Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
The crime investigation team : इतवारा उपविभागातील गुन्हे शोध पथकाने अवैध गुटख्यावर छापा मारुन ५८ हजार 277 रुपयाचा मुदेमाल केला जप्त -NNL

The crime investigation team : इतवारा उपविभागातील गुन्हे शोध पथकाने अवैध गुटख्यावर छापा मारुन ५८ हजार 277 रुपयाचा मुदेमाल केला जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मा.श्री अबिनाश कुमार साहेब पोलीस अधिक्षक नांदेड यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्या नुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य धंदयांची माहिती काढुन कार्यवाही करण्या बाबत मा. पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांनी आदेशीत केले होते. दि.09/09/2024 रोजी मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा येथील पथकातील पोना अर्जुन मुंडे, पोकॉ स्वामी, पोकों दासरे, मपोना कोकणे व पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. श्री रमेश गायकवाड, पोना चाउस, पोकॉ कोरनुळे, पोकॉ जगताप, पोकों जावेद यांनी दिनांक 09/09/2024 रोजी अवैद्य धंदयांची माहिती काढुन केसेस करणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. इस्लामपुरा इतवारा नांदेड येथ...
CEO Meenal Karanwal : नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवली जाणार – सीईओ मीनल करनवाल -NNL

CEO Meenal Karanwal : नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवली जाणार – सीईओ मीनल करनवाल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली. या मोहिमेची थीम स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अशी निश्चित करण्यात आली आहे. या मोहीमेत गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जातील. १७ सप्टेंबर रोजी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. या मोहिमेदरम्यान १७ सप्टेंबर ते १ आक्टोंबर या कालावधीमध्ये दर दिवशी गाव स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. मोहीमेत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून द...
Gnantirtha : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग मध्ये होणार -NNL

Gnantirtha : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग मध्ये होणार -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे येत्या ऑक्टोबर मध्ये संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या युवक महोत्सवाला ‘ज्ञानतीर्थ’ असे नाव कायमस्वरूपी देण्यात आले आहे. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार असून, विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थी कलावंतासाठी युवक महोत्सव हे हक्काचं कलापीठ असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा या दृष्टीने विद्...
Teacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

Teacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

करियर, नांदेड
देगलूर,गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील शिक्षक नागनाथ माधवराव चलमले 34 वर्षसेवा बजावुन 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. सेवावृत्तीचे औचित्य साधून चलमले यांच्या मित्र मंडळाने शहापूर येथील विठ्ठलेशवर सभागृहात सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मनोहर धोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत पाटील, माजी आमदार सुभाष साबणे, खुशाल पाटील ऊमरदरीकर, विजय मूडकर, भावी उमेदवार गिरगावकर यांच्या सौभाग्यवती शिवाजी कनकटे, गगारेडी कोटगिरे व देगलूर बिलोली नायगाव परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Teacher died ; सागवी उमर येथील शिक्षक ढगफुटी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने झाले मयत -NNL

Teacher died ; सागवी उमर येथील शिक्षक ढगफुटी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने झाले मयत -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
देगलूर,गंगाधर मठवाले। तालुक्यातील शहापूर येथून जवळच असलेल्या सांगवी उमर येथील शिक्षक हाणमत रामा लघूळे हे बिलोली येथे बहिणीकडे भेटायला जावून परत येत असताना गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री झालेल्या ढगफुटी सारख्या पावसामुळे वनाळी शहापूर मधील नाल्याच्या प्रवाहात पाण्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकल सकट वाहून गेल्याने मयत झाले आहेत. त्यांच्या अकाली निधनाने सांगवी उमर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाच सहा महिण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पवित्र पोर्टल नूसार शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले, आता कुठे त्यांच्या कुटुंबात चांगले दिवस आले होते. नुकतेच शाळेवर सूटी घेऊन गावाकडे आले होते, दरम्यान बहिणीला भेटावयास जावून परत गावी येत असताना अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वनाळी शहापूर मधील नाल्याला महापूर आला. दरम्यान पाण्य...
Manpa CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पूरग्रस्त निवासस्थानाचे तलाठी व वसुली लिपीक यांच्या कडून सर्व्ह – NNL

Manpa CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पूरग्रस्त निवासस्थानाचे तलाठी व वसुली लिपीक यांच्या कडून सर्व्ह – NNL

