Friday, July 17

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Voting awareness ; नांदेड तहसील कार्यालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न – NNL

Voting awareness ; नांदेड तहसील कार्यालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l स्विप कक्ष ८७ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दक्षिण नांदेड २०२४ "स्वीप कक्ष" तहसील कार्यालय ,नांदेड च्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम व मतदान शपथ हा उपक्रम स्विप कक्ष ,नांदेड ८७ यांचे सहाय्याने विहान काळजी व आधार केंद्र येथे आज दि.७ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाकरिता स्वीप कक्षाचे सदस्य प्रा.डॉ .घन:शाम येळणे संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, विहान प्रकल्प व्यवस्थापक श्री ऋषिकेश कोंडेकर व प्रकल्प व्यवस्थापक कल्पना कोकरे व सर्व स्टाफ यांनी सर्व क्लाईंटला आपल्या भेटीदरम्यान मतदान करण्याचे व राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन करू असे सांगितले. एकूणच राष्ट्रीय कार्यक्रमात स्वीप कक्ष ८७ तहसील कार्यालय नांदेड ,दक्षिण सहकार्याने सहभाग नोंदविण्यात आला....
MPDA Police Action ; लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द -NNL

MPDA Police Action ; लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आगामी लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यावरून आज एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदांराकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. MPDA अंतर्गत 23 आरोपीतांना कारागृहामध्ये " स्थानबध्द " करण्यात आले आहे. तसेच लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पार्श्वभुमीवर गुन्हेगार...
3 lakh 38 rupees seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त – NNL

3 lakh 38 rupees seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 6 नोव्हेंबर रोजी विभागाने 16 ठिकाणी धाडी टाकून एकूण 3 लाख 38 हजार 980 रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 16 गुन्हे, वारस 16, अटक आरोपी 16, रसायन 450 लि. देशी मद्य 94.20 लि., जप्तवाहन संख्या 03  जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 3 लाख 38 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पा...
demanding a bribe of 25,000  : रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक गजानन मुतनेवाड व उपसरपंच संजय माझळकर यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई -NNL

demanding a bribe of 25,000 : रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक गजानन मुतनेवाड व उपसरपंच संजय माझळकर यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| रोजगार हमी योजने अंतर्गत मौ. दुधडवाडी/वाळकेवाडी, ता. हिमायतनगर अंतर्गत रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवक गजानन श्यामराव मुतनेवाड उपसरपंच संजय शिवराम माझळकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 22 रोजी पडताळणी करून दिनांक 07 रोजी लाच मागणाऱ्या उपसरपंचास ताब्यात घेतले आहे. या लाचखोर ग्रामसेवक व उपसरपंचावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या आदिवासी बहुल भागातील 54 वर्षीय तक्रारदार हे त्यांचे रोजगार हमी योजनेअंतर्गत मौ. दुधडवाडी/वाळकेवाडी, ता. हिमायतनगर अंतर्गत रोजगार सेवकाचे मानधन 35,388/- रूपये मिळण्यासाठी ग्रामसेवक गजानन श्यामराव मुतनेवाड, पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत, मौ. दुधड वाळकेवाडी, ता., हिमायतनगर जि. नांदेड रा. भोकर जि. नांदेड यांन...
This year fireworks are ‘fireworks’ of inflation : यंदा आतषबाजीला महागाईचे ‘फटाके; यंदा फटाका बाजारात विक्रमी उलाढाल -NNL

This year fireworks are ‘fireworks’ of inflation : यंदा आतषबाजीला महागाईचे ‘फटाके; यंदा फटाका बाजारात विक्रमी उलाढाल -NNL

नांदेड
नांदेड| दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये सर्रासपणे ४० ते ५० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे असे असतांनाही निवडणुका व दिवाळी सण लागून आल्याने येथील फटाका मार्केटमध्ये विक्रमी उलाढाल झाली परंतु फटाका मार्केट मध्ये सर्वच नियमांची पायमल्ली करत करोडो रुपयांच्या शासकीय महसूलाचीही लूट झाल्याची माहीती फटाक्याच्या होलसेल विक्रेत्याकडूनच प्राप्त झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी यंदा फटाका मार्केट हे गर्दीने फुलले होते एकंदरीत दिवाळी सण व विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा नागरिकांमधील उत्साह वाढून फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल झाली आहे. परंतु बहती गंगा मे करोडो रुपयांचा शासकीय महसूलास हरताळ फासतांनाच फटाका असोशिएसनेने...
My opinion is my right : ‘माझे मत माझा अधिकार’ तो मी बजावणारच; नवमतदार शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा संकल्प -NNL

My opinion is my right : ‘माझे मत माझा अधिकार’ तो मी बजावणारच; नवमतदार शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा संकल्प -NNL

