Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mild earthquake : मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के -NNL

Mild earthquake : मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के -NNL

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड| मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 14:43 वा व 15:13 वा दोन वेळा भुगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली. अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपसदृश्य हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे 1.5 व 0.7 अशी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून 12 किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हाप्रशासनाच्यावतीने देण्यात आली....
Strike action in Nanded Assembly : नांदेड विधानसभा मतदार संघात धडक कारवाई; आतापर्यंत 24 लाखांचा ऐवज जप्त -NNL

Strike action in Nanded Assembly : नांदेड विधानसभा मतदार संघात धडक कारवाई; आतापर्यंत 24 लाखांचा ऐवज जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत 24 लक्ष रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील काही दिवस आणखी सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने फिरते पथक व स्थिर निगराणी पथक तैनात केली आहेत. या पथकामार्फत काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप,रोख रक्कम,अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येवून एकूण 24 लाख 4 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात भोकर 1 लाख 70 हजार 30 रुपये, देगलूर 2 लाख 77 हजार 650, हदगाव 26 हजार 900, किनवट 1 लाख 71 हजार 725, लोहा 44 हजार 100, मुखेड 71 हजार 140, नाय...
Loha Vidhan Sabha : लोहा विधानसभा मतदार संघात ५ अर्ज, ४१ जणांनी ९० अर्ज खरेदी केले -NNL

Loha Vidhan Sabha : लोहा विधानसभा मतदार संघात ५ अर्ज, ४१ जणांनी ९० अर्ज खरेदी केले -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात शुक्रवारी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने एकनाथ पवार यांनी यांनी उमेद्‌वारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे सादर केला. आतापर्यंत ४१ जणांनी ९० नामांकन पत्र खरेदी केले आहेत. आता पर्यंत पाच अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. २९ ऑक्टोबर नामर्निदेशन दाखल करण्याची अंतिम तारिख असून शनिवार रविवार दोन दिवस सुट्टया आहेत त्यामूळे तर उर्वरित दोन दिवसात गर्दी होणार असे दिसते. शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने एकनाथ पवार यांनी नामांकन निवडवूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे वाखल केले. नामांकनसाठी दोन दिवस शिल्लक लोहा विधानसभा मतदारसंघात सोमवार मंगळवार या दोन दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.त्यामुळे तहसील कार्यालयात व्यवसथा करण्यात आली आहे नामांकन दाखल करण्याचा वेळात तहसील मध्ये कोणालाही प्रवेश...
Police route march : हिमायतनगर शहरात पोलिसांनी रूटमार्च काढून केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन -NNL

Police route march : हिमायतनगर शहरात पोलिसांनी रूटमार्च काढून केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत आज दिनांक 24 रोज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च करण्यात आला, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. विधानसभा निवडणूक -2024 अनुषंगाने हिमायतनगर शहरातुन काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आधीक्षक उप विभाग भोकर, बीएसएफचे 2 अधिकारी, हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक, 30 कर्मचारी, हिमायतनगर ठाण्याचे 01 पोलीस अधिकारी व 15 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या रूट मार्चमुळे हिमायतनगर शहर व तालुक्यात शांतता टिकून राहण्यास मदत होणार आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणूक शांततेत होण्यास मदत होणार आहे....
Gharkul construction : घरकुल बांधकामाचे रखडलेले अनुदान देण्याची साहेबराव शेटे यांची मागणी -NNL

Gharkul construction : घरकुल बांधकामाचे रखडलेले अनुदान देण्याची साहेबराव शेटे यांची मागणी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,अनिल मादसवार| पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत निवड करण्यात आली आहे. मात्र काही लाभार्थीना घरकुल बांधकामाचे देयके देण्यास अभियंत्यांकडून टाळाटाळ चालवली जात आहे. पंचायत समिती कार्यालयात चकरा मारूनही घरकुल बांधकामाचे अनुदान मिळत नसल्याने खडकी बा.येथील साहेबराव शेटे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे चौकशी मागणी केली आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतून घर नसलेल्यांना पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल मंजूर करून त्याना लाभ दिला जातो. ग्रामीण भागात एका घरकुलाला 1 लाख 60 हजार रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायती मार्फत करण्यात येते. लाभार्थींना स्वत:च्या ३०० स्क्वेयर फूट जागे...
Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL

Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL

नांदेड, करियर
नांदेड। करकाळा उमरी येथील श्री यशवंतराव चव्हाण ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विसाव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार प्रा महेश मोरे यांची एक मताने निवड झाली आहे. वर्ष 2025 च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भोकर येथील श्री शाहू महाराज हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हे संमेलन नियोजित आहे. संवेदना निवासस्थानी ऍड एल जी पुयड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सल्लागार समितीने सदरील निर्णय घेतला. यावेळी देविदास फुलारी, निर्मल कुमार सूर्यवंशी, प्रा.नारायण शिंदे, इंजिनीयर मिलिंद गायकवाड ,बापूराव पाटील आणि भगवान पाटील करकाळेकर यांची उपस्थिती होती . प्रा. महेश मोरे यांची ग्रंथसंपदा : शिवार १९९७ (कवितासंग्रह ),हिरवे रान २०००(कवितासंग्रह ), पाऊस काळ २००४ (कवितासंग्रह ), शेतकऱ्याचे आसूड (काव्यरूप ) २००८ , गाव...
Vinod Sharma : माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांना बंधूशोक -NNL

Vinod Sharma : माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांना बंधूशोक -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे व माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांचे मोठे बंधू विनोद शर्मा यांचे गुरुवारी दुपारी मुंबईत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. विनोद शर्मा हे मागील काही काळापासून आजारी होते. गुरुवारी अचानक त्यांची प्रकृती गंभीर होऊन प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शुक्रवारी २५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता चंदनवाडी स्मशानभूमि, चर्नी रोड, मुंबई येथे अंतिम संस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे....
Shri.Sant Agdambuwa Yatra at Kalambar : कलंबर ( बु. ) येथे श्री.संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा -NNL

Shri.Sant Agdambuwa Yatra at Kalambar : कलंबर ( बु. ) येथे श्री.संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा -NNL

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु) लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिमवत वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी , शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात दि . २८ ऑक्टोबर २०२४ पासून श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी यात्रेनिमित्त जिजाऊ बल्ड सेंटर शिवाजी नगर नांदेड यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दि.चार नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी पाच वाजता श्री संत अगडंमबुवा पालखीचे अग्नी प्रवेश होईल. कलंबर बु. ता. लोहा येथे अनेक वर्षांपासून श्री संत अगडंमबुवा यात्रा चालू आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व गावातील बाईल लेक आवर्जून दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. पंचक्रोशीतील हजारो भाविक ...
Congress assembly candidate ; काँग्रेस पक्षाची पहिल्या यादीत हदगावमध्ये आ. जवळगावकर, नायगाव डॉ. मिनल खतगावकर तर भोकर येथून कोंडेकर यांना उमेदवारी -NNL

Congress assembly candidate ; काँग्रेस पक्षाची पहिल्या यादीत हदगावमध्ये आ. जवळगावकर, नायगाव डॉ. मिनल खतगावकर तर भोकर येथून कोंडेकर यांना उमेदवारी -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई/नांदेड। काँग्रेस पक्षाने आपली ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यातील हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नायगाव येथून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मिनल निरंजन खतगावकर तर भोकर विधानसभा मतदार संघातून युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पप्पू उर्फ तिरुपती कोंडेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हदगाव येथील उमेदवारी कोणाला भेटणार यावर तर्क वितर्क लावले जात होते त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभा उमेदवारांची निवडणुकीतील उमेदवारांची ४८ पहिली यादी जाहीर करण्यात आला आहे. सदर यादीत मराठवाड्यातील अनेक उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे चार आमदार होते. त्यात भोकर, देगलूर, हदगाव व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. मात्र काँग्...
Candidates should not use religious places : प्रचाराचे व्हिडिओ बनविताना उमेदवारांनी धार्मिक स्थळांचा,चिन्हांचा,वापर करू नये -NNL

Candidates should not use religious places : प्रचाराचे व्हिडिओ बनविताना उमेदवारांनी धार्मिक स्थळांचा,चिन्हांचा,वापर करू नये -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| निवडणुकांमध्ये प्रचारासाठी हल्ली उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल देणारा व्हिडिओ तयार करण्याची सर्वमान्य प्रक्रीया आहे. मात्र ही प्रक्रिया किचकट असते. त्याला वेळ लागतो. त्यामुळे हा व्हिडिओ बनवतानाच भारत निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन केल्यास याची मान्यता तातडीने मिळण्यास मदत होईल, त्यामुळे आयोगाला अमान्य असणाऱ्या गोष्टी टाळण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उमेदवारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रिंट माध्यमांसाठीच्या जाहिराती, प्रचार रथांवरील व्हीडीओ ,समाज माध्यमांसाठी रिळ, रेडिओ सार्वजनिक तसेच खाजगी एफएम चॅनल बलके एसएमएस रेकॉर्ड केलेले व्हॉइस मेसेजेस सोशल मीडिया इंटरनेट संकेतस्थळे यावर द्यावयाच्या जाहिराती यामध्ये हे व्हिडिओ व रीळ प्रामुख्याने वापरले जातात. निवडणुकीच्या उमेदवारांचे हे सर्व व्हिडिओ माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाकडून मान्यताप्...
error: Content is protected !!