नांदेड/नायगाव| ई -केवायसी (E-KYC) साठी नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये तालुक्यातील अनेक शेतकरी, महिला कडाक्याच्या थंडीमध्ये रांगा लावून बसत आहेत. अनेक नागरिकांच्या आठ ते दहा दिवस बँकेच्या चकरा मारून सुद्धा केवायसी होत नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकेतील ई- केवायसी सुसूत्रता आणावी व नागरिकाची गैरसोय टाळावी अशी आवाहन शेतकरी पुत्रांनी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर (Pandurang Shinde Manjaramkar) यांनी म्हटले आहे.

या निवेदनामध्ये खातेदाराचे होल्ड उठवण्यात यावे, शेतकऱ्यांना शाखेमध्येच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, सुशिक्षित बेरोजगार युवकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे , विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी हिंदू युवा परिषदचे रणजित देशमुख, छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, साहेबराव चट्टे, बालाजी पाटील धनजकर, गजानन कदम इत्यादी उपस्थित होते.
