Annabhau Sathe- Lokmanya Tilak ; अण्णाभाऊ साठे- लोकमान्य टिळक प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते -प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांचे प्रतिपादन
नवीन नांदेड l महाराष्ट्राच्या मराठी साहित्य परंपरेतील एक महत्त्वाचे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी मार्क्सवादी विचाराचा अंगीकार करून वास्तववादी लेखन केले.
आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित आणि प्रवाह पतितांच्या व्यथा आणि वेदना साकार केल्या आणि मानवतावादी विचारांशी प्रामाणिक राहिले तर प्रखर राष्ट्रवादी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अमूल्य योगदान देऊन प्रखर क्रांतिकारी लढा उभारला. त्यामुळे अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक हे प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होत,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात केले.
येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त निमित्त अभिवादन...
