Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Himayatnagar city and taluk heavy rain : प्रचंड विजांच्या कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्याला झोडपून काढले -NNL

Himayatnagar city and taluk heavy rain : प्रचंड विजांच्या कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्याला झोडपून काढले -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात परतीच्या पावसाने प्रचंड विजांच्या कडकडाटात बुधवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली आहे. तब्बल दीड तासाहून अधिक वेळ चाललेल्या पावसामुळे शहरातील रस्ते पुराच्या पाण्याने भरून वाहत होते. विजांचा कडकडाट एवढा होता की शहर हादरू लागले असल्याचा भास नागरिकांना झाल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच पावसाने जाणवू लागलेल्या उकडयांपासून दिलासा मिळाला असला तरी शेतीत काढणीला आलेले सोयाबीनमध्ये पाणीच पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या दुसऱ्या मुसळधार पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन गेल्यात जमा झाल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा झालेल्या नुकसानीचा मोबदला म्हणून हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. हिम...
Sakal OBC Samaj : सोशल मिडियावर प्रा. लक्ष्मण हाके यांना मारण्याची धमकी देणाऱ्या माधव देवसरकर वर गुन्हा दाखल करा – सकल ओबीसी समाज -NNL

Sakal OBC Samaj : सोशल मिडियावर प्रा. लक्ष्मण हाके यांना मारण्याची धमकी देणाऱ्या माधव देवसरकर वर गुन्हा दाखल करा – सकल ओबीसी समाज -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| ओ.बी.सी. संघर्ष योध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यावर केलेल्या प्रक्षोभक वक्तव्या प्रकरणी ओ.बी.सी. समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजच्या भावना दुखावणारे मैसेज सोशल मिडियावर टाकून प्रा. लक्ष्मण हाके यांना मारण्याची धमकी देणाऱ्या माधव देवसरकर यांच्यावर कठोरातील कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माधव देवसरकर यांनी सोशल मिडीयावर संघर्ष योध्ये तथा ओ.बी.सी. आरक्षणाचे कट्टर समर्थक संविधानीक मार्गाने उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर २ दिवसापूर्वी अतिशय खालच्या भाषेत म्हणजे लक्ष्मण हाके तू हरामखोरा, दलाला तू सरकार कहून पैसे घेवून उपोषणास बसतोस, तू निच्छ आहेस, तुझी लायकी नाही, तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाद घोलतोस, याद राख बेल्या, येत्या २ ते ४ दिवसात तुझा बोऱ्या बिसतारा गुंडाळतो की नाही तू बघ, त...
OBC warriors : ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडवा यासाठी हिमायतनगरात गुरुवारी रास्तारोको आंदोलन -NNL

OBC warriors : ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडवा यासाठी हिमायतनगरात गुरुवारी रास्तारोको आंदोलन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नांदेड आय. टी. आय. कॉर्नर येथे ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी सुरु केलेले ओ.बी.सी. आरक्षण मागणीचे उपोषण २४ तासाच्या आत सोडविण्यात यावे. अन्यथा उपोषण सोडविण्याच्या मागणीसाठी दि. २६ गुरुवारी सकल ओ.बी.सी. समाजाकडून हिमायतनगर शहराजवळील मुख्य कमानीजवळ रस्ता रोका आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शासनाने सुरु केलेले ओ.बी.सी. व मराठा समाजातील आरक्षणा वरील वाद त्वरीत संपुष्ठात आणावा. शासनानाने सुरू केलेला ओ.बी.सी व मराठा समाजातील वाद-विवाद संघर्ष त्वरीत थांबवून आरक्षणाचा निकाल ओ.बी.सी.चे आरक्षण अबाधित ठेवून सोडविण्यात यावा. ओ.बी.सी.मध्ये इतर समाजाची होत असलेली घुसखोरी थांबवावी. वडीगोद्री येथे ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे अंतरवाली सराटी अॅड. मंगेश ...
ISO Certification of Hanegaon Zilla Parishad : देगलूर तालुक्‍यातील हणेगाव जिल्‍हा परिषद कन्‍याशाळेला आयएसओ मानांकन -NNL

ISO Certification of Hanegaon Zilla Parishad : देगलूर तालुक्‍यातील हणेगाव जिल्‍हा परिषद कन्‍याशाळेला आयएसओ मानांकन -NNL

