Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
SAVWIPL planted : एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने महाराष्ट्रात ७० हजार पेक्षा जास्त झाडे लावली -NNL

SAVWIPL planted : एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने महाराष्ट्रात ७० हजार पेक्षा जास्त झाडे लावली -NNL

मुंबई, लाइफस्टाइल
मुंबई| स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ७० हजारपेक्षा जास्त झाडे लावून एक मोठा मैलाचा दगड पार केला आहे तसेच पर्यावरण पुनर्संचयन करण्याची या समूहाची बांधिलकी अधोरेखित केली आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर कार उत्पादन प्लांटजवळ ग्रीन फ्युचर पार्क येथे 1 लाखावे झाड लावण्याची सिद्धी देखील त्यांनी अलीकडेच प्राप्त केली आहे. ही झाडे शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन समृद्ध वातावरण प्रदान करतील. एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे वृक्षारोपण हा त्यांच्या अनेक हरित प्रकल्पांना सामावून घेणाऱ्या एका व्यापक शाश्वतता अजेंडाचा एक भाग आहे. या समूहाने आपले कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर प्लांटचे संपूर्ण डीकार्बनाईझेशन साध्य केले आहे म्हणजेच प्लांटचे संचालन १००% हरित ऊर्जेवर केले जाते. शिवाय, एसए...
A one-day national workshop : ‘स्वारातीम’ विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न -NNL

A one-day national workshop : ‘स्वारातीम’ विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न -NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ऑक्टोबर रोजी गणितातील अलीकडील विकासावर ऑन सम रिसेंट डेव्हलपमेंट इन मॅथेमॅटिक्स या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस चे वरिष्ठ गणित तज्ञ प्रो. के. श्रीनिवास यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे प्रो. के. श्रीनिवास, बिट्स पिलानी, हैदराबाद कॅम्पसचे (बीआयटीएस पिलानी) प्रो. बी. मिश्रा आणि आयआयआयटीडीएम, चेन्नईचे प्रो. एम. सुब्रमणी उपस्थित होते. प्रो. श्रीनिवास यांनी आपल्या उद्घाटन भाषणात गणित आणि सांख्यिकीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कष्टाचे महत्त्व, संशोधनाच्या नव्या दिशा आणि या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी विविध संकल्पना म...
Employment Opportunities in BFSI : सणासुदीच्या मोसमात बीएफएसआयमधील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ -NNL

Employment Opportunities in BFSI : सणासुदीच्या मोसमात बीएफएसआयमधील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ -NNL

मुंबई
मुंबई| सणासुदीच्या मोसमाचा आरंभ झाल्या-झाल्या भारतातील बँकिंग, फायनॅन्स सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्र ग्राहकांचे वाढते व्यवहार आणि देवाण-घेवाण यांच्या व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे. या धामधुमीच्या कालावधीत योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक संस्था डिजिटल बँकिंग संचालन वाढवण्यावर आणि उत्तम ग्राहक सेवा प्रदान करू शकेल असे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. टीमलीझ सर्व्हिसेस या अग्रगण्य स्टाफिंग समूहानुसार बीएफएसआय क्षेत्रात रोजगार संधींमध्ये लक्षणीय वृद्धी दिसत आहे, विशेषतः रिटेल लेंडिंग, मायक्रोफायनॅन्स संस्था (एमएफआय) आणि पेमेंट सेवांमध्ये. गेल्या चार महिन्यांत वैयक्तिक तसेच दुचाकी आणि चार-चाकी वाहन कर्जांची मागणी १२%नी वाढली आहे. ही मागणी सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या सणासुदीच्या खरेदीच्या मोसमाने प्रेरित आहे. त्याचा थेट परिणाम रि...
Chaitanya Bapu Deshmukh : सेवा क्षेत्रात उद्योजकांना मोठ्या संधी- चैतन्य बापू देशमुख -NNL

Chaitanya Bapu Deshmukh : सेवा क्षेत्रात उद्योजकांना मोठ्या संधी- चैतन्य बापू देशमुख -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महिलांनी गृह उद्योगांबरोबरच सेवा क्षेत्रात पदार्पण करून आपली आर्थिक उन्नती साधावी, कारण सेवा क्षेत्रात सध्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन उद्योजक चैतन्य बापू देशमुख यांनी केले. अंबिका मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या दीपोत्सव या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आज उद्योगांमध्ये आपला ठसा उमटवीत आहेत याचा मला आनंद वाटतो. नांदेड शहरात अशा प्रकारे महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत ही निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी बी बी एन फाउंडेशनचे कौतुक केले. याप्रसंगी सौ. देशमुख म्हणाल्या की, महिलांची अशीच प्रगती झाली पाहिजे. अशा कार्यासाठी आमचे सदैव पाठबळ राहील. या प्रसंगी उद्योजक उमेश जालनेकर, श्रीपाद योगी, सुधीर देशमुख, विद्याधर कुंभोजकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या कौशल्याल...
Dr. Shekhar Ghungarwar : नवतदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा – प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

