Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Governor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

Governor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी विमानाने आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती. विमानतळावरुन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उदगीर येथील नियोजित कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने प्रयाण केले....
Draupadi Murmu at Nanded Airport : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

Draupadi Murmu at Nanded Airport : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे भारतीय वायुसेनेच्या विमानाने सकाळी 10.25 वाजता आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती....
Dr. Rekhatai Pa. Chavan Gorlegaokar : गणेशोत्सव – २०२४ निमित्त “सुंदर माझा बाप्पा स्पर्धा” जास्तीत जास्त मंडळ व गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा – डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर -NNL

Dr. Rekhatai Pa. Chavan Gorlegaokar : गणेशोत्सव – २०२४ निमित्त “सुंदर माझा बाप्पा स्पर्धा” जास्तीत जास्त मंडळ व गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा – डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव - २०२४ निमित्त "सुंदर माझा बाप्पा स्पर्धा" आयोजित करून गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. जगातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे गणेश उत्सव असून, या उत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या वतीने विविध देखावे, सजावट आणि विविध उपक्रम राबवल्या जातात. गणेश भक्तांच्या उपक्रमांना चालना मिळावी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी हदगाव हिमायत...
Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| शेतकऱ्यांनो...सावधान...नांदेड पोलिसांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे सणासमोर विम्याच्या रक्कमेसाठी आपल्यास खात्यात पैसे टाकण्याकरीता फ्रॉड कॉल करून आपल्याला OPT टाकुन पुन्हा OTP विचारणा करून आपल्या खात्यातील पैसे काढुन घेणारे सक्रिय होतील. यासाठी शेतकरी बांधवानी सतर्क राहणे गरजेचे असून, शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉल पासुन शेतकऱ्यांनो सावधान राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी केले आहे. सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली शेतकरी बांधवानो तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (OTP) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल. जर तुम्ही सांगितलेल्या लिंकवर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. ज्...
भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने दामोदर मावजोना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा – देविदास फुलारी यांची मागणी -NNL

भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने दामोदर मावजोना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा – देविदास फुलारी यांची मागणी -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड। ज्ञानपीठ हा अतिशय सन्मानाचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असून, तो भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जातो. इ. स. 1944 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती साहू शांतीप्रसाद जैन यांनी या संस्थेची स्थापना केली. भारतीय भाषांमध्ये अनन्यसाधारण निर्मिती करणाऱ्या लेखकास व त्याच्या एकूणच साहित्यिक कर्तुत्वास हा पुरस्कार दिला जातो. भाषेच्या संदर्भात ज्या लेखकाची अभिवृत्ती औदार्याची आहे. अशाच लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. पण अलीकडे गोव्यातील जेष्ठ कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी गोव्यातील राजभाषा कायद्यात मराठी भाषा नको असे विधान करून भाषावाद तर निर्माण केलाच आहे शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भाषा विकृतीही दाखवून दिली आहे. मावजो हे अतिशय दांभिक लेखक असून उदगीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मराठी प्रेम बोलून दाखवले होते पण ते प्रेम पुतना मावशीचे ठरले. चांगला लेख...
बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते – कृष्णकांत बावा -NNL

बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते – कृष्णकांत बावा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते, त्यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना शक्तीबल आणि प्रेरणा देते असे प्रतिपादन बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशन चे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांनी केले. 1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे आलेला आहे. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडले. संत बाबा बलविंदरसिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती. इंटरनॅशनल फाऊंडेशन ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अश्विनी बावा यांची विशेष उपस्थित होती. यावेळी संत बाबा बलविंदरसिंघ जी,नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,अमनदीपसिंग,कांचन बावा, सुशीलकुमार शीला, अश्विनी बावा यांचा विशेष सत्कार करण्या...
apply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन – NNL

apply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन – NNL

छत्रपती संभाजीनगर, नांदेड
छत्रपती संभाजीनगर | उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. अमृत संस्थेकडून इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार असून इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च...
Prohibition, ban on arms order in effect  ; नांदेड जिल्ह्यात 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०२४ पर्यंत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

Prohibition, ban on arms order in effect ; नांदेड जिल्ह्यात 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०२४ पर्यंत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 4 सप्टेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 4 सप्टेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. ...
Guardian Minister Girish Mahajan  ; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – NNL

Guardian Minister Girish Mahajan ; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सुनेगाव शिवारामध्ये भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. रविवारी जिल्हयातील 93 मंडळापैकी 68 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान महसूल यंत्रणा कामी लागली असून जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची नेमकी अंदाजित आकडेवारी उद्यापर्यंत पुढे येण्याची शक्यता आहे. आज पाहणी करत...
President Draupadi Murmu ; तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देऊन आज घेणार दर्शन – NNL

President Draupadi Murmu ; तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देऊन आज घेणार दर्शन – NNL

राजकीय, नांदेड
नांदेड| भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवार 4 सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायं 5.15 वा. नांदेड येथील सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेणार आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्...
error: Content is protected !!