नांदेड, कृषी
नवीन नांदेडl नांदेड येथे ३ व ४ सप्टेंबर रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुरा नंतर गोदावरी नदीकाठी असलेल्या महानगर पालिका हद्दीत असलेल्या सिडको क्षेत्रीय कार्यालय परिसरातील वसरणी, जुना कौठा ,वाघाळा शाहूनगर भागासह अन्य परिसरातील निवासस्थानी पाण्याखाली व संततधार पावसाने सखल भागात गेलेल्या पाण्यामुळे जिवनाश्यक वस्तू नासधूस झालेल्या घराच्या व मालमत्तेचा सर्व्ह वसरणी,कौठा वाघाळा ,भागात तलाठी व क्षेत्रीय कार्यालय कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सुरू केला असून जवळपास ३०० ते ४०० निवासस्थाने पूरग्रस्त झाले आहेत. नावामनपाचा हद्दीत असलेल्या गोदावरी नदीकाठी भाग व नदी बॅक वॉटर असलेल्या भागासह सखल भागात गोदावरी नदीला आलेल्या महापुरा मुळे प्रभाग क्रमांक १९ व २० मधील वसरणी भागातील पंचवटी, शंकरनगरन,मुरमुरा गल्ली,महेश्वरी भवन परिसर यासह वाघाळा भागातील शाहूनगर भागासह अनेक परिसरातील निवासस्थानी संसार उपयोगी जिव...
Forty retired members and two directors were felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त चाळीस सभासद व दोन संचालकचा सर्व साधारण सभेत सत्कार – NNL

Forty retired members and two directors were felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त चाळीस सभासद व दोन संचालकचा सर्व साधारण सभेत सत्कार – NNL

करियर, नांदेड
नांदेडl नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या ८ सप्टेंबर रोजी आयोजित सर्व साधारण सभेत मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु,सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त ४० सभासद व दोन संचालक यांच्या शाल श्रीफळ देऊन सप्तनीक सत्कार करण्यात आला. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, गुलाम सादेक, मिर्झा बेग,डॉ.रईसौध्दीन,संभाजी कास्टेवाड, रमेश चवरे,रावण सोनसळे,लेखाधिकारी चन्नावार, सदाशिव पंतगे,कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे यांच्या सह मान्य वरांच्यी उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त सभासद श्रीमती पार्वती श्यामराव जाधव, गणेश शिंगे...
Departmental Science Drama : फुलकळस येथील जि .प.केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सासाठी निवड -NNL

Departmental Science Drama : फुलकळस येथील जि .प.केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सासाठी निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड, माणिक भिसे| पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२४ या स्पर्धेचे आयोजन जि. प. शिक्षण विभाग (माध्यमिक) यांनी कन्या प्रशाला परभणी येथे केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा फुलकळस या शाळेच्या 'जल है तो जीवन है' या विज्ञान नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. या विज्ञान नाट्याचे लेखन व दिग्दर्शन डॉ. सिद्धार्थ मस्के यांनी केले. या नाटीकेत प्रमुख भुमीकेत सत्यम शिराळे, समर्थ स्वामी, साईराज गव्हाळे, तनिष्का मोगरे, संध्या शिंदे, स्नेहल मिसाळ, मयुरी कुबडे, वैष्णवी पुरी ह्या विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या विज्ञान शिक्षका अंजली रिंगणे यांनी केले. जिल्ह्यातून ही विज्ञा...
State Govt Tenga to Thirthakshetra Unkeshwar Sharbhang Rishi Ashram : तीर्थक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रमाला राज्य सरकारचा ठेंगा -NNL

State Govt Tenga to Thirthakshetra Unkeshwar Sharbhang Rishi Ashram : तीर्थक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रमाला राज्य सरकारचा ठेंगा -NNL

धार्मिक, नांदेड
किनवट /परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले किनवट तालुक्यातील एकमेव राम वन गमन मार्ग असलेले श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील शरभंग ऋषी आश्रम देवस्थानाची दयनीय अवस्था झाली असून विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारला झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील ग्रामीण 8 देवस्थानाच्या विकासासाठी 275 कोटी रुपये ला मंजुरी दिली. त्यामध्ये मात्र हेमाडपंती तीर्थक्षेत्र उनकेश्वरच्या विकासासाठी एक छदामही राज्य सरकारने निधी दिला नसल्याने किनवट माहूर मतदारसंघात तीव्र नाराजी पसरली आहे. नांदेड जिल्ह्या पासून तब्बल 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या व माहूरच्या पायथ्याशी असलेले गरम पाण्याचे झऱ्याचे तीर्थस्थानकुंड असलेले श्रीक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रम हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, वनवासात असताना त्यांनी येथील शरभंग ऋषी आ...
Tehsildar Kishore Yadav : संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पासबूक मो. नंबर सादर कराव – तहसिलदार किशोर यादव -NNL

Tehsildar Kishore Yadav : संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पासबूक मो. नंबर सादर कराव – तहसिलदार किशोर यादव -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर यापूवी सादर केले नाही त्यांनी संलग्न करणे साठी तहसिल कार्यालय माहूर येथे सादर करावा. सप्टेंबर 2024 पासुन महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याशिवाय सप्टेंबर 2024 चे अनुदान मिळणार नाही याबाबत शासनाचे सक्त नीर्देश आहे. लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्र सह मोबाईल क्रमांक तहसील कार्यालय माहूर येथे सादर करण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पासुन महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर संलग्न करणे साठी ...
error: Content is protected !!