नांदेडमहाराष्ट्र

The self-immolation movement of Tembhurni Pawanmari residents is back : कार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर टेम्भूर्णी पावनमारी वासियांचं आत्मदहनाच आंदोलन मागे -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पावनमारी गावासाठी मंजूर झालेल्या दीड कोटींचा निधी इतरत्र वळविला जात असल्यावरून प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी या विरोधात रणशिंग फुंकले होते. दरम्यान गावकर्यांनी गाव जाळून टाकून बेचिराख करून दिनांक १५ ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. ७५ वर्षांपासून रस्त्यापासून वंचित असलेल्या पावनमारी गावच्या रस्त्याचे प्रकरण नांदेड न्यूज लाइव्हने उचलून धरले. याची दखल घेऊन आज दिनांक १२ श्रावण सोमवारी नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे, पोलीस प्रशासनाने पावनमारी गावाला भेट दिली. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून लेखी आश्वासन दिल्यानंतर टेम्भूर्णी/पावनमारी वासियांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असल्याचे सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पावनमारी गावासाठी मंजूर झालेला १.५ कोटी रुपयाचा रस्ता इतरत्र वळवून अन्य ठिकाणी करण्याचा घाट राजकीय वरदहस्त असलेला ठेकेदार व काही चापलुसी कार्यकर्त्याने रचला होता. हा प्रकार होत असताना कोणत्याही नेत्याने पावनमारी/टेम्भूर्णी गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार आणि मंजूर पावनमारी ठिकाणाहून करण्यासाठी यासाठी प्रयत्न केले नाही. आणि जिथे होते तिथे रस्ता होऊ द्या तुम्हाला पांदण रस्त्यातून रस्ता करून देतो म्हणून एक प्रकारे जणू मंजूर निधी इतरत्र वळविण्यासाठी सहमती दर्शविली होती. दरम्यान पावनमारी/टेम्भूर्णी गावकऱ्यांनी हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पाच गावच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि हा रस्ता असल्याची माहिती दिली होती. मागील काळात पावनमारी गावाच्या रस्त्याला नंबर देऊन पंतप्रधान सडक योजनेत समावेश करावा. अशी विनंती माजी खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित बांधकाम विभागाला १५ सप्टेंबर २०२३ रोजी पत्र देऊन केल्याचे यावेळी सांगितले होते.

त्यानंतर आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल भगत, उपअभियंता कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पावणमारीचे पोलीस पाटील किसनराव जाधव, सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर, उपसरपंच संजय जाधव, शिवाजीराव जाधव पावनमारीकर, दिलीपराव जाधव, सचिन जाधव, अनिल जाधव, गणेश जाधव, अशोकराव जाधव यांच्यासह गावातील महिला पुरुष मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर अधिकारी व गावकरी हिमायतनगर तहसील कार्यालयात दाखल झाले, ग्रामस्थांनी दिलेल्या आंदोलन मागे घ्यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंजूर झालेला दीड कोटी रुपयाच्या निधीतील रस्त्याचे काम चौफुलीपासून पावनमारी गावापर्यंत सुरु करण्यात येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते देऊन पावनमारी, टेम्भूर्णी गावकऱ्यांच समाधान केले.

हिमायतनगर तालुक्यात पावनमारी या गावाला जाण्या येण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पावनमारी करांची रस्त्याच्या बाबतीत मोठी उपेक्षा कायम होती. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्यरस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून १ कोटी ५० लक्ष रूपयांचा विकास निधी मंजूर झाला होता. हा मंजूर रस्ता इतरत्र वळविण्यात येत असल्याचे समजल्यानंतर आमचा मंजूर रस्ता गेला कुठे..? असा सवाल पावनमारी गावच्या लोकांनी विचारून नाराजी वजा संताप व्यक्त करत हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन रस्त्याची मागणी केली होती. रस्ता देता येत नसले तर दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी टेम्भूर्णी/पावनमारी गावकऱ्यानी संपूर्ण गाव जाळून तहसील कार्यालय हिमायतनगर समोर सहकुटुंब आत्मदहन करून गाव बेचिराग करणार असल्याचा इशाराही टेम्भूर्णी पावनमारी गावकऱ्यानी निवेदनाद्वारे दिला होता.

IMG 20240812 185658 The self-immolation movement of Tembhurni Pawanmari residents is back : कार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर टेम्भूर्णी पावनमारी वासियांचं आत्मदहनाच आंदोलन मागे -NNL

आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम अधिकाऱ्यानी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आणि दिवाळीनंतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही टेंभुर्णी/ पावनमारी गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा इशारा दिला होता तो मागे घेतला आहे. शासनाने तात्काळ आम्हाला मंजूर झालेल्या दीड कोटी रुपयाच्या निधीतून रस्ता करून द्यावा. कारण आमचे गाव पावनमारी हे गट ग्रामपंचायत टेंभूर्णी अंतर्गत जोडलेली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सुद्धा हे गाव मुख्य रस्त्याशी किंवा ग्रामपंचायत टेंभूर्णी कडे पक्क्या रस्त्याने जोडण्यात आले नाही. या गावाची ग्रामपंचायत टेंभूर्णी, राशन दुकान टेंभूर्णी उपआरोग्य केंद्र विरसनी जि. प. पंचायत समिती मतदान केंद्र टेंभूर्णी येथे आहे. तर तलाठी सज्जा खडकी, विधानसभा / लोकसभा मतदान केंद्र खडकी, जवळचे रेल्वे स्टेशन खडकी व मुख्य बाजारपेठ हिमायतनगर आहे. तरी हे गाव टेंभूर्णी किंवा खडकीकडे अद्याप पक्क्या रस्त्याने जोडले नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, उपजीविका या मुलभूत सोई पासून गाव कोसो दूर आहे. निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि हा रस्ता असून, तात्काळ रस्ता करून द्यावा जर पुन्हा सूडबुद्धीने रस्त्याला नंबर नाही म्हणून हे काम दुसरीकडे केलं तर पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल..! अशी प्रतिक्रिया सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलतांना दिली.

 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!