Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL

Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL

धार्मिक, नांदेड
लोहा| दैनंदिन जीवनात आपण एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असतो तसेच प्रत्येक नागरिकाने सामंजस्य भावना ठेवून सण उत्सव गणेशोत्सव , ईद व सर्व धार्मियांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. हे करताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा. इतरांच्या भावनेला ठेच पोहचणार नाही. यांची काळजी घ्यावी असे आवाहन लोहा तहसीलदार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. लोहा पोलीस ठाण्यात गणेशोत्स निमितताने शांतता समितीची बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बोलत होते. गणेश उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दी अंतर्गत नागरिकांची शांतता समिती बैठक दि. ६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते. बैठकीस पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,माजी नगराध्यक्ष कि...
Maharashtra Gaurav Award to Digambar Waghmare : माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते दिगांबर वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान -NNL

Maharashtra Gaurav Award to Digambar Waghmare : माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते दिगांबर वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान -NNL

करियर, नांदेड
कंधार/ नांदेड| महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षक दिनाच्या औचित्याने युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्या निमिताने आज दि.10 सप्टेबर रोजी जेष्ट स्वातंत्र सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते कंधार येथिल संपर्क कार्यालयात महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. गेल्या 24 वर्षापासुन दिगांबर वाघमारे यांचे शैक्षणिक कार्य चालू आहे. संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एन. केंद्रे, सचिव चेतन भाऊ केंद्रे, माजी नगराध्यक्षा तथा संचालिका अनुराधा केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्य बजावत आहेत. तसेच ते सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन पुणे येथिल युवा महाराष्ट्...
Planning committee ; किनवट तालुक्यातील नियोजन समितीवर चार भाजपा पदाधिकाऱ्यांची वर्णी -NNL

Planning committee ; किनवट तालुक्यातील नियोजन समितीवर चार भाजपा पदाधिकाऱ्यांची वर्णी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किनवट तालुक्यातील चार भाजप पदाधिकाऱ्यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर घेण्यासंदर्भात दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्हा अधिकारी व सचिव यांना पत्र पाठवून सदरील चार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात कळविले. आदिवासी दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील एकाच वेळी चार सदस्यांना नियोजन समिती घेण्याची ही पहिलीच वेळ असावी आतापर्यंत कुठल्याही शासनाने किनवट तालुक्याला या पद्धतीचा न्याय दिला नव्हता त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्येआनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये खालील भाजप पदाधिकाऱ्यांचा समावेश असून महिला पैकी संध्याताई प्रफुल राठोड, दिनकर बाबुराव चाडावार, व बाळकृष्ण देवराव कदम, अशोक मुकुंदराव नेमानिवार या चौघांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली असून तालुक्याच्या व ग्राम स्तराव...
Shrikant jadhav ; डी.टी.एड.,बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीकांत जाधव (देशमुख) यांची निवड -NNL

Shrikant jadhav ; डी.टी.एड.,बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीकांत जाधव (देशमुख) यांची निवड -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील भूमिपुत्र श्रीकांत जाधव यांची डी.टी.एड.,बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, निवडीबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. महाराष्ट्रातील शिक्षकभरती चळवळीतील एकमेव अधिकृत संघटना डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी श्रीकांत जाधव देशमुख यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांच्या वतीने करण्यात आली या निवडीबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीकांत जाधव देशमुख यांनी  सांगितले की, आगामी काळात संघटनेच्या वतीने अपूर्ण शिक्षकभरती पूर्ण करण्यासाठी व कंत्राटी शिक्षकभरती रद्द करण्यासाठी व शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन कार्य करू.यासाठी लवकरच शासनाच्या वतीने ज्या शाळेत पटसंख्या 20 व त्यापेक्षा कमी आहे. अश्या शाळेत सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जो जीआर क...
Lions kits distribution ; पूरग्रस्तांना भांडे, धान्य, कपडे, छत्रीसह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लायन्स सहायता किट वाटप -NNL

Lions kits distribution ; पूरग्रस्तांना भांडे, धान्य, कपडे, छत्रीसह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लायन्स सहायता किट वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। पूरग्रस्तांसाठी लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने दहा हजार डॉलरची मदत मिळाली असून भांडे,धान्य व कपडे, छत्री सह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लायन्स सहायता किट वाटपाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे आणि लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते नलागुटाचाळ इथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपप्रांतपाल प्रथम आश्विन बाजेरिया, उपप्रांतपाल द्वितीय राहुल औसेकर, प्रांत सचिव रितेश छोरिया, रीजनल चेअर पर्सन तथा प्रोजेक्ट चेअरमन रवी कडगे, कॉर्डिनेटर ॲड. दिलीप ठाकूर हे उपस्थित होते. प्रास्ताविक करताना रवी कडगे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात लायन्स परिवाराची भूमिका विशद केली. डॉ. डोईफोडे यांनी आपल्या भाषणातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या लायन्स परिवाराचे कौतुक केले. लायन्स प्रांतपाल सिसोदिया यांनी लायन्स तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध सेवा प्रकल्पाची सविस्तर माहिती यावेळी दि...
Gorsenaa ; विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोरसेनेचे शासनाला इशारा -NNL

