नांदेडलाइफस्टाइल

Preserve Social Culture ; पारंपारिक बंजारा पेहराव परिधान करुन विवाह थाटत सामाजिक संस्कृति जपण्याचा माहूरातील जोडप्याचा प्रयत्न

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आजच्या घडिला विवाह सोहळ्यात नववधू /वर लग्ना करीता हजारो रुपयांचे खर्च करत तामझाम व विविध आकर्षक कापडांना पसंती देतात मात्र माहूर शहरातील बंजारा समाजातील युवक वर आशिष राठोड (मेघावत) व तालूक्यातीलच बामनगुडा तांडा येथील वधु प्रगती पवार (नुंळसावत) या नव जोडप्यांनी दि.१५ मे रोजी पार पडलेला आपल्या विवाह सोहळ्यात अभिनव पध्दतित पेहराव परिधान करत त्या कापडास बगल देत आपल्या संस्कृतित वापरात येणारी आणि लूप्त होत असलेल्या बंजारा पेहरावाचे कापड परिधान करुन समाज जागृती चा संदेश दिला .

किनवट/ माहूर तालूक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तवास आहेत,व समाज संस्कृति आजही ठिकून आहे,मात्र आजच्या पिढिचे काही नवयुवक विवाह प्रसंगी परीधान करीत असलेले ‘फेटीया काचळी घुगरी टोपली धोतीनेरु’ घालत नाहीत, विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याची लग्न पत्रिका पण बंजारा भाषे मध्ये छापण्यात आली.

IMG 20250517 WA0028 Preserve Social Culture ; पारंपारिक बंजारा पेहराव परिधान करुन विवाह थाटत सामाजिक संस्कृति जपण्याचा माहूरातील जोडप्याचा प्रयत्न

समाजात संस्कृति टिकली पाहीजे व पेहरावात संस्कृतिचे महत्व असून पेहरावावरुन बंजारा संस्कृतिचे दर्शन होते. ग्रामिण भागात आजही संस्कृतिचे दर्शन पुरातन पेहरावातून दिसते. याला मात्र शहरीलोक पसंती देत नाही. यातून पेहराव लुप्त होत असून संस्कृतिस घाला बसत आहे. त्यासाठीच “आपणो संस्कृति च्छ आपणचं जतनं करावो लागेण.” म्हणत नववधू वरांनी हा निर्णय घेतला असे वर आशिष यांनी सांगितले. या समाजजागृतीवर विवाह सोहळ्यात उपस्थित सर्वाचे लक्ष वेधले विवाह प्रसंगी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!