Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Good news for cotton and soybean farmers ; सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! – NNL

Good news for cotton and soybean farmers ; सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! – NNL

कृषी, नांदेड
मुंबई | सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणी बाबतीत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे सं...
Provide immediate financial assistance to the farmers  ; नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – NNL

Provide immediate financial assistance to the farmers ; नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – NNL

राजकीय, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना द्यावेत आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. खासदार डॉ. गोपछडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की. नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पडणार्‍या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. शेतकर्‍यांचे नगदी पीक असलेले मुग  काढणीला आले असताना ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकर्‍यावर ही नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नैसर्गिक...
President Draupadi Murmu ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा  उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती – NNL

President Draupadi Murmu ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा  उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती – NNL

नांदेड, राजकीय, लातूर
नांदेड| लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध...
Collector Abhijit Raut ; शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

Collector Abhijit Raut ; शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्व सूचना कळवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात शिरून पिके जलमय होऊन, पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर इत्यादी कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. वरील नुकसानीची भरपाई ही पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत देण्यात येते. वरील कारणांमुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येत...
Approval for Mumbai-Indore New Railway  ; मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी 309 किमी लांबीचा मार्ग 2028-29 पर्यंत होणार पूर्ण – NNL

Approval for Mumbai-Indore New Railway ; मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी 309 किमी लांबीचा मार्ग 2028-29 पर्यंत होणार पूर्ण – NNL

देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली| मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार  जिल्ह्यांना रेलसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या  प्रकल्पाचा एकूण खर्च ₹18,036 कोटी असून, तो वर्ष 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला आज मंजुरी दिली. ह्या प्रकल्पाव्दारे मनमाड-इंदुर  च्या प्रस्तावित  नवीन व लहान रेलमार्गाने  दोन्ही राज्यांमध्ये व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील तसचे याव्दारे पंतप्रधान नरेंद मोदी यांची “नव भारत” ची संकल्पना  पूर्ण होण्यास मदत होईल  आणि रोजगार/स्वयं...
guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

कृषी, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज  दिले आहे. नांदेड मधील अतिवृष्टीच्या संदर्भात आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील 93 मंडळापैकी 65 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. सध्या पाऊस सुरू आहे.मात्र पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे असे त्यांनी निर्देश दिले आहे. महानगर...
War Honors Scheme ; युद्ध सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

War Honors Scheme ; युद्ध सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

करियर, नांदेड
नांदेड| युध्दात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिकांना, विधवांना एकरकमी 15 लाख युद्ध सन्मान योजनेतर्गंत तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या अनुषंगाने 1965 आणि 1971 च्या युध्दात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि डिस्चार्ज बुकमध्ये समर सेवा स्टार किंवा पूर्वी स्टार/पश्चिमी स्टार मिळाल्याची नोंद आहे अशा माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यत नाव नोंद करावी. तसेच अधिक माहितीसाठी कल्याण संघटक (मोबाईल क्रमांक 8698738998/8707608283) वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. अर्जासोबत माजी सैनिक /माजी सैनिक विधवा यांचे ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकची छायांकित प्रत, पेन्शन स्लीप, शेतजमीन आणि उपलब्ध घराचे क्षेत्रफळ याबाबतचा...
Isapur dam ; इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद नागरिकांनीअफवांवर विश्वास ठेऊ नये – NNL

Isapur dam ; इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद नागरिकांनीअफवांवर विश्वास ठेऊ नये – NNL

हिंगोली, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार (आरओएस) 1 ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार इसापुर धरणाची पाणी पतळी 440.74 मी. इतकी ठेवावयाची आहे. आज 2 सप्टेंबर 2024 रोजी सायं 4 वा. इसापुर धरणाची पाणी पातळी 439.40 मी. इतकी असुन उपयुक्त पाणी साठा 816.75 दलघमी (84.72 टक्के) इतका आहे. सद्यस्थितीत इसापुर धरणामध्ये येणारा पाण्याचा येवा कमी होत आहे व इसापुर धरणाची सर्व वक्रद्वारे बंद आहेत. इसापुर धरणाच्या खालील बाजुस काल 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असुन त्यामुळे पेनगंगा व कयाधु नदीला पूर आला आहे. आज 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 361 हदगाव-उमरखेड रोड वरील मार्लेगाव पुलावरुन पाणी जाण्यास सुरुवात झाली असून नदीने धोकापातळी ओलांडली आहे. सदरची पूरस्थिती ही इसापूर धरणाच्या खालील बाजुस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. सद्यस्...
Kaleshwar temple ; पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मुसळधार पावसातही दर्शनासाठी साठी गर्दी… – NNL

Kaleshwar temple ; पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मुसळधार पावसातही दर्शनासाठी साठी गर्दी… – NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| श्रावण महिन्यातील शेवटच्या पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे हजारो भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शन घेतले यावेळी डॉ. सचिन पाटील ऊमरेकर, डॉ.प्रमोल शंकरराव हंबर्डे, सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे,ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, यावेळी नंदीकाठ तिरावर जीवरक्षक दलासह , पोलीस,होमगार्ड, यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता, विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती, संततधार पाऊस असुनही भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. २ सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याचा शेवटचा पाचव्या सोमवार निमित्ताने पुजारी रामेश्वर अप्पा मह...
error: Content is protected !!