Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RTO Staff Association with the Transport Commissioner ; आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी आज झालेली चर्चा निष्फळ. २४ सप्टेंबर पासूनचा बेमुदत संप अटळ – NNL

RTO Staff Association with the Transport Commissioner ; आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी आज झालेली चर्चा निष्फळ. २४ सप्टेंबर पासूनचा बेमुदत संप अटळ – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l मोटार वाहन विभाग (आर.टी.ओ) कर्मचारी संघटना (शासन मान्यताप्राप्त) राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे गेली ६६ वर्षे यशस्वीपणे प्रतिनिधीत्व करीत आहे,संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवा,अर्थविषयक व इतर अनुषंगिक प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण झाले तेव्हा तेव्हा नेहमीच राज्याचे हित लक्षात घेऊन मागण्यांची सनद सरकारला सादर करण्यात आली आहे,अन्यायकारक शासन धोरणाच्या विरोधात आंदोलनात्मक सुध्दा संघटना कधीही कमी पडलेली नाही. गेल्या दोन वर्षात प्रशासकीय विविध अन्यायकारक तरतुदींमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे. महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे,विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बेछूट बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतेक कर्मचारी हवालदिल झाले आहेत.आकृती बंधाची सुयोग्य अंमलब जावणी न करणे, कामकाजात सुसुत्रीकरण येण्यासाठी नेमण्यात ...
one-day police custody : सागवान तस्करांना न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची पोलीस कोठडी -NNL

one-day police custody : सागवान तस्करांना न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची पोलीस कोठडी -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| रात्रीची जंगलगस्त करीत असतांना भुलजा परिसरात अवैध वृक्ष तोड होत असल्याचा सुगावा लागला. कानोसाघेत घटनास्थळी जाऊन चार तस्तर हाती लागले तर अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केलेला पाचव्या तस्कराला चतुर्भूज करण्यास वनपथकाला यश मिळाले. सदर घटना बोधडी वनविभागाच्या कार्यकक्षेतील भुलजा कक्ष क्र.२१३-सर्वे नंबर ३३ मधील असून मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने तस्करांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत इटलोड (वनसंरक्षक,रो.ह.यो.व वन्यजीव नांदेड) यांच्या नियोजनात आणि सी.जी.पोतुलवार (वनपरिक्षेत्र अधिकारी, बोधडी) यांच्या नेतृत्वात २० सप्टेंबरच्या रात्री गस्तीवर असतांना नियतक्षेत्र भुलाजा कक्ष क्र. २१३ व. स. नंबर ३३ जंगलात अवैध वृक्षतोड होत असतानाचा सुगावा लागल्यामुळे वनपरिक्षेत्रातील त्या क्षेत्राचे वनपाल गंगाधर नीलपत्रे...
Chief Executive Officer Meenal Karanwal : एकंबातील विकास कामात झालेल्या अपहाराच्या चौकशीसाठी गावकरी मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या दालनात -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : एकंबातील विकास कामात झालेल्या अपहाराच्या चौकशीसाठी गावकरी मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या दालनात -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील एकंबा ग्रामपंचायतीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी येथील नळ योजनेची विहिर, फिल्टर पाणी मशिन, लहान मुलांचे साहित्य, गावातील अंतर्गत नाल्या व इतर विविध विकास कामांचे कोणतेही अंदाजपत्रक न करता परस्पर सरपंच, उपसरपच, ग्रामसेवक यानी अभियंत्याला हाताशी धरुन कागदोपत्री कामे केली आहेत. एव्हढेच नाहीतर कामे झाल्याचे दर्शवून शासनाचा निधी उचलून घेवुन हडप केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी मीनल करणवाल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या अपहार व गैरव्यवहार बाबत दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की,नांदेड जिल्ह्य...
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करुन उपोषण सोडवावे अन्यथा सोमवारी नांदेड बदची हाक -NNL

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करुन उपोषण सोडवावे अन्यथा सोमवारी नांदेड बदची हाक -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड,अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबिसीतुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी पासुन मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत परंतु शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांंना निवेदन देऊन येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास परावृत्त न केल्यास सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड बंदची हाक देण्यात आली. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद सह सातारा,बाॅम्बे गव्हर्नमेंटचे गैझेट लागु करावे,अंतरवाली सराटी सह संपुर्ण महाराष्ट्रातील गुन्हे सरसकट मागे घेण्यात याव्या, राज्यभरात कुणबी नोंदणी तपासणी मंदगतीने चालु आहे ती त्वरीत जलद गतीने चालु करावी,ई.ड्ब्लु.एस.सह ई.एस.बी.सी. आणि कुणबी हे तिनही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत,१ जुन २००४ चा कायद्यात सुधारणा कर...
Mavas Dera killed her sister-in-law : हदगाव तालुक्यात मावस देराने केला वहिनीचा विळ्याने वार करुन खून  -NNL

