Homeसोशल वर्कthe service completion ceremony of the Home Guards ; उस्माननगर पो. स्टेशनच्या...

the service completion ceremony of the Home Guards ; उस्माननगर पो. स्टेशनच्या वतीने गृहरक्षक दलातील जवानांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात – NNL

उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून व पोलीस ठाण्याचा एक घटक म्हणून पाहिल्या जाणारे होमगार्ड ( गृहरक्षक दलात) मित्र प्रदिर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जवान गुंडेराव खेडकर (माजी तालुका समादेशक अधिकारी) व शेख सलीम शेख मेहबूब, शेख हबीब शेख खाजा, केशव पाटील काळम,व पोलीस कर्मचारी मेजर जायभाये, ए. एस. आय. श्री. सुक्रे यांचा उस्माननगर पोलीस स्टेशन येथे नुकताच गृहरक्षक दलातील जवानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सेवापूर्ती कार्यक्रम भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्माननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चवळी तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, तालुका समादेशक राजकुमार कदम , अंशकालीन लिपिक भिमराव जोंधळे ( लोहा पोलीस स्टेशन)यांची प्रमुख उपस्थिती होती. गृहरक्षक दलातील जवानांनी अध्यक्षांचे व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पहार, नारळ व फेटे बांधून सत्कार केला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांनी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवान सलीम शेख यांच्या विषयी मनोगतात असे म्हणाले की ; “सलीम शेख हे आम्ही जेव्हा गस्त घालत होतो किंवा पोलीस स्टेशनचे उस्माननगर या कामावर बोलावल्या बरोबर येत होते त्यांना कामाचा बिलकुल आळस नव्हता, काम इमानदारीने करत असत जेव्हा एखाद्या वेळी पोलीस गाडीवर चालक नसायचा त्यावेळेस सलीम शेख पोलीस गाडीवर चालक म्हणून काम करायचे, गस्तीला जाताना आवर्जून आम्ही त्यांना सोबत घेऊन जात होतो अशा इमानदार कर्मचाऱ्यांची सेवा संपल्यामुळे त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना पुढील काळात आनंदी जीवन मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो “असे ते म्हणाले. यावेळी सलीम शेख यांनी त्यांच्या होमगार्ड सेवेतील कामाचा अनुभव सांगतांना ” तीस वर्षे सेवेमध्ये अधिकाऱ्याकडून कुठलाच त्रास झाला नाही .

कुणी कामाच्या होमगार्ड कर्मचाऱ्यावर रागावले नाही . होमगार्ड या नोकरीमधून मला जनतेची सेवा करण्यास संधी मिळाली यामध्येच मी धन्यता मानतो. “असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चवळी यांनी मनोगतात” माझ्या बारा वर्षाच्या कार्यकाळात होमगार्ड पथकाने आपल्या सहकारी जवानाच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम कुठेही घेतला नाही तो कार्यक्रम उस्माननगर पोलीस स्टेशनच्या होमगार्डांनी करून दाखवला. ही कौतुकास्पद बाब आहे.

होमगार्डांनी सेवेत असताना आपल्या कमाईतून पगारातून २५ टक्के रक्कम आपल्या म्हातारपणासाठी जतन करून ठेवावी कारण आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी व संसारात शंभर टक्के खर्च केले तर आपल्याला म्हातारपणी पैशाची गरज पडते ते मागावे कुणाला आपले सुखदुःख कोणाला सांगावे आजारी पडल्यावर खाण्यापिण्यासाठी कोणीही आपल्याला जवळ करीत नाही त्यामुळे आपल्या पगारातून २५ टक्के रक्कम जपून ठेवा .असे ते म्हणाले.

यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृहरक्षक दलातील होमगार्ड शेख शमशेर शेख अब्दुल गणी (उस्माननगर पोलीस स्टेशनचे होमगार्ड प्रमुख) ; माधव वडवळे शेख सादिक, रामकिशन घोरबांड ,भगवान पांडागळे ,कांता सोनसळे,शंकर जमदाडे ,मारुती पांचाळ उत्तम खंदारे; संभाजी भागानगरे; बि के मुसळे, मानसपुरे ;आदींनी कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी शिवपूजे, भारती, बारणीस काका ,पवार ,महाबळे, तिडके अनिरुद्ध वाडे व महिला कर्मचारी यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक लोखंडे यांनी केले तर आभार राजकुमार कदम यांनी मानले . कार्यक्रमाच्या शेवटी होमगार्ड बांधवांच्या वतीने सह भोजनाचे आयोजन केलेहोते त्याचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments