Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Candidacy in Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ नामनिर्देशान पत्र दाखल -NNL

Candidacy in Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ नामनिर्देशान पत्र दाखल -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव| हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघ निवडणूकीसाठी आज १४ व्यक्तीनी १५ उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. आजपर्यत १४३ व्यक्तिनी २३५ अर्जाची उचल केली असल्याचे नामनिर्देशनपत्र विक्री करणारे शिवाजी पारडकर यांनी कळविले आहे. शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारांनी ४८ उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम, अपक्ष म्हणून माजी आमदार सुभाष वानखेडे आदींसह अनेक दिग्गजांनी अनामनिर्देशन दाखल केला आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यात गजानन बाबुराव काळे अपक्ष,पांडुरंग दावजी दुधाडे अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार अपक्ष, दत्तात्रय पांडुरंग अनंतवार अपक्ष,विलास नारायण सावते आझाद समाज पार्टी (काशीराम),राजू कोंडबा राऊत अपक्ष,अभिजीत गोधाजीराव मुळे अपक्ष, माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,उद्धव दाजीबाराव देशमुख सूर्यवंशी अपक्ष,डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण अपक्ष,दिली...
Pradeep naik nomination ; शक्तीप्रदर्शन करत माजी आ.प्रदीप नाईक यांचा नामांकन अर्ज दाखल -NNL

Pradeep naik nomination ; शक्तीप्रदर्शन करत माजी आ.प्रदीप नाईक यांचा नामांकन अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला असून हुतात्मा गोडराजे मैदान येथून ढोल ताशाच्या गजरात रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील नागरिक व महिलांनी प्रचंड गर्दी केली. यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना माजी आ. प्रदीप नाईक यांनी भारताची लोकशाही वाचविण्याची ही निर्णायक वेळ असल्याचे सांगत शोषित वंचित समाजाच्या कल्याणासाठी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर शिका मारून महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. किनवट विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर माजी. आमदार प्रदीप नाईक यांनी किनवटचा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर...
filled by Irwant Suryakar : सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज -NNL

filled by Irwant Suryakar : सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज -NNL

नांदेड, राजकीय
नायगाव बाजार| दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अंतर्गत नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. रयत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवेला, कार्याला सुरुवात केली. ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य, शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण माझा मागास घटकातील मुला-मुलींना वंचित असलेल्या शिक्षणापासून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम, नांदेड जिल्ह्यात जवळपास 100 गावांमध्ये लोक जैवविविधता च्या माध्यमातून केलेले काम आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा 2009 पासून काम करीत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ते समन्वयक म्हणून सुद्धा काम करीत आहेत. मागील उमेद संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदच्या प्रलंबित मागण्याबाबत विविध मोर्चे आंदोलन,उपोष...
Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL

Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| विष्णुपुरी येथील गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे संतां ची सालाना बरसी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वारा चे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी, लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरिंदरसिंघ जी कारसेवावाले व संत बाबा बलविंदरसिंघ जी कारसेवावाले यांची प्रमुख उपस्थिती होती. महान कारसेवक सचखंडवासी संत बाबा दलीपसिंघ जी ,सचखंडवासी संत बाबा जीवनसिंघजी, सचखंडवासी संत बाबा हरिसिंघ जी आणि सचखंडवासी संत बाबा शीशासिंघ जी कारसेवा वाले यांची सालाना बरसी श्रद्धेने साजरी करण्यात आली. या शुभप्रसंगी श्री अखंड पाठ,संत, थोर सद्गुणी व रागी सज्जन कीर्तन व प्रवचन झाले. वाजेगव ते शिकारघाट, शिकारघाट ते हिरा घाट आणि विद्यापीठ ते रतनगड पर्यंतचा रस्ता आणि शिकारघाट येथील गोदावरी नदी वरील पुल संत बाबा दलीपसिंघ जी...
Candidates’ social media accounts will be checked : सावधान ! उमेदवारांच्या सोशल मिडीया खात्यांची तपासणी होणार -NNL

Candidates’ social media accounts will be checked : सावधान ! उमेदवारांच्या सोशल मिडीया खात्यांची तपासणी होणार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला गती आली असून आता उद्या 30 ऑक्टोबर रोजी छाननी व 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेतले जाणार आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करतांना त्यांचे कोणते समाज माध्यम आहेत हे देखील नमूद करावे लागते. या सर्व समाज माध्यमांची दररोज तपासणी एमसीएमसीच्या समाज माध्यम शाखेकडून होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकदा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची जबाबदारी वाढणार आहे. भारत निवडणूक आयोगाने खर्च, प्रसिद्धी, प्रचार, सभा, रॅली, प्रचाराचा कालावधी, वृत्तपत्रात द्यावयाच्या जाहिराती, समाज माध्यमांवरील जाहिराती तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत कडक नियम केले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये याची प्रभावी अंमलबजावण...
Laxity of Forest Range Officers : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे “जंगल में मंगल” – NNL

