Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले शाळेतील एनसीसी कॅडेटने काढली स्वच्छता जनजागृती रॅली -NNL

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले शाळेतील एनसीसी कॅडेटने काढली स्वच्छता जनजागृती रॅली -NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूल, बाबा नगर येथील एनसीसी कॅडेट्सनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती रॅली काढली. ध्वजारोहण सोहळ्यानंतर सुरू झालेली ही रॅली महात्मा फुले शाळेपासून बाबा नगर आणि आनंद नगर परिसरात गेली. या रॅलीद्वारे नागरिकांना स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनसीसी छात्र सैनिकांनी स्वच्छते विषयक घोषणा देत परिसरातील लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. आनंद नगर आणि बाबा नगर परिसरातील नागरिकांनी या रॅलीचे मोठ्या उत्साहात कौतुक केले. रॅली आयोजित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी परवानगी दिली, तर एनसीसी सेकंड ऑफिसर दत्ता बारसे, आर्मी विंगचे थर्ड ऑफिसर पी. एस. केंद्रे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुगाळे, पर्यवेक्षक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका महाराज मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. राम वाघमारे, द...
the service completion ceremony of the Home Guards ; उस्माननगर पो. स्टेशनच्या वतीने गृहरक्षक दलातील जवानांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात – NNL

the service completion ceremony of the Home Guards ; उस्माननगर पो. स्टेशनच्या वतीने गृहरक्षक दलातील जवानांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात – NNL

सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून व पोलीस ठाण्याचा एक घटक म्हणून पाहिल्या जाणारे होमगार्ड ( गृहरक्षक दलात) मित्र प्रदिर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जवान गुंडेराव खेडकर (माजी तालुका समादेशक अधिकारी) व शेख सलीम शेख मेहबूब, शेख हबीब शेख खाजा, केशव पाटील काळम,व पोलीस कर्मचारी मेजर जायभाये, ए. एस. आय. श्री. सुक्रे यांचा उस्माननगर पोलीस स्टेशन येथे नुकताच गृहरक्षक दलातील जवानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सेवापूर्ती कार्यक्रम भावपूर्ण निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्माननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चवळी तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, तालुका समादेशक राजकुमार कदम , अंशकालीन ...
‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL

‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या ता.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासा...
Former MP Hemant Patil, President of Turmeric Research Center ; सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा  दर्जा – NNL

Former MP Hemant Patil, President of Turmeric Research Center ; सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा  दर्जा – NNL

राजकीय
किनवट l सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरु झालेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्राचे अध्यक्ष  तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य  शासनाने  "मंत्री" पदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव  केला आहे. ही हिंगोली लोकसभेसाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल येथील राजमाता जिजाऊ चौकात शिवसैनिकांनी जल्लोष करून  मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहे.   यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नामुळे वसमतच्या हळदीला केंद्र सरकारने जीआय मानांकन दिले आहे. त्यानंतर आता "मंत्री" दर्जा मिळाल्यामुळे हळद संशोधन केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मराठा समाजासाठी राजीनामा देणारे पाहिले खासदार, तिकीट जाहिर होवून प्रचारास लागल्या नंतर अत्यंत मानहानी पूर्वक त्यांना उमेदवारी नाकारली होती. तरीही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत...
Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतीस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामा...
Ashokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL

Ashokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL

नांदेड
नांदेड l राज्य शासनाच्या वर्ग-३ व वर्ग-४ पदांवर कार्यरत स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीने मोठा दिलासा दिला असून, त्यांची सेवासमाप्ती होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा फलदायी ठरला आहे. एका न्यायालयीन आदेशामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या होत्या. यातील काही लोकांनी तब्बल २५-३० वर्ष सेवा दिलेली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अन्यायकारक असल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यातील काही जणांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याविषयी राज्य सरकारकडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खा. चव्हाण यांनी तातडीने विविध पातळ्यांवर राज्य सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले....
forest range officer Rohit Jadhav ; वन्यप्राणी रानडुक्कर यानी हल्ला केलेल्या ईसमास वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते ५ लाखांचा धनादेश वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांची उत्कृष्ट कामगीरी – NNL

forest range officer Rohit Jadhav ; वन्यप्राणी रानडुक्कर यानी हल्ला केलेल्या ईसमास वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते ५ लाखांचा धनादेश वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांची उत्कृष्ट कामगीरी – NNL

सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l तालूक्यातील बंजारा तांडा येथील राजू मोहन पवार यांच्या वर रानडुक्करांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात जख्मी केले होते,राजू याने यवतमाळ येथे शाशकिय रूग्णालयात उपचार केले ,व उपचार दरम्यान मेडिकल व आलेला खर्च वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय कडे सादर केला होता. वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते दि.१७ सष्टेबर रोजी धनादेश देण्यात आला, बंजारा तांडा शिवारात दि.२३.७.२०२३ रोजी शेतकरी राजु मोहण पवार व त्यांच्या पत्नी शेतात काम करत असताना अचानक दुपारी १२ वाजताच्या सुमारास रानडुक्कराने राजू वर हल्ला केला राजु व त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने शेजारील शेतकरी धावत आले व रानडुक्करांने पोबारा केला या हल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांस माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आनले असता डॉ. अवधूत गोदमले. डॉ. मुंगळकर. यांनी प्रथमोपचार केले व पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे ...
A neglected ‘father’ man : चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस – डॉ.शिवदास हमंद -NNL

A neglected ‘father’ man : चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस – डॉ.शिवदास हमंद -NNL

नांदेड, लेख
भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. स्वातंत्र्याचा उत्साह सर्वत्र पसरला असताना आमच्या भागात प्रचंड खदखद आणि अस्वस्थता जुलमी रजाकारांचे अत्याचार हे कायमच हेाते. या कालावधीत स्वातंत्र्यप्रिय धाडसी व्यक्तिंनी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याप्रतीची भावना जाज्वल्य करण्यासाठी पुढाकार घेतला. मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे. गोविंदराव पानसरे हे पूर्वाश्रमींच्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूरचे होत. हल्ली हे गाव जालना जिल्‌ह्यात आहे. गोविंदराव पानसरे यांची जन्मभूमी हल्लीची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असली तरी कर्मभूमी बिलोली तालुका होता. धर्माबाद, नायगाव हे दोन्ही तालुके पूर्णत: बिलोली तालुक्यात होते. २३७ गावांचा बिलोली तालुका, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विस्तारलेला तालुका होता. तालुक्याच्या विभाजनानंतर धर्माबाद, उमरी, ना...
“Vatsalya” scheme : “वात्सल्य”योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार -NNL

“Vatsalya” scheme : “वात्सल्य”योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर रोजी होत आहे. नवी दिल्ली येथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आहे. देशातील मोजक्या जिल्ह्यामध्ये नांदेडचा सहभाग निश्चित झाला असून हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय विद्यालय विमानतळ रोड नांदेड येथे 50 विद्यार्थी व 50 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला दिल्ली येथून संबोधित करणार आहेत.18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4.30 या काळामध्ये हा कार्यक्रम होणार असून नांदेड येथील स्टेट बँक...
Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन येथील श्री गणेश मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात गुलाब पुष्प उधळून मिरवणूक काढून दहाव्या दिवशी झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गणेश चतुर्थीला ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या हस्ते विधीवत पुजन करून स्थापना करण्यात आली तर दैनंदिन आरती महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते, दहा दिवसांच्या काळात भक्ती मय वातावरण मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.रेखा काळे, उपनिरीक्षक महेश कोरे भोसले,ज्ञानेश्वर मठवाड यांच्या सह महिला पोलीस कर्मचारी,पोलीस अंमलदार, होमगार्ड यांनी सेवा केली तर दव्हाया दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आल्यानंतर श्री विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. ग्रामीण पोलीस स्टेशन ते विसर्जन मिरवणूक दरम्यान फेटा बांधलेल्या अ...
error: Content is protected !!