The self-immolation movement of Tembhurni Pawanmari residents is back : कार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर टेम्भूर्णी पावनमारी वासियांचं आत्मदहनाच आंदोलन मागे -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पावनमारी गावासाठी मंजूर झालेल्या दीड कोटींचा निधी इतरत्र वळविला जात असल्यावरून प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी या विरोधात रणशिंग फुंकले होते. दरम्यान गावकर्यांनी गाव जाळून टाकून बेचिराख करून दिनांक १५ ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. ७५ वर्षांपासून रस्त्यापासून वंचित असलेल्या पावनमारी गावच्या रस्त्याचे प्रकरण नांदेड न्यूज लाइव्हने उचलून धरले. याची दखल घेऊन आज दिनांक १२ श्रावण सोमवारी नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे, पोलीस प्रशासनाने पावनमारी गावाला भेट दिली. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून लेखी आश्वासन दिल्यानंतर टेम्भूर्णी/पावनमारी वासियांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असल्याचे सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पावनमारी गावासाठी मंजूर झालेला १.५ क...