Mavas Dera killed her sister-in-law : हदगाव तालुक्यात मावस देराने केला वहिनीचा विळ्याने वार करुन खून -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड/हदगाव| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे कोळगाव येथे मावस देराने विळ्याने सपासप वार करून वहिनीचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. आरोपी शंकर बाबुराव जगताप वय ४० वर्ष रा. कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून, मयत रेखा मारुती जाधव वय ३८ यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मयत रेखा मारुती जाधव वय ३८ या गुरुवारी दुपारी शेतात झाडाखाली बसलेल्या असताना तिच्यासोबत आरोपी शंकर जगताप याने वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने आपल्या हातातील विळ्याने सपासप वार केले. ओरडण्याचा आवाज आल्याने बाजुला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलिवले. यात विळ्याचा जबर हल्ल्यामुळे अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आर...
Green Energy Solar Revolution : नांदेड जिल्ह्यात “हरित ऊर्जा सौर क्रांती” मोहीम  -NNL

Green Energy Solar Revolution : नांदेड जिल्ह्यात “हरित ऊर्जा सौर क्रांती” मोहीम -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| "हरित ऊर्जा सौर क्रांती" अंतर्गत जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित केले जाणार आहे. अशा गावाला केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात "हरित ऊर्जा सौर क्रांती" मोहीम सुरु करून ही चळवळ यशस्वी करण्यासाठी MNRE ने OM दिनांक 9 ऑगस्ट 2024 नुसार "मॉडेल सोलर व्हिलेज" मार्गदर्शक तत्त्वे निर्गमीत केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून गाव विकसित केले जाणार आहे. एक गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित करण्याबाबत एमएसईडीसीसीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्रा यांनी सूचित केले आहे. या योजनेबद्दल जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये माहिती देऊन अधिकाधिक गावांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी पात्र ...
National Nutrition Awareness : पार्डी येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात; बालिका पंचायतीची निवड -NNL

National Nutrition Awareness : पार्डी येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात; बालिका पंचायतीची निवड -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
अर्धापूर| तालुक्यातील पार्डी मक्ता येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालिका पंचायतीची निवड करण्यात आली. सरपंचपदी भक्ती मदने, उपसरपंचपदी वैशाली मदने तर सदस्यपदी पुर्वी ठोंबरे, वैशाली बंडगर, वैष्णवी शिखरे, अपुर्वा कांबळे, राजश्री मरकुंदे, साक्षी लोखंडे, स्वाती कांबळे, पायल बोराटे, प्रतिक्षा खुणे आदींची निवड करण्यात आली. याप्रसंगी सरपंच शोभा कांबळे, उपसरपंच नीळकंठ मदने, ग्रामविकास अधिकारी शिवकुमार देशमुख, पर्यवेक्षिका सुनंदा कांबळे, प्राथमिक शिक्षिका उषा नळगीरे, मंगला सलामे, पवना खिल्लारे, गोदावरी नरवाडे, सीमा मरकुंदे, भावना गिरी, शीतल पांचाळ, पुनम पांचाळ, लक्ष्मीबाई मुराळकर, सुनीता बेतीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका मंदा नरोटे, रोमा मदने, स्वाती कांबळे, सरस्वती खंडागळे, सया हुपाडे, लता दाढेल, आशा वर्कर ग...
Himayatnagar bandh : सोमवारी २३ सप्टेंबर रोजी हिमायतनगर बंदची हाक -NNL

Himayatnagar bandh : सोमवारी २३ सप्टेंबर रोजी हिमायतनगर बंदची हाक -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोज सोमवार संपूर्ण नांदेड जिल्हा व हिमायतनगर तालुका बंद ठेवण्याचं आव्हान सकल मराठा समाजाने केल आहे. याबाबतचे निवेदन हिमायतनगर पोलिसांना देण्यात आले असून, हिमायतनगर तालुका व शहर मार्केट बंद करून सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मराठा यौध्दा मनोज जरांगे पाटिल हे अमरण उपोषणास मौजे अंतरवली सराटी येथे बसलेले आहेत. यास ५ दिवस झाले असताना शासनाने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणुन दिनांक २३ सोमवारी संपूर्ण नांदेड जिल्हा व हिमायतनगर तालुका बंद ठेवण्याचं आव्हान सकल मराठा समाजाने केल आहे. याबाबतचे निवेदन हिमायतनगर तालुका व शहरातील सकाळ मराठा समाज बांधवानी दिले आहे. या बंदला शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यानी बाजार...
Marathwada muktisangram day ; हुजपा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा -NNL

Marathwada muktisangram day ; हुजपा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर। महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, विद्यापीठ वर्धापन दिन तसेच केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर, योध्दा हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा. मुख्याध्यापक श्री. गजानन रणखांब सर तसेच उपप्राचार्य डाके सर, प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या हस्ते विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. वसंत कदम सर यांनी आपल्या सूत्रसंचालनातून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करतात. व तो दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे व तसेच केशव सीताराम ठाकरे उ...
Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. पुणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 04 फेऱ्या : गाडी क्रमांक 01451 पुणे–करीमनगर विशेष गाडी दिनांक 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी व 04 आणि 11 नोव्हेंबर, 2024 रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्तरकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा, सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी स...
error: Content is protected !!