दिवसात १७७ मिलिमीटर पावसाची नोंद -NNL

Shivani apparaopeth ; शिवणी अप्पारावपेठ परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी मागील दोन दिवसात १७७ मिलिमीटर पावसाची नोंद -NNL

कृषी, नांदेड
शिवणी/ अप्पारावपेठ, भोजराज देशमुख। परिसरात दि.३१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर सलग तिसऱ्या दिवशी सुध्दा अतिवृष्टी परिस्थीती निर्माण झाली आहे यामुळे या परिसरातील नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किनवट तालुक्यातील शिवणी सह अप्पारावपेठ परिसरात दि ३१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या अति मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरामुळे पिके वाहून नेली तर अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. तर ३१ आगस्ट च्या दिवशी झालेल्या पावसाची नोंद १ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत १०२ मिलीमीटर ची नोंद झाली असून १ सप्टेंबर सकाळी पासून दोन सप्टेंबर सकाळपर्यंत ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकंदरीत दोन दिवसांच्या पावस...
15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून 15 वानर झाडावर अडकून पडले असून, त्यांना वाचविण्यासाठी वनविभागाला रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागणार आहे. गेल्या इन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. रविवार च्या रात्रीपासून पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, यामुळे नदी काठावरील परिसरातील शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी काही वानर डोल्हारी परिसरातील शेतीच्या बाभळीच्या झाडावर चढली होती. दरम्यान झाडाखाली पुराचे पाणी आल्याने पाणीच पाणी येऊन बाभळीच्या झाडावर दहा ते पंधरा वानरांची टोळी अडकून पडली आहे. वानर झाडावर अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली मात्र सोमवारी रात्रीपर्यंत वन विभागाचे एकही अधिकारी वानरांना पुराच्या कचाट्यातून ...
error: Content is protected !!