Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
बचत गटांच्या महिलांनी केला मतदानाचा निर्धार – NNL

बचत गटांच्या महिलांनी केला मतदानाचा निर्धार – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l सिडको परिसरातील रुबी हॉटेल या ठिकाणी 28ऑक्टोबर रोजी महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान जनजागृतीच्या संदर्भात 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्ष मार्फत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत असताना स्वीप कक्षातील जेष्ठ सदस्य व महिला बचत गट विषयक अभ्यासाचे तज्ञ प्रा.डाॅ. घनश्याम येळणे, संचालक सामाजिक शास्त्रे संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटातील महिलांनी असा निर्धार केला की, येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह मतदान करण्याकरिता निर्धार करीत आहेत. याप्रसंगी बोलत असताना प्रा.डॉ येळणे असे म्हणाले की, 'भारतासारख्या मोठ्या लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये महिलांचा राजकीय सहभाग हा मतदानाच्या माध्यमातून असणे हे आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.' ...
Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL

Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL

नांदेड, राजकीय
 नवीन नांदेड l नांदेड लोकसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते महारूद्र हे केशवराव पोपळाईतकर यांनी काकांडी येथे आज दि. २८ आक्टोबर रोजी सत्याई देवी येथे नारळ फोडून आर्शीवाद घेऊन भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत नांदेड तहसिल कार्यालय येथे १ वाजता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व विधानसभा असे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, यावेळी नांदेड तहसिल कार्यालय येथे शेकडो समर्थकांच्या उपस्थित होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तरूण तडफदार व युवा नेते, म्हणून परिचित असलेले सामाजिक बांधिलकी जोपासणारे अपक्ष उमेदवार महारुद्र पोपळकाईतकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सामाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व दक्षि...
Rohit Sheth Adaktalwar ; युनायटेड पद्मशाली संघमच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहीत शेठ अडकटलवार यांची नियुक्ती – NNL

Rohit Sheth Adaktalwar ; युनायटेड पद्मशाली संघमच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहीत शेठ अडकटलवार यांची नियुक्ती – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघमचे अध्यक्ष बाबूराव मँडम व उपाध्यक्ष गोपाल गोरंट्याल यांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या बैठकीत रोहित शेठ अडकटलवार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पद्मशाली समाजासाठी देश पातळीवर काम करणारी युनायटेड पद्मशाली संघम ही संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव मँडम व उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक गोपाल गोरंट्याल यांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत संघटनेने केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रात पद्मशाली समाजासाठी भरीव काम करण्याचे धोरण ठरविण्यात आले. महाराष्ट्रात पद्मशाली समाजासाठी काम करायचे असल्यास संघटनेचा राज्यात विस्तार करण्याचे धोरण सदरच्या बैठकीत ठरवण्यात आले. अखिल भारतीय युनायटेड संघमच्या विस्तारासाठी सक्षम पदाधिकाऱ्याची गरज असल्याने नांदेड जिल्ह्याती...
Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप कक्षाच्या वतीने मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम घेतले जात आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिका वजीराबाद येथील शाळा क्रमांक 1 मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र लिहिले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारे संकल्पपत्र लिहून आपल्या पालकांना दिले. त्यांना मतदान करण्याचे वचन देण्यास प्रवृत्त केले आहे. यामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला आहे. याशिवाय मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी, रॅली यासारखे उपक्रमही घेतले जात आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंग संधू व शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, सर्व शिक्षक व पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता....
Study Diwali of Akshar Parivar ; अक्षर परिवाराची अभ्यास दिवाळी – NNL

Study Diwali of Akshar Parivar ; अक्षर परिवाराची अभ्यास दिवाळी – NNL

नांदेड, करियर
नांदेड | दीपोत्सव अर्थात दिवाळी म्हटले की प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आलेले आपण पाहतो. सर्वत्र विद्युत रोषणाई, मंद, उबदार दिव्यांची आरास घरांची शोभा वाढवत असते. तसेच घराघरात आपापल्या ऐपतीप्रमाणे निरनिराळे रुचकर, चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी असते. दीपावली सुट्ट्यांमध्ये ह्या सर्व आनंदोत्सवात कृतियुक्त, सृजनात्मक घरच्या अभ्यासाची गोड भेट देऊन अक्षर परिवार नावाने राज्यभर सुपरिचित असणाऱ्या वाजेगाव बीट ने अक्षर दिवाळी साजरी करत आपले वेगळेपण जपले आहे. या माध्यमातून बीट मधील तेराही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते नववी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिवाळी अभ्यासाच्या कृतीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये अभ्यासाला पडणाऱ्या खंडाला आळा बसणार आहे.अनेकदा दिवाळी सण संपल्यावर उर्वरित सुट्ट्यांमध्ये मुलांनी करावे काय असा प्रश्न त्यांना पडत...
Adarsh ​​Diwali Special Article ; आदर्श दिवाळी विशेष लेख – NNL