करियर, नांदेड
नांदेड| देगलूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद कन्या शाळा त ग्रामपंचायतीस आयएसओ नामांकन मिळाले असून जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते मुख्‍याध्‍यापक व ग्रामसेवक यांना हे नामांकन प्रदान करण्‍यात आले. यावेळी सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्‍या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, प्राथमिकच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, आयएसओ ऑडिटर अनिल येवले व योगेश जोशी यांची उपस्थिती होती. हणेगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा आयएसओ नामांकनात जिल्‍हयात पहिली ठरली आहे. तर तालुक्‍यात हानेगाव ग्रामपंचायतीने प्रथम आएसओ नामांकन मिळविले. शाळा व अंगणवाडीने कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून मानांकन मिळविले आहे. अशा ...
169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL

169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७६ आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यामध्ये नांदेडच्या १६९ गावांचा सहभाग आहे. त्या माध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार ७०२ आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या...
Second day of indefinite strike of employees : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कर्मचारी यांच्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस,मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा -NNL

Second day of indefinite strike of employees : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कर्मचारी यांच्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस,मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना संलग्न मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना नांदेड यांच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सहभागी होऊन कर्मचारी यांनी २४ सप्टेंबर पासून रास्त व न्यायिक मागण्यासाठी आकृतीबंधाची अमंल बजावणी करावी यासह विविध मागण्या साठी कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी प्रवेशद्वार येथे बेमुदत संपाचा दुसरा दिवस असून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा जाहीर केला. सलग दुसऱ्या दिवशी कर्मचारी यांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यभर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर्मचारी संघटना यांच्या वतीने २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला असून नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथेही संघटनेच्या वतीने सेवा प्रवेशाची तात्काळ अमंल बजावणी करावी, समायोजन रद्द करावे, महसुली बदल्या रद्द करा, कळसकर समितीची सुधार...
Krishi Sanchan Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण -NNL

Krishi Sanchan Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण -NNL

नांदेड, लेख
राज्यामध्ये पडीक जमिनीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. या पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजीविका, आर्थिक स्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये योग्य प्रकारे मृद संधारणाची कामे करून जमिनीची उत्पादकता वाढविणे या उद्देशाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -पाणलोट विकास घटक 2.0  हा प्रकल्प   राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. विविध क्षेत्राच्या विकासाबरोबरच  पडिक जमिनींचा विकास करुन त्या सिंचनाखाली आणणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून देशाच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : पाणलोट विकास घटक 2.0 अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. राज्यात या योजनांची अंमलबजावणी सन 2025-26 पर्यंत प्रभावीपणे करण्याचे नियोजन करण्यात आले असून सद्य:स्थितीत 22 हजार 733 लक...
help from the government : नको चिंता उपचाराच्या खर्चाची.. मदत आहे शासनाची..! -NNL

help from the government : नको चिंता उपचाराच्या खर्चाची.. मदत आहे शासनाची..! -NNL

नांदेड, लेख
राज्य शासनाने जनसामान्यांच्या आरोग्य जपण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयांमध्ये उपचाराचा खर्च न पेलणाऱ्या नागरीकांना केंद्रिभूत केले आहे. यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे. समाजातील प्रत्येक घटकाची आरोग्य तपासणी करण्यासाठी अभियान शासन राबवित आहे. राज्याची महत्वाची योजना असलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्याचे’ प्रति कुटूंब वार्षिक मर्यादा वाढविण्यात आली आहे. या निर्णयांमुळे आज कुठलाही मोठा आजार झाल्यास उपचार करण्याची चिंता नाही.  महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विमा संरक्षण दीड लाखांहून 5 लाख रूपये करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना खासगी दवाखान्यातील लाख रुपयांची बिले अदा करण्यापेक्षा योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपया...
Approval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाची मंजुरी -NNL

Approval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाची मंजुरी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| संपूर्ण राज्यातील राजपूत समाजाच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नांदेड दक्षिण मतदार संघातील आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दिनांक 24/03/2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सदर महामंडळ तातडीने स्थापन करून राज्यातील राजपूत समाजाला न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच त्या बाबत राज्य शासनाकडे सतत एक वर्षा पासून पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने काल दिनांक 23/09/2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजपूत समाजाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक राजपूत समाज बांधवांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याने समाधान व्यक्त केले. असून अनेक समाज बांधवांनी आमदार हंबर्डे यांचे आभार मानले असून ...
Chief Minister Youth Work Training  : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन -NNL

Chief Minister Youth Work Training : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 24 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवकांनी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार केले आहे. या मेळाव्यात सर्व शासकीय /निमशासकीय आस्थापना व सहकारी संस्था, औद्योगिक आस्थापना, लाभार्थी उमेदवार यांचा सहभाग असणार आहे. कार्य प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधी सहा महिण्याचा राहील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 12 वी पास युवकांना 6 हजार, आयटीआय पदविका 8 हजार, पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरुप मुख्यमंत्री युवार कार्य प्रश...
error: Content is protected !!