Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
An important decision of the Kinwat Court : कतलीसाठी जाणारे जनावरे गोशाळेतच राहणार; किनवट न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय -NNL

An important decision of the Kinwat Court : कतलीसाठी जाणारे जनावरे गोशाळेतच राहणार; किनवट न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील बोधडी (बु.) येथे जुलै २०२४ मध्ये तीन वहानातून ११ गोवंश , ५ म्हशी व हडी आणि गोमांस नेत असल्याची गुप्त माहिती किनवट पोलिसाना मिळाल्या वरून पोलिसानी सापळा रचून ती वहाने पकडून पशु सह जप्त केले होते. ते परत मिळावे म्हणून शेख ईद्रीस यांनी किनवट कोर्टात अर्ज केला होता. पशु कतलीसाठीच नेत असल्याचे कोर्टात सिद्ध झाल्याने कोर्टाने अर्ज रदद करत गोवंश गोशाळेतच राहातील असा निर्णय दिला आहे . माहे जूलै २०२४ मध्ये बोलेरो पिकप मध्ये ११ गोवंश, दुसऱ्या बोलेरो पिकप मध्ये ५ म्हशी आणि तिसऱ्या एका वाहनात हड्डी आणि गोमांस नेत असताना किनवट पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्या वरून पोलिसानी सापळा रचून बोधडी (बु.) येथे ही वहाने पकडून कारवाई केली होती. वाहानातील ११ गोवंश कृष्णप्रिय गोशाळा किनवट येथे ठेवले व ५ म्हशी देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना ता. हिमायातनगर येथे ठेवले होते...
Darshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन -NNL

Darshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी...
minister Anil Patil : नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील -NNL

minister Anil Patil : नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार – ना. अनिल पाटील -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आजचा दौरा आहे. मी प्रत्यक्ष पाहणी केली असता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आपण स्वत: शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची जाणीव असून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील आलेगाव, निळा या गावाच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीच्या काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जमीन खरडून जाणे, पिके वाहून जाणे, रस्ते वाहून जाणे, पुलांचे नुकसान होणे, घराची पडझड होणे अशा पद्धतीचे सगळेच नुकसान...
100% loss of farmers’ crops due to heavy rainfall : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान; हेक्टरी ५० हजार आणि घरपडीला २५ हजाराचे अनुदान देण्याची मागणी -NNL

100% loss of farmers’ crops due to heavy rainfall : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान; हेक्टरी ५० हजार आणि घरपडीला २५ हजाराचे अनुदान देण्याची मागणी -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात तिन्ही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असुन, शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली असून, आज १० दिवस उलटूनही शासनाची कुठलीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण या हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडकल्या. या याठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देऊन या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये आणि घरपडीला २५ हजाराचे अनुदान देण्याची मागणी केली आहे. हदगाव - हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्षा डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी पुढाकार घेतला. यासाठी क्षणाचाही विलंब न करता गेल्या तीन दिवसापासून...
local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने रु. ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा केला जप्त -NNL

local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने रु. ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुटखा विक्रेत्यांची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार दिनांक ८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य व्यवसायिकात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत पो. नि. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पथकातील सहा. पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना दिनांक ०८.०९.२०२४ रोजी माहिती मिळाली की, पोलीस ठाणे इतवारा हद्दीत काही इसम सुगंधीत गुटखा विक्री करण्यासाठी ताब्यात बाळगुन आहेत. त्यावरुन त्यांनी सदरची माहिती वरिष्ठांना देवुन, सोबतचे पोलीस अंमलदार यांचेसह साफळा रचुन, पोलीस ठाणे इतवारा हद्दीत एम. के. स्टार, डेली निड या दुकानाचे मागील टिनपत्राचे कंम्पाऊंड असलेल्या मोकळ्या जागेत छापा ...
Babli and Balegaon dam : बाबळी व बळेगाव बंधारा बॅकवॉटर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या – NNL

