Annabhau Sathe- Lokmanya Tilak ; अण्णाभाऊ साठे- लोकमान्य टिळक प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते -प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांचे प्रतिपादन

नवीन नांदेड l महाराष्ट्राच्या मराठी साहित्य परंपरेतील एक महत्त्वाचे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी मार्क्सवादी विचाराचा अंगीकार करून वास्तववादी लेखन केले.


आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित आणि प्रवाह पतितांच्या व्यथा आणि वेदना साकार केल्या आणि मानवतावादी विचारांशी प्रामाणिक राहिले तर प्रखर राष्ट्रवादी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अमूल्य योगदान देऊन प्रखर क्रांतिकारी लढा उभारला. त्यामुळे अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक हे प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होत,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात केले.

येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त निमित्त अभिवादन कार्यक्रम घे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार बोलत होते.अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सतिश शेटे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन. पी.दिंडे, डॉ एस. व्ही.शेटे आणि से.नि.कार्यालयीन अधिक्षक आर.डी.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. सतिश शेटे यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि शाहिर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळ,लोकनाट्य आणि सर्जनशील साहित्य निर्मिती या बद्दल भाष्य केले. यावेळी महाविद्यालया तील नवनियुक्त प्रा. किशोर सुर्यवाड आणि प्रा.कविता हंबर्डे यांचा प्रचारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.साहेबराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शशीकांत हाटकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रो.डॉ.रेणुका मोरे, प्रो.डॉ.नागेश कांबळे, प्रा.डॉ. दिलिप पालिमकर,
डॉ.अनिल गच्चे,डॉ.गणेश लिंगमपल्ले, डॉ.संजय गिरे, डॉ.उत्तम कानवटे, डॉ.आर.एम.कागणे, डॉ.साहेबराव मोरे,प्रा.जायदे, प्रा.नंदिनी सुधळकर, प्रा. माधव मुस्तापुरे, प्रा.शेख, प्रा.कोतवाल, डॉ.शोभा वाळुक्कर, डॉ.धारबा रणवीर,डॉ.लालबा खरात,प्रा.कपील हिंगोले,डॉ.गणेश ईजळकर, प्रा.समाधान दराडे, प्रा.ललिता आया, प्रा.राहुल पडोळे यांसह महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.



