Friday, May 15

union protests ; असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

नांदेड l २ ऑगस्ट रोजी सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. मुदखेड तालुक्यातील कोल्हा आणि भोकर तालुक्यातील बाचोटी कॅम्प येथील कामगार व शेतमजूरांचे गंभीर प्रश्नाचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना देण्यात आले.
मौजे कोल्हा येथे तातडीने जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावेत व रोजगार हमीचे कामे द्यावेत किंवा जॉब कार्ड धारकांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा.

मौजे बाचोटी कॅम्प ता. भोकर, मौजे कोल्हा ता.मुदखेड, मौजे वझरा – आजनी ता. माहूर येथील कास्तकार शेतकऱ्यांच्या ताब्यातील वाहिती जमीन वन खात्याच्या काही अधिकाऱ्यांमार्फत काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. उभ्या पिकात खड्डे करून झाडे लावण्यात येत आहेत. वर्ग दोन चे पट्टे उडवून सरकारी पट्टेदार म्हणून सात बारा वर लिहल्या जात आहे. ही बाब गंभीर असून असंघटित कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांचे लक्ष वेधले आहे.

लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील प्रश्न घेऊन सर्वांचे दावे दाखल करण्यात येतील असे निवासी उप जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, सीटू राज्य कमिटी सदस्य कॉ. करवंदा गायकवाड, जमसं जिल्हाध्यक्ष कॉ. लता गायकवाड, कॉ. जयराज गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

-कॉ. गंगाधर गायकवाड,
अध्यक्ष : असंघटित कामगार संघटना (CITU )नांदेड जिल्हा.
मो. 7709217188
दि. 2 ऑगस्ट 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!