Adarsh ​​Diwali Special Article ; आदर्श दिवाळी विशेष लेख – NNL

लेख, नांदेड
प्रस्तावना - 'तमसो मा ज्योतिर्गमय' या श्लोकाचा अर्थ : 'हे भगवंता ! आपण मला असत्याकडून सत्याकडे,अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे 'अशी प्रार्थना आहे.प्रत्येक प्राणिमात्रांची धडपड प्रकाशाकडे जाण्याची असते. ज्या स्थितीत आहोत त्याच्या पुढील स्थितीत जाण्यासाठी, प्रगती करण्याकडे असते. अर्थात नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे जायचे असते. जीवनात सकारात्मकता शिकवणारा, प्रकाशाकडे वाटचाल करण्यास शिकवणारा सण म्हणजे दिवाळी. सत्याच्या विजयाचे प्रतिक ! - प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून दिवाळीच्या दिवशी अयोध्येत परत आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाने प्रजेला खूप आनंद झाला. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीत घरोघरी तुपाचे दिवे लावून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रभू श्रीराम सत्याचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांचा विजय म्हणजे सत्याचाच विजय होता. या विजयाचा उत्सव म्हणून आपण दिवाळी दीपोत्...
Chikhlikar’s candidacy was filed ; अलोट..अभूतपूर्व मतदारांची.. गर्दी… उत्साह … दहा वर्षानंतर माजी खा. चिखलीकरांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल -NNL

Chikhlikar’s candidacy was filed ; अलोट..अभूतपूर्व मतदारांची.. गर्दी… उत्साह … दहा वर्षानंतर माजी खा. चिखलीकरांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात दहा वर्षानंतर हर्ष उल्हासात ..अलोट..अभूतपूर्व.. मतदारांची गर्दी ...असा वातावरणात .. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत लोहा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारती समोरील मैदानावर मिरवणुकीपूर्वी जाहीर सभा झाली. विधानसभा मतदार संघातील मतदाराच्या अलोट गर्दीने मैदान भरले होते..सगळीकडे माणसंच माणसं होती... लाडक्या बहिणीची लक्षणीय उपस्थिती होती. आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी, व्यासपीठावर उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, चैतन्यबापू देशमुख भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष देशमुख, प्रदेश सरचिटणीस ...
relationships are at risk ; सत्तेची नशा अशी की नातीगोतीही पणाला लागली -NNL

relationships are at risk ; सत्तेची नशा अशी की नातीगोतीही पणाला लागली -NNL

नांदेड, लेख
सत्ता सुंदरीची नशा कशी असते पहा. एकदा ही नशा माणसाला चढली की, त्यापुढे नाती-गोती, भाव-भावना, सत्य-असत्य कशाचेही भान माणसाला राहत नाही. विधान सभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात जे सध्या चित्र दिसत आहे. त्यातून राजकारणापुढे नात्यागोत्याला कवडीमोल किंमत असते हेच दिसून येते. राजकारणाचा असा हा खेळ, नाही कोणाचा कोणाला मेळ असे सध्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या विधान सभा निवडणूक सुरु आहे. या निमित्ताने विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीत उतरवत आहेत. राजकारण ही विचाराची लढाई आहे आणि यात विचारावरील निष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे अशी सर्वाची समजूत होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण हे केवळ सत्तेसाठी असते. सत्ता मिळविण्याकरिता तुम्ही कोणत्याही थराला गेला तर तुम्हाला माफ आहे. राजकारणात निष्ठेला कवडीमोल किंमत असते असाच संदेश नागरिकात जात आहे. सध्या प्रमुख राजकीय पक्ष आपले उ...
Bhimrao Keram filed nomination : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आ. भिमराव केराम यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र -NNL

Bhimrao Keram filed nomination : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आ. भिमराव केराम यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहुर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आ.भिमराव केराम यांनी दि.२८ ऑक्टों.रोजी    किनवट/ माहुर विधानसभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारत माता की जय,पंतप्रधान नरेंद्र मोदी की जय, आ. केराम तुम आगे बढो च्या जयघोषाने किनवट शहर दणाणून गेले होते.       किनवट येथील गोंडराजे मैदानातून विशाल रॅलीला सुरुवात झाली.बंजारा समाजाच्या महिला भगिनींनी पारंपारिक वस्त्र परिधान करून रॅलीत भाग घेतला होता.अनेक पथकाने केलेल्या परंपरागत आदिवासी नृत्याने रॅलीला अधिक रंगत आणली.या रॅलीत भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड, शहराध्यक्ष संतोष चनमनवार, माजी नगरसेवक अजय चाडावार, शिवाजी आंधळे, दयानंद दराडे, सुनील मच्छेवार, गजानन शिवणकर, कल्गोटूवार,प्रा.राजेंद्र केशवे,तालुकाध्यक्ष क...
Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेसाठी सोमवारी २५ उमेदवारांनी केले ३१ उमेदवारी अर्ज दाखल – NNL

Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेसाठी सोमवारी २५ उमेदवारांनी केले ३१ उमेदवारी अर्ज दाखल – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ३१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यान मध्ये विजयकुमार सोपानराव भरणे अपक्ष,अॅड. रामदास शिवराम दरणे अपक्ष, बाबुराव विश्वनाथराव मुनेश्वर अपक्ष,शेख जाकीर शेख महंमद चाऊस रिपब्लिकन सेना ,अब्दुल समदखान हाजी जलालखान अपक्ष, वैशाली मारोतराव हुके पाटील अपक्ष ,डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण अपक्ष, अॅड.मारोतराव कानोबाराव हूके पाटील अपक्ष,विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर अपक्ष,निळकंठ मुकुंदराव कल्याणकर अपक्ष, रमेश माधवराव नरवाडे अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार अपक्ष ,करण उत्तमराव गायकवाड अपक्ष, उत्तम रामा गायकवाड अपक्ष, प्रकाश रामा घुन्नर अपक्ष, सुभाष मारोतराव जाधव अपक्ष, दिलीप आला राठोड वंचित बहु...
error: Content is protected !!