Friday, July 17

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Nikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार साडी तर पुरूषांना ड्रेस वाटप – NNL

Nikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार साडी तर पुरूषांना ड्रेस वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कार्यात नेहमी उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निखील देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील कार्यरत महिला पुरुष सफाई कामगार यांना साडी व ड्रेस वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. निखलेश देशमुख यांनी सिडको हडको परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत, याही वर्षी सिडको क्षेत्रीय कार्यालये अंतर्गत साफसफाई महिला व पुरुष कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत साडी व ड्रेस वाटप करून मिठाई वाटप‌ करण्यात आली.यावेळी आनंदा गायकवाड,किरण हाटकर,वैभव निलावाड,पवन शर्मा,मेघराज घुसे पाटील यांच्या सह निखलेश देशमुख मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते....

School Sports ; राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय शालेय 14 वर्षांतील मुले- मुली बेसबॉल क्रीडा स्पर्धा पीपल्स महाविद्यालय मैदान, नांदेड येथे 6 जानेवारी ते 8 नोव्हेंबर, 2024 दरम्यान पार पडणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सचिव नांदेड एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती शामल पत्की, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते आज झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाअध्यक्ष सी.ए.डॉ प्रवीण पाटील यांनी भूषविले. यावेळी प्रमुख उपस्थिती पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.एम.जाधव, प्रमुख पाहुणे एस एम पटेल, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जे.ई.गुपिले,  सुरज सोनकांबळे, नृसिंह आठवले, महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघटनेचे तांत्रिक समितीचे गोकुळ तांदळे, कोल्हापूरचे सचिव राजेंद्र बनसोडे, ज्ञानेश काळे, क्रीडाअधिकारी संजय बेतीवार, क...
Buleet loud ; मोठ्या आवाजाची बुलेट चालवणे तरुणाईंसाठी स्टेटस, पोलीसांची भितीच नाही -NNL

Buleet loud ; मोठ्या आवाजाची बुलेट चालवणे तरुणाईंसाठी स्टेटस, पोलीसांची भितीच नाही -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शहरात युवकांमध्ये बुलेट गाडीची क्रेझ पाहायला मिळत आहे. गाडी घेतल्यावर मोठ्या आवाजाचे सायलेंसर टाकून बुलेटचा ध्वनी वाढवला जातो. काही गाड्यांमध्ये तर बंदुकीतून गोळी बाहेर येण्यासारखा आवाज काढण्यात येतो. फटाक्यांची लड फुटावी, किंवा एखादा बॉम्ब फुटावा असे आवाज बुलेट गाड्याचे येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णांना, वृध्दांना,व दर्शनाला येणा-या भाविकांना त्रास होत आहे. पोलिसांनी कधीही कारवाहीच केली नसल्याने त्याचा धाक बुलेट धारकांना बसताना दिसून येत नाही. रस्त्यावर वाहन चालवताना बुलेट स्वारांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोठ्या आवाजातील सायलेंसर नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तर मोठ्या आवाजाची बुलेट चालवणे तरुणाईंसाठी स्टेटस बनले आहे. शासनाने दिलेले निर्देश आणि कंपनीने दिलेल्या निकषांना डावलून खाजगी मेकॅनिकलकडून...
Vikas Patil Devsarkar ; काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

Vikas Patil Devsarkar ; काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी कॉग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे की, सन 2002 पासून कॉग्रेस पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. त्याच प्रमाणे कॉग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदार पदावर गेली अनेक वर्ष पासून काम केले आहे. पक्षाचा प्रदेश स्तरावरुन आलेले वेगवेगळे उपकृम तालुक्यामध्ये राबवून पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ दिला. परंतू आज कॉंग्रेस पक्षाच काम करतांना मला विश्वासात घेतले जात नाही. त्यामूळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे, काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचं ते समर्थन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे....
Sand thift ; कंधार पोलीसांनी दोन हायवा पकडल्या; एक दुचाकी जप्त – NNL

Sand thift ; कंधार पोलीसांनी दोन हायवा पकडल्या; एक दुचाकी जप्त – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। कंधार पोलीसांनी गाडी - बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्या दोन हायवा गाड्या आणि बेकायदेशीर रित्या दारुची वाहतुक करणारी दुचाकी गाडी पकडली आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत ५१ लाख २१ हजार ७६० रुपये आहे. कंधार येथील पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधाकर खजे, विकास कोकाटे, पोलीस उपनिरिक्षक अमोल इंगोले, पोलीस अंमलदार एकनाथ घुगे, शेषेराव बारोळे, अमोल गुंडरे यांनी एम.एच.२६ बी.ई.५७९० ही हायवा गाडी बेकायदेशीररित्या भरलेल्या पाच ब्रास वाळुसह जप्त केली. तसेच एम.एच.२६ बी.ई. ६७९० क्रमांकाची वाळु भरलेली हायवा पकडली. याबाबत संदेश उर्फ लिमट्या अनिल पवार (४५), राजू बळी बोईनवाड (२५) दोघे रा. मारतळा ता. जि. नांदेड यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक ३८१, ३८२ दाखल करण्यात आला. तसेच दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६सी. जे.५०१८ पकडली. त्यात बेकायेदशीर रित्या वह...
Nanded Police action ; विधीसंघर्ष बालकास गावठी कटटा व एक जिवंत काडतुससह अटक -NNL

