करियरनांदेड

Government hostel : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश

नांदेड| इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत लातूर प्रादेशिक विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्याजमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजनभत्ता व निवासभत्ता पुरविण्यात येतो. सन 2025-26 साठी शासकिय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजनेतंर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर स्विकारले जाणार आहेत.

संबंधित जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दिलेल्या मुदतीत सादर करावे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्यांकडे सादर करावीत.

उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत संबंधित प्रवर्गनिहाय विहीत आरक्षणानुसार तसेच गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. लातूर विभागातील शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्ह्यासाठी सन 2025-26 साठी वसतिगृह, पंडीत दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार यासाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) या बाबीच्या प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत राहील. अर्ज छाननी करावयाचा कालावधी 19 ते 24 सप्टेंबर 2025 राहील. पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतीम करणे व प्रसिध्द 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. पहिली निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 6 ऑक्टोंबर 2025 आहे. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 9 ऑक्टोंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशांची अंतिम मुदत 17 ऑक्टोंबर 2025 राहील.

शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडीत दिनदयाळ स्वंयम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग लातूरचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button