श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा एक सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र आहे. या यात्रेला चारशे वर्षाची परंपरा आहे. शालेय विद्यार्थ्यांना यात्रेची ऐतिहासिक परंपरा यात्रा पाहता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शालेय विद्यार्थ्यांची सहल काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या.
शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनात कंधार, भोकर, नांदेड, लोहा आणि इतर तालुक्यातील शाळेंनी सहलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी येथील धार्मिक तीर्थ, मंदिर व परिसर पर्यटनाचे सांस्कृतिक केंद्र आहेत. घोडे, अश्व, कृषी व पशुप्रदर्शनी व येथील बाजार तसेच बाल गोपाळांसाठी आलेल्या आकाश पाळणा, विविध खेळाची साधनाचा त्यासाठी आस्वाद घेतला. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांच्या यशोगाथांची मांडणी असणारे शैक्षणिक स्टॉल्सलाह विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती घेतली. यासाठी संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पुढाकार घेतला.
मुलांनी लुटला यात्रेचा आनंद – आज शेवटच्या दिवशी रविवार असल्याने यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. नांदेड, परभणी, हिंगोले, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हा,थ मराठवाडा तसेच पर राज्यातून नागरिक यात्रेत दाखल झाले आहेत. रविवार सुट्टी असल्याने कर्मचारी व बच्चे कंपनी तसेच शैक्षणिक सहलीमुळे गर्दी माळेगावात दिसून आली.
माळेगावच्या यात्रेमध्ये लहान मुलांची व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलांची खेळणी मोठ्या प्रमाणात आली आहे. त्यावर लहान मुले आनंद घेण्यामध्ये मग्न दिसत आहेत. त्या खेळणी मध्ये आगगाडी, मोटारी, इलेक्ट्रॉनिक गाड्या, चावीच्या गाड्या, मोठ्या आकाराच्या ट्रँक्टर आदी खेळणी विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच महिलांनी तांबडा, लाल, गुलाबी, पिवळा विविध रंगाचे कुंकू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी पाहवयास मिळाली. येथे हरमाल जोर धरला आहे. त्यामध्ये बांगडी, पॉकेट, बेल्ट, टिकल्या, पीना, झुमके, नथनी, पायातली चैन, बो, गळ्यातले हार, नेकलेस, कंबर पट्टा, बाजू बंध, साडी पीन, लिपिस्टिक, मेकअप बॉक्स, नेलपेंट आणि शोभेच्या नवनवीन वस्तू विक्रीसाठी आले आहेत. या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेमध्ये महिलांची गर्दी होत आहे.
ओपी सम्राट मॅजिक शो – माळेगाव यात्रेत बालगोपालांसाठी “ओपी सम्राट मॅजिक शो” आकर्षित करत आहे. उत्तर प्रदेशातील मोदी नगर गाजियाबाद येथील विजय चव्हाण यांनी ओपी सम्राट माजीक शो माळेगाव यात्रेत आणला आहे. न्यू कमल या सर्कस मधून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःचा ओपी सम्राट मॅजिक शो निर्माण केला. मागील दोन वर्षापासून ते यात्रेत येत आहेत. या मॅजिक शो मध्ये मीना बाजार, डार्क बॉक्स, इयर येल, टाइम्स स्पीड आदी पन्नास जादूचे प्रयोग ते दाखवतात. हा मॅजिक बालगोपालनचे आकर्षण ठरले आहे.
पाच आकाश पाळणे – उंचच उंच आकाशाशी झेप घेणारे असे पाच आकाश पाळणे माळेगाव यात्रेत दाखल झाले आहेत. ही आकाश पाळणे बाळ गोपाळांसाठी आनंदाची परवणी ठरत आहे. मागील दहा वर्षापासून पारंपारिक लहान आकाश पाळण्याची संख्या कमी झाली. आता उंचच उंच इलेक्ट्रॉनिक आकाश पाळण्याची क्रिज वाढली आहे. लहान बालकांसह त्यांचे आई-वडील व तरुण मंडळी बसून उंच आकाशी झेप घेताना दिसत आहेत. लातूर, माजलगाव, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई, जालना आदी ठिकाणावरून ही पाळणे आली आहेत. सर्वात मोठी माळेगावची यात्रा असल्याचे आकाश पाळणा चालकांनी सांगितले आहे.