Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Give financial assistance : शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची, मनपा हद्दित 25 हजाराची आर्थिक मदत द्या -NNL

Give financial assistance : शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची, मनपा हद्दित 25 हजाराची आर्थिक मदत द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मागील आठवड्यामध्ये नांदेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. तसेच नांदेड शहरात अनेक सकल भागात नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये तर मनपा क्षेत्रात प्रती कुटूंबास 25 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी महेशकुमार वडदकर यांना दि.10 सप्टेंबर रोजी निवेदन देवून करण्यात आली. नांदेड तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग, कापूस, ज्वारी इतर शेतीतील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी तसेच नांदेड महानगरपालिका हद्दित अतिवृष्टीच्या पावसाने घरांचे नुकसान...
Former soldier Ashok Tukaram : माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे दुःखद निधन -NNL

Former soldier Ashok Tukaram : माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरातील गोविंद नगर येथील रहिवासी माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले आहे. अशोक सोनाळे हे भारतीय सैन्यात होते. आज दुपारच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. भारतीय सैन्यात  त्यांनी २२ वर्ष कर्तव्य बजावले आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी त्यांचे राहते घर गोविंद नगर उज्वल इंटरप्राईजेसच्या बाजूला येथून निघणार असून त्यांच्यावर उद्या दिनांक 11 रोजी सकाळी 10:00 वाजता  गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत....
Police action ; देगलुर पोलीसांनी गुटखा व पानमसाला बाळगणारे २ आरोपीतांना केली अटक -NNL

Police action ; देगलुर पोलीसांनी गुटखा व पानमसाला बाळगणारे २ आरोपीतांना केली अटक -NNL

क्राईम, नांदेड
देगलूर/नांदेड। "ऑपरेशन फ्लॅश आऊट" नुसार अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते, त्यानुसार श्री. मारोती मुंडे पोलीस निरीक्षक यांनी पो.स्टे. देगलुरचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले. त्यावरून दिनांक ०९/०९/२०२४ रोजी गोपणीय माहितीगार यांनी दिलेल्या माहितीवरून एक काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल क्र.MH 26 BK 8957 वर दोन संशयित इसम बॅगमध्ये उदगीर रोडने देगलुर कडे येत असल्याने त्यांना देगलुर कॉलेजजवळ मेन रोडवर थांबवुन त्यांना विचारपुस करून त्यांचे जवळील बॅगची पाहणी केली असता मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित पानमसाला व गुटखा मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मो. मुजम्मील अब्दुल खालेक ...
Panchayat Samiti : 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे -NNL

Panchayat Samiti : 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण व पुनर्वसन योजनेसाठी पात्र झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जिल्हयातील सर्व पंचायत समितीला पाठवलेली आहे. या योजनेत अनुदान मंजुर करतो, तुमचे पात्र यादीत नाव टाकतो अशा भुलथापास कोणीही दिव्यांगांनी बळी पडु नये, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. जिल्हयातील सर्व तालुक्यातील दिव्यांग पात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्र. जिपऊ 2018/प्र.क्र.54/वित्त-3 दि. 25 जून 2018 मधील तरतुदीनुसार प्रपत्र-अ मध्ये लाभार्थ्याकडुन भरुन घ्यावयाचा अर्जाचा नमुना व त्यांचे कागदपत्रे (दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बँक पासबुक,रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला 1 लाखापर्यंत, वस्तु खरेदी केल्याची जी.एस.टी. पावती) पंचायत समिती स्तरावर गटविकास अधि...
World Suicide Prevention Day : जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा -NNL

World Suicide Prevention Day : जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी शेतकरी आत्महत्या व तरुणांच्या आत्महत्या कशाप्रकारे थांबवता येतील याबाबत मार्गदर्शन केले. सदर सप्ताहनिमित्त जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रम व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आशा यांच्यामार्फत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त व मानसिक समस्याग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांनी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ओपीडी क्रमांक 35 येथे मोफत समुपदेशन कक्ष कार्यान्वित असून यांचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर ...
Dr. Rekhatai Chavan : हिमायतनगर नगरपंचायत शहरातील सांडपाण्याचे नियोज करण्यात अपयशी – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

