Blogराजकीय

Mukband protest ; शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेधार्थ तोडांला काळया फिती लावून मुकबंद आंदोलन – NNL

नवीन नांदेड| बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार निषेधार्थ व घटनेतील आरोपींना तात्काळ कठोर कारवाई करावी यासाठी शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी तोडांला काळी फित लावून मुकबंद आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार निषेधार्थ राज्यभर आंदोलन आज दिनांक २४ आगस्ट रोजी शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने सिडको शिवसेना शहर प्रमुख अजितसिंग ऊर्फ जितुंसिग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण समन्वयक दिलीप भागिले,भारतीय कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख ब्रिजलाल ऊगवे,जिल्हा ऊपप्रुमुख व्यंकोबा येडे, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे,माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिकंलवाड, माजी नगरसेवक शाम जाधव.

महिला संघटक निकिता शहापुरवाड ,कृष्णा पांचाळ, दिपक देशपांडे, संतोष खैरे,आनंदा वाघमारे, पंडित गजभारे, संतोष आष्टेकर आनंदा गंगातीरे यांच्या सह वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश शिंदे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित वाघमारे ,व पदाधिकारी यांनी तोडला काळया फित लावून मुकबंद आंदोलन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले व पुतळा परिसरात आंदोलनला सुरूवात केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button