नांदेड, करियर
भोकर| भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा हक्क-अधिकार प्रदान केला आहे. निसंदेह 'माझे मत माझा अधिकार' आहे तो लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी बजावणारच असा संकल्प शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील नवमतदार विद्यार्थिनींनकडून कऱण्यात आला आहे. ८५- भोकर विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रम घेऊन, नवमतदार मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, स्वीप कक्ष प्रमुख सुमन गोणारकर, वस्तीगृह अधिक्षिका सौ सुमित्रा साळुंके,आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. यास नव मतदार विद्यार्थिनींनी मोठा प्रतिसाद देत...
Inauguration of Selfie Stand in Loha : लोहा विधानसभा क्षेत्रात सेल्फी स्टॅण्डचे निवडणूक अधिकारी संगेवार याच्या हस्ते उद्घाटन -NNL

Inauguration of Selfie Stand in Loha : लोहा विधानसभा क्षेत्रात सेल्फी स्टॅण्डचे निवडणूक अधिकारी संगेवार याच्या हस्ते उद्घाटन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात सार्वजनिक ठिकाणी सेल्फी स्टॅण्ड उभे करण्यात येणार आहेत. त्याचे उद्घाटन निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या हस्ते सेल्फीने झाला डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप याची मतदार सेल्फी काढली. तहसील कार्यालयात लोहा विधानसभा निवडणूक अनुषंगाने दोन्ही तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक पार पडल्यानंतर व्हॉटर सेल्फी स्टॅण्ड चे निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार , डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप यांनी सेल्फी काढून उद्धघाटन केले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी .तहसीलदार रामेश्वर गोरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी लाळगे उपस्थित तसंच स्विप टीम चे प्रमुख गटशिक्षणाधिकारी सतिश सोनटक्के कंधार चे बिईओ येरमे सर्व टीम उपस्थित होती....
Successfully Overcome Severe Dengue : गंभीर डेंग्यूवर यशस्वीपणे मात – यशोदा हॉस्पिटलच्या टिमचे सुयश -NNL

Successfully Overcome Severe Dengue : गंभीर डेंग्यूवर यशस्वीपणे मात – यशोदा हॉस्पिटलच्या टिमचे सुयश -NNL

छत्रपती संभाजीनगर, आरोग्य, नांदेड
नांदेड। सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून तालुक्यातील नागापूर येथील मूळ रहीवाशी असलेल्या योगेश केरबाजी मस्के या २६ तरुणाचे अतिगंभीर डेग्यूं मधून मुक्तता करून देत त्यास जिवनदान दिले आहे. अतिगंभीर डेंग्यू मध्ये भयंकर तापासोबतच एकाचवेळी किंवा टप्प्याने ईतर शारीरीक अवयव निकामी होण्याच्या धोक्याच्या परिस्थितीतून तरुण रुग्णास मरणाच्या दारातून यशस्वीपणे परत आणत अतिगंभीर परिस्थितीत पोहचलेल्या डेंग्यूवर यशस्वी उपचार करत मोठी ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे अशी माहीती तज्ञ डॉ.दुर्गेश साताळकर, डॉ.मधूसूधन जाजू, डॉ.टि. शशिकांत व यशोदा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने पत्रकार परिषेदेत देण्यात आली ननागापूर ता.नांदेड येथील योगेश केरबाजी मस्के २६ वर्षीय तरुण रुग्णांस भयंकर ताप व अशक्तपणासह या लक्षणांसह अतिगंभीर अवस्थेतील डेंग्यू आजारात यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद ये...
Dr. Santukrao Humbarde  काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले – डॉ. संतुकराव हंबर्डे -NNL

Dr. Santukrao Humbarde काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले – डॉ. संतुकराव हंबर्डे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| काँग्रेसने गेली 70 वर्षे लबाड बोलून देशाला फसवले आहे. देशातील गोरगरीब जनतेला लुटले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशातील जनतेच्या विकासाचे आणि हिताचे सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाच्या सरकारकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभर विकासाची गंगा सुरू आहे. आपल्यालाही ही विकासाची गंगा नांदेडमध्ये आणायची आहे. त्यासाठी नांदेड मधील होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले. देगलूर तालुक्यातील हाणेगाव आणि करडखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ . डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह करडखेड येथील सभेस देगलूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार जितेश अंतापुरकार , देवि...
Devendra Fadanvis ; 95 गावांना चिमटा धरणामुळे विस्थापित होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस -NNL

Devendra Fadanvis ; 95 गावांना चिमटा धरणामुळे विस्थापित होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ दिनांक 7 रोजी किनवट येथील जाहीर सभेत बोलत असताना या मतदारसंघात होऊ घातलेल्या चिमटा धरण या प्रकल्पात 95 गावी ही बुडीत क्षेत्रात जात असल्याचा आरोप विरोधकाकडून होत असल्याने त्यापैकी एकही गाव हे मी विस्थापित होऊ देणार नाही बुडीत क्षेत्रात येऊ देणार नाही कारण मी स्वतः पाटबंधारे मंत्री असल्याने एकाही शेतकऱ्यांची नुकसान होऊ देणार नाही. अशा स्वरूपाची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित करताना दिली. त्याचबरोबर लाडक्या बहिणी संदर्भात सावत्र भावापासून सावध रहा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लाडकी बहीण योजना बंद करण्यात यावी यासाठी आघाडीच्याच लोकांनी हायकोर्टात धाव घेतली असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. पण हायकोर्टाने त्यांच्या...
error: Content is protected !!