Dr. Rekhatai Chavan : हिमायतनगर नगरपंचायत शहरातील सांडपाण्याचे नियोज करण्यात अपयशी – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही घरांची पडझड झाली तर अनेकांच्या घरात चक्क पाणी शिरले. नैसर्गिक संकटाला आपण कोणीही रोखू शकत नाही. परंतु प्रशासनाने जर सुयोग्य नियोजन केलं तर नागरिकांची होणारी गैरसोय व तसेच हेळसांड मात्र रोखता येणं शक्य आहे. हिमायतनगर नगरपंचायत याबाबतीत मात्र अपयशी ठरली असून, शहरातील अनेक घरांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाचे नाल्यातील दुर्गंधियुक्त ड्रेनेजचे पाणी घरात शिरून ग्रुपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसानंतरही पाणी ओसरायचे काही नाव घेत नाही. यामुळे नागरी वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आणि अनेक जण आजारी पडताना दिसून येत आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई चव्हाण या मतदार संघात दौरा करत आहेत. हा दौरा करत असताना त्यांनी...
Apply online only  : मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत -NNL

Apply online only : मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे. यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारला जाणार आहे. कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज देऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. योजनादूत उपक्रमाला नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी यामध्ये 5331 युवकांनी अर्ज ऑनलाईन सादर केले आहेत. तथापि, जिल्ह्यातील काही युवकांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत योजना यामध्ये गोंधळ करुन घेऊ नये. दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच  मुख्यमंत्री योजना दूत योजनेतील नियुक्ती समजली जात आहे. युवकांनी हा गोंधळ करू नये, अद्याप मुख्यमंत्री योजनादूत कार्...
Pranitatai Devare Chikhlikar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लोहा – कंधार तालुक्यात १ लक्ष १८ हजार लाभार्थी – प्राणिताताई देवरे चिखलीकर -NNL

Pranitatai Devare Chikhlikar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लोहा – कंधार तालुक्यात १ लक्ष १८ हजार लाभार्थी – प्राणिताताई देवरे चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्ग लोहा तालुक्यात ६०हजार २७० तर कंधार तालुक्यात ५८हजार ६९२ असे एकूण १ लक्ष १८हजार ९६२ लाभार्थी पात्र ठरले आहेत या बैठकीत ४४ हजार १६४ पात्र लाभार्थ्यांना अपरोव्हल देण्यात आले आहे .जे अर्ज त्रुटीत आहे त्याची पूर्तता करण्यात यावी. तसेच य योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळाला पाहिजे. असे सांगून अधिकारी ,कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे. लोहा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, कंधार नायब तहसीलदार रेखा चामनर, लोहा नायब तहसीलदार अशोक मोकल...
Bharatiya Buddhist Maha Sabha : भारतीय बौद्ध महा सभेच्या तालुकाध्यक्ष पदी पुनच्छ प्रताप लोकडे यांची निवड -NNL

Bharatiya Buddhist Maha Sabha : भारतीय बौद्ध महा सभेच्या तालुकाध्यक्ष पदी पुनच्छ प्रताप लोकडे यांची निवड -NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर,दत्ता शिराणे| दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महा सभा तालूका कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, सर्वानुमते पुनच्छ एकदा प्रताप लोकडे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ८ सप्टेंबर रोजी एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई खंदारे सरचिटणीस रविकिरण जोंधळे सा. ना. भालेराव, विजयमाला नरवाडे, सुभाष नरवाडे, अप्पाराव येरेकार, यांची प्रामूख्यानं उपस्थिती होती. सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा प्रताप लोकडे यांना संधी देण्यात आली. तर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून सौ. छाया संदिप उमरे यांची निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणीत सरचिटणीस सुरेश गडपाळे, उपाध्यक्ष बाबासाहेब मुनेश्वर प्रताप पांडुरंग लोमटे, भाल...
Submit Aadhar card passbook : “संगांनि” श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड पासबुक सादर करावे – तहसीलदार परळीकर -NNL

Submit Aadhar card passbook : “संगांनि” श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड पासबुक सादर करावे – तहसीलदार परळीकर -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक लोहा तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात आणू द्यावेत. असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेचे लाभार्थ्यांना सप्टेंबरपासून महाडीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने तास निर्देश दिले आहेत. आधार कार्ड, बँक पासबुक व सुरू असलेला मोबाईल क्रमांक जो की संलग्न ही कागदपत्रे तहसील कार्यालयात आणून द्यावीत ज्यांनी दिली नाहीत असा लाभार्थ्यांना अनुदान वाटप करताना अडचण येणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय १३ सप्टेंबरपर्यंत या विभागाच्या प्रमुख श्रीमती चाटे यांच्याकडे अर्ज सादर करावेत. सर्व लाभार्थ्यांचे अन...
error: Content is protected !!