उस्माननगर| कंधार लोहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्माननगर पोलिस स्टेशन तर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात व उस्माननगर येथील प्रमुख रस्त्याने पथसंचलन काढण्यात आले. यावेळी कंधार तालुक्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप यांनी भेट दिली.


आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नांदेड व वरिष्ठ अधिकारी यांच्या सुचनेवरून उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि सि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि .गाडेकर , सपोउपनि, सुर्यवंशी , केद्रे यांनी उस्माननगर येथील पो.स्टे. पासून गावातील प्रमुख रस्त्याने पथसंचलन काढण्यात आले.

यावेळी पोलिस कर्मचारी सह बी.एस.एफ.बल तुकडीसह उस्माननगर पोलिसांनी परिसरात पथसंचलन करण्यात आले.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आले आहे.