Gorsenaa ; विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोरसेनेचे शासनाला इशारा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट,परमेश्वर पेशवे। नुकत्याच एमबीबीएस प्रवेशप्रक्रीयेला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील विमुक्त जाती अ प्रवर्गात बोगस राजपूत भामटा ने प्रचंड घुसखोरी केली असून विमुक्त जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या तब्बल तिनशे पेक्षा अधिक जागा बोगस राजपूत भामटानी हडप केल्या आहेत यासाठी गोरबंजारा समाजातील अग्रेसर असलेल्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन देऊन ही घुसखोरी थांबविण्याची विनंती केली आहे अन्यथा येणार्या निवडणूकीत विद्यमान सरकारचा सुपडासाफ करण्याचा गर्भीत इशारा गोरसेनेने दिला आहे. सविस्तर बातमीनुसार,विमुक्त जाती अ मध्ये राजपूत भामटा या अत्यल्प लोकसंख्या असलेल्या जातीचा सामावेश असून नाम साधर्म्याचा फायदा घेत सवर्ण राजपूत, मिना,छप्परबंद या खुल्या प्रवर्गातील जनसमुदाय यांनी खुलेआम घुसखोरी करी...
Farmars morcha collecter office ; २३ सप्टेबर रोजी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा – NNL

Farmars morcha collecter office ; २३ सप्टेबर रोजी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा – NNL

नांदेड, कृषी
नांदेड। किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून येत्या २३ सप्टेबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर शेतकरी धडक मोर्चा चे आयोजन कॉ. डॉ. अण्णा भाऊ साठे चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दु. १२.०० वाजता करण्यात आले आहे तरी लाखोच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान जन आंदोलन भारत च्या वतीने सचिन कासलीवाल यांनी केले आहे. या धडक मोर्चाव्दारे शेतकरी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो अशी घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत यात पिक संरक्षण कायदा करण्यात यावा , शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे, जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज द्या. पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करणे तसेच आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने कार्यान्वित करणे व कापूस खरेदी करीता ते १ आक्ट...
child sexual abuse : बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न -NNL

child sexual abuse : बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रत्येक बालकाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. बालकांच्या काळजी व संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या हेतूने नांदेड शहरामध्ये अर्पण फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने दिनांक 4 व 5 सप्टेंबर या कालावधीत दोन दिवसांचे अनिवासी प्रशिक्षण हॉटेल विसावा पॅलेस नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावर आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती जिल्हा 'महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. रंगारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमामध्ये 18 वर्षाखालील बालकांच्या सर्वांगीण हित व सुरक्षेच्यादृष्टीने विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये अर्पण फाऊंडेशनच्यावतीने प्रशिक्षक असलेल्या आरती शिंदे, नेहा व चंद्रीका यांनी बाल लैंगिक शोषणाच्या प्रकारामध्ये सुरक्षित असुरक्षित परिसराबद्दल त्यावर पिडीत बालकास समुपदेशक...
Instructions to Candidates regarding Home Guard Enrollment : होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना -NNL

Instructions to Candidates regarding Home Guard Enrollment : होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना -NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आली आहे. होमगार्ड नोंदणी प्रक्रियेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024  पर्यंत केले होते.  मात्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने होमगार्ड नोंदणी प्रक्रियेमध्ये खंड पडून नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा दिनांक 6 ते 10 सप्टेंबर 2024 या दरम्यान राबविण्यात येत आहे. सदर नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही उमेदवार काही तांत्रिक कारणाने, वैद्यकीय कारणाने, अतिवृष्टीमुळे किंवा अन्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. अशा सर्व ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये आवेदन सादर केलेल्या उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी मिळावी या उद्देशाने दिनांक 9 सप्...
Excessive use of loudspeakers is prohibited : ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई -NNL

Excessive use of loudspeakers is prohibited : ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्‍हाधिकारी कार्यालय व शासकीय दवाखानाच्‍या भोवतालच्‍या 100 मिटर परिसरात ढोल, ताशा, डॉल्‍बी सिस्‍टीम इत्‍यादी कर्णकर्कश वाद्य वाजविण्‍यास तसेच सभेसाठी, भाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्‍वनीवर्धक, ध्‍वनीक्षेपक यांचा वापर हा विहीत मर्यादे (दिवसा सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत 50 डेसीबल व रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत 40 डेसीबल) पेक्षा जास्‍त वारंवारतेने करण्‍यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार याद्वारे प्रतिबंध केले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) अन्‍वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 10 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक तथा ध्‍वनी प्राधिकरण, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळ नांदेड (सदस्‍य, ध्‍...
error: Content is protected !!