HomeनांदेडDeglur Accident News ; दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक एक ठार तीन गंभीर...

Deglur Accident News ; दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक एक ठार तीन गंभीर जखमी

देगलूर, गंगाधर मठवाले। दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंजगाव ता. बिलोली येथील एक युवक जागीच ठार झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दिनांक १५ रोजी दुपारी शेवाळा थडीहिप्परगा या रोडवर घडली.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून हाती आलेली माहिती अशी की, गंजगाव ता. बिलोली येथील युवक मोटरसायकलवरून देगलूरकडे येत होते. तर दुसरी मोटरसायकल देगलूरवरुन शेवाळा मार्गे बिलोली कडे जात असताना दोन मोटरसायकलची शेवाळा थडी हिप्परगा या रोडवर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

या झालेल्या अपघातात गंजगाव ता. बिलोली येथील युवक हणमंत मारुती डुबुकवाड वय ३१ हे जागीच ठार झाले .तर माधव सायलू वन्नलवाड वय ३०, रा. गंजगाव, शेख शोएब अजीम वय २२ रा. नरंगलरोड देगलूर , शेख उमरपाशा वय २४, रा.नरंगलरोड देगलुर हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर देगलूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असून याप्रकरणी देगलूर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments