Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
नांदेड लेख July 16, 2024

Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

माता वैष्णवी देवीला पायी जायचं म्हणुन पहाटे ५ च्या दरम्यान यात्रेकरू तयार होऊन हॉटेल बाहेर माझी वाट पहात होते.अनेकानी आधीच दर्शनासाठी आरएफआरडी कार्ड काढले होते. दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑनलाईन यात्रा परची नांदेडलाच काढली होती पण तिला कोणी विचारले नाही. त्यामुळे वाचकांनी यापुढे ऑनलाइन यात्रा परची काढण्याची आवश्यकता नाही.आरएफआरडी कार्ड काढण्यासाठी स्वतः चे आधार घेवून बस स्टँड जवळील सेंटर जावे लागते. बस स्टॅन्ड ते बाणगंगा हा प्रवास ऑटोतून केला. बाणगंगाच्या पुढे कोणतेही वाहने जात नाही. ज्यांना डोली अथवा घोडे करायचे होते त्यांना ते ठरवून दिले.

नियमापेक्षा जास्त पैसे मागणाऱ्यांना हो म्हणा पण आल्यानंतर त्यांना देवस्थान ने ठरविल्या दराप्रमाणे पैसे द्या आणि तो ऐकत नसेल तर त्याची कंप्लेंन मिलिटरी वाल्यांकडे करा अशा सूचना मराठीतून सर्वांना दिल्या. अंगात अमरनाथ यात्री संघाचा टी-शर्ट, डोक्यावर टोपी, कपाळावर जय मातादी ची चुनरी पट्टी, हातात काठी घेऊन आमची पदयात्रा सुरू झाली. थोड्याच वेळात ढोल वाला आमच्यात सामील झाला.माझ्या सह योगेश पटेल,शाम हुरणे, सुभाष देवकते,मुकेश पटेल,अक्षय हूरणे, प्रिया त्रिमुखे, नवनाथ सोनवणे, रेणुका व माधवराव उल्लेवाड, सचिन उल्लेवाड, स्वाती व प्रदीप माळेगावे, डॉ. शिवाजी डिग्रसे, सुजाता मुखडे, श्रीकांत मुखेडकर, सिंधू व बालाजी इंगोले, अर्चना व उमाकांत कदम, मृदुला व बलभीम पत्की, अरुणा व प्रफुल्ल नागरगोजे,महादेवी व आनंद साताळे,, रेखा भताने, सारिका केंद्रे, जयमाला लटपटे,संगीता व डॉ.नारायण भुस्से यांनी ढोल च्या गजरात नाचत गात, जय मातादी चा जयकारा करत पायी येणे जाणे केले. चालताना योगेश पटेल यांनी तर अशी कमाल केली की, एकापेक्षा एक सरस भजने म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तीन ते सव्वा तीन तासात आम्ही भवन ला पोहोचलो. मोबाईल, बॅगा, कंगवा, बोट, गोळ्या, चामड्याच्या वस्तू आत मध्ये नेता येत नसल्यामुळे लॉकरमध्ये ठेवल्या. दर्शन रांगेत सर्वजण थांबलो.गुहेत सरस्वती, वैष्णवी व महाकाली यांचे दर्शन पिंडी रुपात घ्यावे लागते. दर्शन घेताना मी एक हुषारी केली. आमच्या सोबत असणाऱ्या सर्वांना एका रांगेत उभे केले. पिंडी समोर दिसल्या की, मी बाजूला सरकलो आणि सर्वांना पुढे जाण्याचा इशारा केला. जवळपास चार ते पाच मिनिटे मला मनसोक्त दर्शन घेता आले.

मी आतापर्यंत २६ वेळा वैष्णोदेवीचे व भैरव चे दर्शन पायी घेलेलेले आहे. पण पहिल्यांदाच मी वैष्णवी देवी भवन ते भैरव हा प्रवास केबल कार (गंडोला)ने केला.योगेश पटेल,सुभाष देवकते, रेखा भताने, सारिका केंद्रे, जयमाला लटपटे यांनी तर अनवाणी दर्शन घेतले. जाताना पायी त्यानंतर रोपवे व येताना घोड्याचा वापर करणाऱ्यांमध्ये प्रणिता व कुमार कुलकर्णी, वेणूताई व गणपतसिंह ठाकूर, माधुरी व सूर्यकांत सुवर्णकार यांचा समावेश आहे. सुरेश त्रिमुखे यांनी डोली, बॅटरी कार व रोपवेने अंतर पूर्ण केले. नारायण गवळी व आशुतोष मुखाडे यांची रात्री प्रकृती ठीक नव्हती.त्यामुळे मी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.