Babli and Balegaon dam : बाबळी व बळेगाव बंधारा बॅकवॉटर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील मुख्य गोदावरी नदी वाहत असते ,या गोदावरी नदीवर बाभळी बंधारा व बळेगाव बंधारा आहे. बाबळी बंधारा व बळेगाव बंधारा बॅकवॉटर मुळे जिल्ह्यातील नायगाव ,उमरी, धर्माबाद ,बिलोली तालुक्यातील अनेक गावातील शेतीचे प्रचंड नुकसान दरवर्षी होत असते. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत न करता कायमस्वरूपी उपाययोजना करत विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. बाबळी बंधाऱ्यामुळे चिरली, कोंठा, गुजरी, कांगठी, खपराळा, कोळगाव इ.आणि बळेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे कुंटूर, सांगवी, इज्जतगाव, धनज, मेळगाव, सातेगाव, इकळीमाळ, बळेगाव, हुस्सा ,राहेर इ. गावातील शेतीचे प्रचंड नुकसान होते. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग ,उडीद दरवर्षी पाण्याखाली जात असते ,त...
District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर बाळकृष्ण कदमांची वर्णी; एकनिष्ठेचे मिळाले फळ -NNL

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर बाळकृष्ण कदमांची वर्णी; एकनिष्ठेचे मिळाले फळ -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभेचे भाजप नेते डॉ. अशोक सूर्यवंशी यांचे अत्यंत विश्वासू बाळकृष्ण कदम यांची जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य म्हणून दि. ०६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. बाळकृष्ण कदम यांची निवड डॉ. अशोक सूर्यवंशी यांच्या शिफारशी नुसार झाली आहे. या समितीमध्ये किनवट विधानसभेतून सर्वात तरुण आहेत. १२ वर्षाच्या पत्रकारितचा अनुभव असणारे एम. ए. बि. एड्, बी.जे पर्यंत शिक्षण झालेले आहे. कदमांच्या निवडीने खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्याची जनभावना व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रसिद्धीप्रमुख, बुथ संपर्क अभियान संयोजक, बुथ सशक्तीकरण अभियान प्रमुख, नगरपरिषद स्वच्छता दूत अशा कामांचा अनुभव असणारे पक्षाशी एकनिष्ठ असणारे कदमांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने पक्ष ...
NCP-Sharad Chandra Pawar party : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षामध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील असंख्य युवकांनी केला प्रवेश -NNL

NCP-Sharad Chandra Pawar party : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षामध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील असंख्य युवकांनी केला प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष नांदेड उत्तर विधानसभेच्या वतीने आयोजित बैठकीत उत्तर विधानसभा कार्यकारिणीचा विस्तार करुन नव्याने काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षामध्ये आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील असंख्य युवकांनी पक्ष प्रवेश केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत काही निवडी करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी विशाल पोपळे, जिल्हा सरचिटणीस पदी सतिष कदम, जिल्हा सचिव पदी शेख फिरोज व नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष पदी अंबादास पाटील जोगदंड आणि तालुकाउपाध्यक्ष पदी चेतन लबडे या सर्व पदाधिकार्यांच्या निवडी करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुढ...
Ideal National Award : पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना “आयडियल नॅशनल अवॉर्ड “प्रदान -NNL

Ideal National Award : पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना “आयडियल नॅशनल अवॉर्ड “प्रदान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| जागतिक साक्षरता दिनानिमित्त छत्रपती राजे संभाजी प्रतिष्ठान व स्वराज्य सेवाभावी संस्था,नांदेड यांच्या वतीने दि.8 सप्टेंबर 2024 रविवार रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पात्र व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वजिराबाद भागातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळेच्या शेजारी असणार्‍या के. आर. एम. महिला महाविद्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जगदीश कदम, नांदेड महिला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, डॉ. हंसराज वैद्य, शिव प्रसाद राठी, लोट, साहित्यिक रुपाली वागरे,बालाजी कराळे, धम्मपाल हनवते आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा "आयडियल नॅशनल अवॉर्ड" पुरस्कार हा पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,...
Chhatrapati Sambhaji Raje ; स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा -NNL

Chhatrapati Sambhaji Raje ; स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी ८ वा. शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली व शेतकरी बांधवांना धीर दिला. हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावातील नुकसानीची सरकारने तात्काळ भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पुढील ४ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. नांदेड मधील दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी व इतर घटक पक्ष परभणी भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारने सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी याव...
error: Content is protected !!