नांदेडधार्मिक

Shivnagar ; शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

नांदेड l नांदेड शहरातील शिवनगर येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे दर वर्षी प्रमाणे आज 1 मे रोजी ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा मूलमंत्र देत समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समतावादी विचार जनमानसात रुजवणारे महान तत्त्ववेत्ते, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी उपस्थित महिलांनी शिवपाठ व भजन केले.
सकाळी 11 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली व त्या नंतर महाप्रसाद अन्नदान वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जंगम समाजाचे युवा नेते वैजनाथ स्वामी राष्ट्रीय सचिव प्रवक्ते अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ शिवहार स्वामी, ऋषिकेश स्वामी, प्रशांत स्वामी,बबन स्वामी,बालाजी स्वामी,श्रीकांत स्वामी, कृष्णा मठपती वार्ताहर दैनिक श्रमिक लोकराज्य, मन्मथ स्वामी,माधव मठपती,बालाजी पत्तेवार,संतोष बारसे,भगवान स्वामी,सुभाष स्वामी.

सुजित स्वामी,एडवोकेट साईप्रसाद सुकळकर, साई मंठाळकर,देविदास मठपती,सदाशिव वनवले, राजू कदम,सुनील सोनटक्के,गजानन इंगळे,नारायण पांचाळ,मामिलवाड, चिलवंत अप्पा, वेदांत मठपती,मंथन स्वामी,श्रीकांत रामपटवार,आदर्श स्वामी, लक्ष्मीबाई स्वामी, शोभा मठपती, स्वाती स्वामी,ज्योती स्वामी,प्रणिता स्वामी, प्रिया स्वामी, श्रेया स्वामी,लक्ष्मीबाई चाकोते,अनिता स्वामी ,गायत्री स्वामी,शुभांगी स्वामी,श्रद्धा स्वामी ,सौंदर्या स्वामी,सखी स्वामी, तन्मयी बारसे यांनी परिश्रम घेतले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ स्वामी यांनी केले.

या वेळी क्रांतीसुरु जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जीवनावर भाषण करताना कु.वैष्णवी इरना चाकोते या विद्यार्थिनीने अनेक प्रसंग व्यक्त केले. या कार्यक्रमाचे शेवटी शिवहार स्वामी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!