नांदेड। जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील भूमिपुत्र श्रीकांत जाधव यांची डी.टी.एड.,बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, निवडीबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.
महाराष्ट्रातील शिक्षकभरती चळवळीतील एकमेव अधिकृत संघटना डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी श्रीकांत जाधव देशमुख यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांच्या वतीने करण्यात आली या निवडीबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीकांत जाधव देशमुख यांनी सांगितले की, आगामी काळात संघटनेच्या वतीने अपूर्ण शिक्षकभरती पूर्ण करण्यासाठी व कंत्राटी शिक्षकभरती रद्द करण्यासाठी व शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन कार्य करू.यासाठी लवकरच शासनाच्या वतीने ज्या शाळेत पटसंख्या 20 व त्यापेक्षा कमी आहे. अश्या शाळेत सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जो जीआर काढला आहे त्यांची संघटनेच्या वतीने राज्यभर होळी करू असे सांगितले.