Deglur Accident News ; दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक एक ठार तीन गंभीर जखमी
देगलूर, गंगाधर मठवाले। दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंजगाव ता. बिलोली येथील एक युवक जागीच ठार झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दिनांक १५ रोजी दुपारी शेवाळा थडीहिप्परगा या रोडवर घडली.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून हाती आलेली माहिती अशी की, गंजगाव ता. बिलोली येथील युवक मोटरसायकलवरून देगलूरकडे येत होते. तर दुसरी मोटरसायकल देगलूरवरुन शेवाळा मार्गे बिलोली कडे जात असताना दोन मोटरसायकलची शेवाळा थडी हिप्परगा या रोडवर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या झालेल्या अपघातात गंजगाव ता. बिलोली येथील युवक हणमंत मारुती डुबुकवाड वय ३१ हे जागीच ठार झाले .तर माधव सायलू वन्नलवाड वय ३०, रा. गंजगाव, शेख शोएब अजीम वय २२ रा. नरंगलरोड देगलूर , शेख...
