श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| प्रत्येक विद्यार्थी मध्ये कोणती ना कोणती कला असते. ती प्रदर्शीत करण्याची संधी सर्वांना वेळोवेळी उपलब्ध होते नाही. त्यामुळे आपल्यामध्ये नेमके कोणते गुण आहेत, त्याचा विकास होऊ शकतो काय? हे बघता येत नाही. मात्र स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमधून चालना मिळू शकते, असे प्रतिपादन श्री रेणुका देवी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. राजेंन्द्र लोने यांनी केले.


जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या माहूरच्या स्नेहसंमेलनाच्या उद्दघाटन प्रसंगी ते बोलत होते. जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे सहा दिवशीय वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन दि.१७ रोजी करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रेणुका देवी महाविद्यालयचे प्राचार्य गुरूनुले ,उपप्राचार्य डॉ.राजेंन्द्र लोणे .राज ठाकूर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शाळेच्या निर्मितीपासून तर आजतागायत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती व सहा दिवस चालनारे ,रस्सीखेच,धावने,खो-खो,बूध्दीमता (चेस), क्रिकेट, संगीत खुर्ची,गायन, आनंद मेळवा, सांस्कृतिक कार्यक्रम, अदि स्पर्धा होणार आहे, याबाबतची माहिती मुस्कान मॅडम यांनी दिली. या प्रसंगी उपमुख्याध्यापक आहेफाज शेख. स्पोर्ट हेड प्रफुल भवरे , सोहेल चव्हाण, अजय राठोड,आकाश राठोड नागेश महल्ले, राहुल गिर्हे , राजाराम गंदेवाड,राजू गुलफुलवार , रचना निळे, सोहेल खान ,तसेच विकास कांबळे ,संगीता ताई लक्ष्मी ताई उपस्थित होते.
