Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
माता वैष्णवी देवीला पायी जायचं म्हणुन पहाटे ५ च्या दरम्यान यात्रेकरू तयार होऊन हॉटेल बाहेर माझी वाट पहात होते.अनेकानी आधीच दर्शनासाठी आरएफआरडी कार्ड काढले होते. दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑनलाईन यात्रा परची नांदेडलाच काढली होती पण तिला कोणी विचारले नाही. त्यामुळे वाचकांनी यापुढे ऑनलाइन यात्रा परची काढण्याची आवश्यकता नाही.आरएफआरडी कार्ड काढण्यासाठी स्वतः चे आधार घेवून बस स्टँड जवळील सेंटर जावे लागते. बस स्टॅन्ड ते बाणगंगा हा प्रवास ऑटोतून केला. बाणगंगाच्या पुढे कोणतेही वाहने जात नाही. ज्यांना डोली अथवा घोडे करायचे होते त्यांना ते ठरवून दिले.
नियमापेक्षा जास्त पैसे मागणाऱ्यांना हो म्हणा पण आल्यानंतर त्यांना देवस्थान ने ठरविल्या दराप्रमाणे पैसे द्या आणि तो ऐकत नसेल तर त्याची कंप्लेंन मिलिटरी वाल्यांकडे करा अशा सूचना मराठीतून सर्वांना दिल्या. अंगात अमरनाथ यात्री संघाचा टी-शर्ट, डोक्यावर टोपी, कप...