Nanded Police action ; विधीसंघर्ष बालकास गावठी कटटा व एक जिवंत काडतुससह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। सोनखेड पोलिसांनी विधीसंघर्ष बालकास एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुससह 40,400/- रुपयांच्या मुद्देमालास अटक केली आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध शस्त्र बाळगणारे व्यक्ती विरुद्ध कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 06.11.2024 रोजी सोनखेड पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, एक व्यक्ती आपले ताब्यात एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस सोबत बाळगुन नांदेड ते उस्माननगर जाणारे रोडवर ढाकणी पाटी ता लोहा येथे थांबला. त्या ठिकाणी जावुन सदर व्यक्तीस ताब्यात घेवुन चौकशी केली असता तो विधीसंघर्ष बालक असल्याचे आढळून आले. त्याचे ताब्यातुन वरील हत्यार मिळुन आले असून, त्याने मा. जिल्हाधीकारी नांदेड यांचे शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सोनखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 201/2024 कलम 3/25 भाहका व कलम 135 ...
Polis nanded ; भाग्यनगर पोलीसांनी अॅटोमध्ये विसरलेला २ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला परत -NNL

Polis nanded ; भाग्यनगर पोलीसांनी अॅटोमध्ये विसरलेला २ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला परत -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। आज पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये श्रीकांत पाटील व त्यांच्या पत्नी हे रेल्वेस्टेशन ते छत्रपतीचौक ऑटोने प्रवास करुन छत्रपतीचौक येथे उतरले. काही वेळाने त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिणे असलेली पर्स सदर ऑटो मध्ये विसरल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे येवुन कळविले होते. त्यावरून श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, गुन्हे शोध पथक प्रमुख विनोद भा. देशमुख पोहेकों/२३६४ वाडीयार व प्रो.पो.उपनि शिंदे यांना सदर अॅटोचा शोध घेण्याचे आदेशित केले. वरील अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ सदर पर्स मधील मोबाईलचे लोकेशन घेवून ऑटो चा पाठलाग केला व सदर ऑटो रेल्वेस्टेशन परिसरामध्ये मिळून आल्याने त्यातील पर्स ताब्यात घेतली. सदर पर्स पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे आणुन पर्स बाबत खात्री ...
Criminal arested : रामर्तीथ ठाणे हद्यीतील खुन प्रकरणातील अनोळखी प्रेताची ओळख पटवून आरोपीला केली अटक -NNL

Criminal arested : रामर्तीथ ठाणे हद्यीतील खुन प्रकरणातील अनोळखी प्रेताची ओळख पटवून आरोपीला केली अटक -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। नांदेड तालुक्यातील पोस्टे रामर्तीथ हद्यीतील खुन प्रकरणातील अनोळखी पुरुष जातीचे प्रेताची ओळख पटवुन अज्ञात आरोपीचा शोध घेवुन, स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने अटक करून खुनाचा गुन्हा उघड केला आहे, या कार्यवाहीचं पोलीस पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 02/11/2024 रोजी पोलीस ठाणे रामर्तीथ हद्दीत गागलेगाव शिवार पाझर तलावा जवळ गायरान जमिनीवर एक अनोळखी इसमाचे प्रेत त्याचे शरीरावर जखमा असलेल्या स्थितीत आढळुन आले होते. सदर प्रकरणी पोलीस ठाणे रामर्तीथ येथे गुरनं. 275/2024 कलम 103 बि.एन. एस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने आम्ही स्वतः सोबत, पोउपनि सोनकांबळे व स्टाफ असे तात्काळ घटनास्थळाला भेट देवुन मयताचे प्रेताची बारकाईने पाहणी करुन मयताचे अंगावरील कपडे व इतर खाणा खुना पाहु...
Vinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश – NNL

Vinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेडl नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटात कांकाडीचे माजी सरपंच सुदीन‌ पाटील बागल यांच्या सह अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालय येथे दक्षिण विधानसभा मतदार संघातील कांकाडी,तुप्पा भागासह ग्रामीण भागातील व सिडको हडको परिसरातील व पदाधिकारी असलेल्या दता पाटील कदम तुप्पा उपसरपंच, कैलास बागल ग्रामपंचायत सदस्य,दशरथ पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष,शंभु गंगातीरे, ऋषीकेश भवर,रावण पाटील वर्तळे, उपसरपंच काळेश्वर बागल ,नंदु वर्तळे,प्रदीप कोल्हे, देवानंद हणवते, भागवत भवर , तानाजी भवर , श्रीकांत देशमुख,राजु देशमुख, सर्जेराव वर्तळे,शिवा सोळंके, नंदु वर्तळे या प्रमुख पदाधिकारी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला आह...
Sanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार – NNL

Sanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार – NNL

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड वजिराबादचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या कडे मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी एका आदेशाव्दारे अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे. महानगर पालिका अधिनियमातील‌कलम 49अवन्ये संजय नारायण जाधव सहाय्यक आयुक्त वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या कडे मुळ काम सांभाळून अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार मनपा आयुक्त यांनी 6 नोव्हेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाव्दारे काढला असुन यात घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान , भांडार विभाग,भुसंपादन‌ विभाग, वाचनालय विभाग, स्थानिक कर विभाग,दिव्याग कल्याण कक्ष,कोंडवाडा विभाग, आदि विभागाच्या अतिरिक्त पदभार दिला आहे. मनपा नांदेड येथे विविध विभागांतील केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोद‌ घेऊन मनपा आयुक्त यांनी उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे,ऊद्या 8 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारनार आहेत....
error: Content is protected !!