Dr. Shekhar Ghungarwar : नवतदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा – प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड| वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नवमतदारांना मतदानाचे महत्व पटवून सांगण्यासाठी नांदेड दक्षिण स्विप उपक्रमा अंतर्गत वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात शुक्रवारी दि. २५ ऑक्टोबर रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली, विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयीची शपथ घेतली. लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी नवमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभेसाठी पोटनिवडणूक दि. २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात मतदारांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड दक्षिण स्विप उपक्रमा अंतर्गत वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शना खाली शुक्रवारी दि. २५ रोजी महाविद्यालयात मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ...
Voter awareness rally : मतदार जनजागृती रैलीने देगलूर शहर दुमदुमले -NNL

Voter awareness rally : मतदार जनजागृती रैलीने देगलूर शहर दुमदुमले -NNL

Blog, करियर, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी मतदान झालेले एकूण 25 मतदान केंद्रात असून त्यापैकी देगलूर शहरांमध्ये एकूण 10 मतदान केंद्र आहेत . प्रस्तुत 10 मतदान केंद्रात स्वीपद्वारे लक्ष केंद्रीत करण्यात येत असुन या भागात विविध उपक्रम राबवीण्यात येत आहेत. त्यामुळे देगलूर शहरांमध्ये जास्तीत जास्त मतदार जनजागृती व्हावी तसेच लोकांमध्ये मतदान महत्व व प्रक्रियेविषयी जनजागृती करण्यासाठी भव्य मतदार जन जागृती रैलीचे आयोजन करण्यात आले होते. देगलूर शहरातील साधना हायस्कूल , सावित्रीबाई फुले हायस्कूल , प. पु . गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूजा पब्लिक स्कूल , मौलाना आझाद उर्दू स्कूल, ज्ञानसरस्वती इंग्लिश स्कूल व देगलूर शहरातील सर्व शाळेतील दोन हज़ार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रस्तुत रैलीमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, शिक्ष...
Bachhubhau Kadu : लाडकी बहीण आणली पण शेतीमालाचे काय …? देगलूरच्या सभेत बच्चुभाऊ कडु काँग्रेस -भाजपवर कडाडले -NNL

Bachhubhau Kadu : लाडकी बहीण आणली पण शेतीमालाचे काय …? देगलूरच्या सभेत बच्चुभाऊ कडु काँग्रेस -भाजपवर कडाडले -NNL

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार जागृत झालेला आहे त्यामुळे रंगी बेरंगी झेंडे घेऊन सामान्य जनतेला विभागणार्या आणि पोकळ विकासाचे आश्वासन देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही तर पायाभूत विकासाचा अजेंडा चालविणार्यांनाच मतदान करणार आहे.त्यामुळे अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या कांग्रेस व भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणार असे प्रतिपादन प्रहार जनशक्तीचे प्रमुख व आमदार बच्चु कडू यांनी सुभाष साबणे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी देगलूर येथील आयोजित प्रचार सभेत केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, महानगराध्यक्ष प्रितपालसींह साहु यांची प्रमुख उपस्थिती होती. “शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची लढाई गेल्या ७५ वर्षांपासून आपण लढतो आहोत.माझ्यावर ३०० च्या वर गुन्हे दाखल आहेत अजूनही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मानसन...
Pathways : उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन -NNL

Pathways : उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन -NNL

नांदेड, क्राईम
उस्माननगर| कंधार लोहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्माननगर पोलिस स्टेशन तर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात व उस्माननगर येथील प्रमुख रस्त्याने पथसंचलन काढण्यात आले. यावेळी कंधार तालुक्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप यांनी भेट दिली. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नांदेड व वरिष्ठ अधिकारी यांच्या सुचनेवरून उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि सि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि .गाडेकर , सपोउपनि, सुर्यवंशी , केद्रे यांनी उस्माननगर येथील पो.स्टे. पासून गावातील प्रमुख रस्त्याने पथसंचलन काढण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचारी सह बी.एस.एफ.बल तुकडीसह उस्माननगर पोलिसांनी परिसरात पथसंचलन करण्यात आले.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आले आहे....
Nose Inspection Center : नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व‌‌ दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी तिनं ठिकाणी नाके तपासणी केंद्र -NNL

Nose Inspection Center : नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व‌‌ दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी तिनं ठिकाणी नाके तपासणी केंद्र -NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिनं ठिकाणी नाके तपासणी केंद्र करण्यात आली असून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी महसुल व पोलीस कर्मचारी यांच्या करण्यात येत असुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची नोदं करण्यात येत आहे. लोकसभा पोटनिवडणुक व‌ 87 नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शना‌ खाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या आदेशानुसार नांदेड लातूर रोडवर डेरला‌ पाटी नजीक, नांदेड बोढांर असना रोड नजीक कै.शंकरराव चव्हाण चौक मार्गावर. नांदेड हैदराबाद रोडवरील काकांडी जवळ तिन‌ ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी व्हिडिओ कॅमेराचा सहायाने कॅमेरामान महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत तपासणी चोविस तास करत असुन वाहन नंबर...
Various awareness programs : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम -NNL

Various awareness programs : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 86- नांदेड उत्तर आणि 87- नांदेड दक्षिण मतदारसंघांमध्ये व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. यानिमित्त आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर्स) च्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचणे, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, मतदान शपथ, महिला बचत गटांचे मेळावे, विविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करणे, तसेच ऑटोरिक्षातून जागृती संदेश प्रसारित करणे या उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. महेश ...
error: Content is protected !!