District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

किनवट,परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्‍हा परिषदेच्या जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच किनवट तालुक्‍यातील सहस्‍त्रकुंड येथील मुलींच्‍या आश्रम शाळेस व मुलींच्‍या वसतीगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्‍यमान आरोग्‍य मंदीर केंद्र, इस्‍लापूर येथे भेट देऊन औषधी भांडार, लसीकरण विभा्र, शस्‍त्रकिया कक्ष, व उपलब्‍ध आरोग्‍य सुविधांची पाहाणी करुन, राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांचा आढावा घेतला.

तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना हिवताप, डेंग्‍यू तसेच पाण्‍याची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्‍या. यावेळी त्यांनी आरोग्‍य संस्‍थेच्‍या इमारतीमध्‍ये उणीव असलेल्‍या इमारतींमध्‍ये बांधकाम, पाणी पुरवठा व ग्राम पंचायत विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधून उणीवा दूर करण्याबाबत सांगितले.

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी आयुष्‍यमान आरोग्‍य मंदीर केंद्र, इस्‍लापूर इमारत परिसरात वृक्षारोपन केले. तसेच बेलोरी (धानोरा) येथे त्यांनी भेट देऊन आरोग्‍य विषयक कामकाजाची पाहाणी केली. यामध्‍ये औषधी भांडार, लसीकरण विभाग, शस्‍त्रकिया कक्ष, व उपलब्‍ध आरोग्‍य सुविधांची पाहाणी केली. यावेळी त्यांनीराष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांचा आढावा घेतला व समुदाय आरोग्‍य अधिकारी यांना मार्गदर्शन करुन आवश्‍यक त्या सूचना दिल्‍या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button