Laxity of Forest Range Officers : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे “जंगल में मंगल” – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| वृक्ष लागवड करून झाडे लावा - झाडे जगवाचा संदेश वनक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात दिला जात आहे. परंतु हिमायतनगर येथील वन परिक्षेत्र अधिकारी नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत असल्याने सागवान तस्करांचे "जंगल में मंगल" होत असल्याने वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सागवान तस्करात तेलंगणा राज्यातील तस्करांचा समावेश असताना वर्षभरात वनविभागाने सागवान तस्करांच्या बाबतीत एकही कार्यवाही केली नसल्याने वनाधिकाऱ्याच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एकीकडे सर्वत्र जागतिक तापमान वाढत असल्याचे संकट उभे असताना, दुसरीकडे मात्र लाकूड तस्करामुळे जंगल भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या काळात हिमायतनगर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड करून, वृक्ष जोपासना करीत वृक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्य...
Excise Department action ; उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 54 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त -NNL

Excise Department action ; उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 54 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड, मुंबई
मुंबई| राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोंबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 अशा एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 54 लाख 48 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे 35 लाख 73 हजार 400 व मुंब्रा येथे 18 लाख 75 हजार 200 रूपयांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 टेम्पो वाहने, 2232 किलो भांग मिश्रीत पदार्थ, पर...
Prof. Dr. Kiran Deshmukh : इतिहास संशोधक प्रा.डॉ.किरण देशमुख यांचे दुःखद निधन -NNL

Prof. Dr. Kiran Deshmukh : इतिहास संशोधक प्रा.डॉ.किरण देशमुख यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| अर्जापूर ता.बिलोली येथील हुतात्मा पानसरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा मराठवाड्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.किरण देशमुख (७२) यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. हुतात्मा गोविंदराव शिक्षण प्रसारक मंडळाच्या पानसरे महाविद्यालय अर्जापूर ता.बिलोली येथील महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.किरण देशमुख यांचे पुणे येथे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रियाही झाली होती. गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत ठिक नव्हती. मराठवाड्यातील शिल्पकलेचा अभ्यास, इतिहास संशोधन यावर त्यांनी प्रचंड लिखान केले होते. शिल्पातील सौंदर्य व मराठवाड्याच्या शिल्पकलेचा इतिहास यावर त्यांची महाराष्ट्रभर व्याख्यानेही झाली होती. शिल्पातील सौंदर्य, त्यातील बारकावे, भारतीय संस्कृती तसेच धार्मिक, अध्यात्मिक परंपरा, रितीरिव...
Inspector of Police Department : खर्च व सामान्य निरीक्षकासह पोलीस विभागाचे निरीक्षक नांदेडमध्ये दाखल -NNL

Inspector of Police Department : खर्च व सामान्य निरीक्षकासह पोलीस विभागाचे निरीक्षक नांदेडमध्ये दाखल -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले आहे. नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84- हदगाव या विधानसभा क्षेत्रासाठी तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांची तर 87-नांदेड दक्षिण- व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांची तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांची सामान्य निरीक्षक म्हणून दाखल ...
Action against Gutkha Mafia : पाळज येथे गुटखा माफियांविरुध्द कारवाई; 20 लक्ष 66 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Action against Gutkha Mafia : पाळज येथे गुटखा माफियांविरुध्द कारवाई; 20 लक्ष 66 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर एस.एस.टी. पाँईट पाळज येथे वाहण तपासणी दरम्याण दिनांक 28/10/2024 रोजीचे 19.25 वाजेचे सुमारास राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व गुटखा एकुण किंमत 12 लक्ष 66 हजर 400/- रुपयाचा मुद्देमाल महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन MH-37-T-3601 कि.अं. 8 लक्ष रुपयाचा असा एकुण किंमत 20 लक्ष 66 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल घेऊन वाहतूक करताना आढळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट व आगामी विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुक अनुषंगाने सर्व आंतरराज्य सिमेवर अवैध वाहतुक, शस्त्र, गुटखा जप्ती इ. ची वाहतुक होणार नाही याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अजित कुंभार पो. स्टे. प्रभारी अधिकारी भोकर यांनी SST पाळज व रहाटी येथील आंतरराज्य सिमेवरील असलेल्या पोलीस अंमलदार ...
error: Content is protected !!