पण मी पायी निघाल्यानंतर त्यांनी गुपचूप डोली करून दर्शन घेतलेच. वर्षा व डॉ. अरुण हिवरेकर, जयश्री व मधुकर पाष्टे, रेखा सोनवणे, ज्योती वाघमारे,वैशाली व डॉ.द्वारकादास नखाते यांनी डोली,रोपवे चा वापर जाताना केला पण येताना मात्र पायी येणे पसंत केले.संगीता व प्रदीप दांडेगावकर, उर्मिला व अनंत कवठेकर, अपर्णा व कल्याण शिर्शीकर , माया डीग्रसे, डॉ.स्नेहराणी व डॉ.महेश बिरादार यांनी घोडा व रोपवे च्या मदतीने १४ किलोमीटर आंतर पूर्ण केले. डोली व रोपवेद्वारे येणे जाणे करणारे वैशाली व डॉ. द्वारकादास नखाते, वंदना व केदार मालपाणी या दोन जोडप्यांचा समावेश आहे. अंजली कुलकर्णी, सुरेखा रहाटीकर, श्रीहरी व अपर्णा कुलकर्णी यांनी मात्र बॅटरी कार ,रोपवे, घोडे, पालखी व पायी अशा प्रकारे सर्व साधनाचा वापर केला.भैरव सह सर्व प्रवास पायी केल्यामुळे कैलाश घागरदरे यांनी ठेवलेले एक हजार रुपयाचे पहिले बक्षीस गोपी स्वामी यांनी तर रेखा भताने यांनी ५०० ₹ चे दुसरे बक्षिस पटकावले.

यावेळी चालताना थोडा थकलो असल्यामुळे परतीचा प्रवास घोड्यावर करावा असा विचार होता. पण सर्वांनीच धरला की, भाऊ कसे करून पायी खाली चला. मी एवढेच म्हटले की, माझ्यासोबत जे जे पायी येणार असतील, त्यांनी रस्त्यात पडलेले बिस्किटाची कव्हर, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा जमा करून डस्टबिन मध्ये टाकत असाल तरच येतो. सर्वांनी या माझ्या विनंतीचा मान ठेवून उतरताना तंतोतंत अंमल केला. सहज बोलता बोलता विषय निघाला तंबाखू खाण्याचा. प्रफुल्ल नागरगोजे आणि बलभीम पत्की यांच्या धर्मपत्नींनी कितीतरी वेळा प्रयत्न करून देखील नवऱ्याची तंबाखू सुटत नव्हती. मी या दोघांना उभे करून प्रतिज्ञा घ्यायला लावली की, यापुढे कधीच तंबाखू खाणार नाही. ही मात्रा बरोबर लागू पडली.

नागरगोजे यांच्या धर्मपत्नी अरुणा यांनी हात जोडत माझे आभार मानले.आमच्या सोबत असणाऱ्या एका यात्रेकरूने गुपचूप मला पाच हजार रुपये दिले व सांगितले की, तुम्हाला जिथे खर्च करायचे असेल तिथे हे खर्च करा, पण माझे नाव काही जाहीर करू नका. त्या पैशातून ढोल वाल्याचा, चहा फराळाचा व जेवणाचा खर्च भागविला. संध्याकाळी सहा वाजता खाली उतरलो. ऑटो ने हॉटेलला पोहोचल्यानंतर मसाज वाल्याला बोलून मस्तपैकी तेल मालिश केली. त्यानंतर गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था दरवर्षी प्रमाणे रेखा व नवनाथ सोनवणे उदगीरकर यांच्यातर्फे करण्यात आली होती करण्यात आली होती. प्रशस्त बेडरूम मध्ये आल्यानंतर गाढ झोप कधी लागली हे कोणालाही कळाले नाही.
*(क्रमशः)*

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur Amarnath Cave Episode - 10
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO SCHOOL ESTATE SCHOOL STAFF’S CREDIT SOCIETY | सिडको शालेय वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था सर्व साधारण सभा संपन्न, लाभांश वाटप -NNL
Next Article Warkari who continue the tradition of Wari | श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम -NNL

December 17, 2022

Support Flood affected : पुरग्रस्त महिलांना नासिक येथील स्वर्णकार महिला मंडळ सामाजिक संस्थेचा आधार

October 8, 2025

Chairman Prof. Ram Shinde : जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

April 13, 2025

Direct admission to various sports academies : शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश

June 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Marathwada issues! : खा. अशोकराव चव्हाण व भाजपच्या खासदार-आमदारांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे वेधले शाह, फडणविसांचे लक्ष!

Nitin Gadkari : नितीन गडकरींना राष्ट्रीय महामार्ग 361 संदर्भातील समस्या बाबत निवेदन -NNL

Mla. Antapurkar : मदतकार्य, पंचनामा वेगात करण्याच्या सूचना : आ. अंतापूरकर

Due to shock ; शॉक लागून शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू; पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ -NNL

yellow mosaic : कोवळ्या सोयाबीनवर यल्लो मोझॅक आणि वाढू लागलेल्या ताणामुळे शेतकरी हैराण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?