Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
applications : 21 उमेदवारांचे विधानसभेसाठी अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज -NNL

applications : 21 उमेदवारांचे विधानसभेसाठी अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यच्या तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांनी 20 अर्ज 9 मतदारसंघात दाखल केले आहेत. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत 21 उमेदवारांचे 24 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी आणखी दोन अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत. आज राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे तसेच सध्याच्या विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेल्यांपैकी 83-किनवट मतदारसंघात एका उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत दोन उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार भिमराव रामजी केराम (एबी फॉर्म अप्राप्त) यांचा समावेश आहे. 84-हदगावमध्ये आज कॉग्रेसचे आमदार माधव निवृत्तीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 88-लोहा मतदारसंघात आज माजी खासदार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी अर्ज दाखल क...
Assets worth Rs 52 crore seized in last 24 hours : गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -NNL

Assets worth Rs 52 crore seized in last 24 hours : गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -NNL

क्राईम, नांदेड
मुंबई| राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील १९ अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. १)         इन्कमटॅक्स  डिपार्टमे...
Kondiba Dange : कै. कोंडिबा डांगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने शिराढोण येथे नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

Kondiba Dange : कै. कोंडिबा डांगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने शिराढोण येथे नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर। शिराढोण ता.कंधार येथील जेष्ठ नागरिक सुपरिचित असलेल व्यक्तीमत्व तथा दैनिक प्रजावाणी चे पत्रकार शिवकांत डांगे यांचे वडील कै.कोंडिबा गणपती डांगे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने गरजू रूग्ण लाभार्थ्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथे नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले , यास गरजू लाभार्थ्यांनी उपस्थिती लावून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. पशुवैद्यकीय दवाखाना कापसी ता.लोहा येथे परिचर म्हणून सेवा बजावलेले व परिसरात सुपरिचित असलेल व्यक्तीमत्व कै.कोंडिबा डांगे यांनी आयुष्यभर पशुधनाची सेवा केली. अत्यंत प्रेमळ व शांत , मनमिळावू स्वभावाचे कै.कोंडिबा डांगे आपल्यात नसल्याचा कुणालाही विश्वास बसत नाही. त्यांच्या पश्चात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात हेतूने गावातील गोरगरीब नागरिकांना गावातच नेत्र तपासणी करण्यात यावी म्हणून श्री साई दृष्टी नेत्रालय नांद...
A flurry of bogus journalists : सनासुदीच्या तोंडावर स्वयंघोषित बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

A flurry of bogus journalists : सनासुदीच्या तोंडावर स्वयंघोषित बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| बातमीदार हा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा,भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो, अशी सामान्य नागरिकांची भावना असते, मात्र काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याचा घाट घातला आहे. सध्या माहूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी वाहनांवर प्रेस लिहिलेले आणि ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले काही महाटख स्वयंघोषित बोगस पत्रकार राजकिय मंडळीवर,सर्वसामान्य नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस लिहून आम्ही ऑनलाइन मीडियाचे पत्रकार आहोत, असे प्रेस लिहिलेले ओळखपत्र गळ्यात घेऊन मोठ्या अविर्भावात फिरून नागरिकांसह शासकीय अधिकारी, राजकारणी मंडळींना त्रास देत असल्या...
Bhimrao Keram filed his candidature : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर आ.भीमराव केराम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज -NNL

Bhimrao Keram filed his candidature : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर आ.भीमराव केराम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार आ.भीमराव केराम यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर गुरुवारी दि.२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांच्याकडे दाखल केला.यावेळी उमेदवार आ. भीमराव केराम यांच्यासह दिनकर चाडावार, सुधाकर भोयर, आशिष देशपांडे व शिवन्ना कलगोटवार हे उपस्थित होते....
Journalist Protection Act : पत्रकार अजित पवार मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा -NNL

Journalist Protection Act : पत्रकार अजित पवार मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| मुखेड तालुक्यातील बार्‍हाळीचे पत्रकार अजित पवार यांना बातमी लावण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेशकुमार वडदकर व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील रहिवाशी तथा दै.पुढारीचे बार्‍हाळी प्रतिनिधी अजित शंकरराव पवार यांना दि.22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास बातमी प्रकाशीत करत असल्याचा राग मनात धरून नदीम पाशा अहमद तांबोळी, गंगाधर गोरसटवार यांच्यासह इतर दोन जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आ...
An offender was placed under MPDA for one year : लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले स्थानबध्द -NNL

An offender was placed under MPDA for one year : लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले स्थानबध्द -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| आगामी लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाचे आदेश अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्यावरून शेख जुबेर शेख खदीर वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. मुदखेड रोड, वाजेगाव ता. जि. नांदेड यास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदाराकडून गुन्हेगाराना स्थानबध्द करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही वालु आहे. MPDA अंतर्गत 22 आरोपीतांना कारागृहामध्ये " स्थानबध्द" करण्यात आले आहे. तसेच लोकसभा पोट निवडणुक व विध...
The Nanded Rural Crime Squad  : नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने चोरीचा गुन्हा एका तासात केला उघड -NNL

The Nanded Rural Crime Squad : नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने चोरीचा गुन्हा एका तासात केला उघड -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 872/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अविनाश अशोक येडे रा. वैजाळा ता. पाटोदा जि.बीड, ह.मु. विष्णुपुरी ता.जि. नांदेड दिलेल्या गोपनीय माहिती वरुन गुन्हा घडला तारीख वेळ व ठीकाण दिनांक 25/09/2024 रोजी वेळ 20.00 वा ते दिनांक 26/09/2024 रोजी वेळ 08.30 वाजताचे दरम्यान एम.एस. ऑफीस समोरुन सरकारी दवाखाना परिसर विष्णुपुरी ता.जि. नांदेड येथून चोरीला गेली होती. त्यावरून अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघड करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. गुन्हे शोध पथकाचे महेश कोरे पोलीस उप निरीक्षक व त्याचे टिमने गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेत गुप्तहेरांच्या मदतीने आरोपीतांना ताब्यात घेवुन चौकशी केली....
Chances of Rebellion? : महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरीची शक्यता??  -NNL

Chances of Rebellion? : महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरीची शक्यता?? -NNL

राजकीय, नांदेड
नांदेड/नायगांव| भाजपा महायुती सोबत गेल्या वर्षापासून शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना काम करत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये नायगांव विधानसभामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेणारे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर कार्य करत आहेत. महायुतीकडून नायगाव विधानसभेसाठी विद्यमान आमदार राजेश पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आज नायगाव तहसील कार्यालय विधानसभेचे दोन अर्ज खरेदी केली आहेत. पांडुरंग शिंदे यांनी जर विधानसभेसाठी अर्ज भरला तर महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे? रयत क्रांती संघटना आणि शेतकऱ्याची ताकत पांडुरंग शिंदे यांच्यामागे उभी राहिली तर निश्चितच महायुतीचे उमेदवार राजेश पवार यांना ही निवडणूक जड जाईल असे जाणकाराचे मत आहे. नायगाव मतदारसंघातील श...
Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL

Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी काल नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मतदान जनजागृती साठी स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन स्वाक्षरी केली. त्यांनी यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यका...
error: Content is protected !!